शुक्रवार, मार्च १२, २०२१

समस्याग्रस्त व पिडीत महिलासांठी 15 मार्च रोजी महिला लोकशाही दिन,जिल्हाधिकारी कार्यालयात स्विकारले जातील अर्ज


नांदेड, दि. 12:- समस्याग्रस्त व पिडीत महिलांसाठी 15 मार्च 2021 रोजी महिला लोकशाही दिनी आपले अर्ज विहित नमुन्यात सादर करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी नांदेड व सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे. 

दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन घेण्यात येतो. सोमवार 15 मार्च 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर नांदेड येथे महिला लोकशाही दिन होणार आहे. संबंधीत समितीचे सदस्य व शासन निर्णयात नमुद संबंधीत विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित रहावे, असेही आवाहन सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

  • पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी एकप्रकारे व्यासपीठ, तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हा, विभाग, मंत्रालय व तालुका स्तरावरील महिला लोकशाही दिन पाळण्याबाबत निर्णय झाला.
  • महिला लोकशाही दिन तालुका स्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी होणार आहे. त्याचे अध्यक्ष तहसीलदार असतील. महिला लोकशाही दिनासाठी अर्ज करण्यास प्रत्येक तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, पंचायत समिती येथे संपर्क साधता येईल. जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी होईल. याचे अध्यक्ष जिल्हाधिकारी आहेत.विभागीय आयुक्त व राज्यस्तरावर प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन पाळण्यात येणार आहे. या दिवशी सुटी असल्यास त्यानंतर येणारा कामकाजाचा दिवस लोकशाही दिन म्हणून पाळण्यात येईल

https://nanded.gov.in/

लोकशाही दिन शासन निर्णय


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोर कामगाराला ३५ हजाराची लाच स्वीकारताना ला.प्र.विभागाने रंगेहाथ पकडले

 


प्रेसनोट - 1375

दिनांक : १२/०३/२०२१

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : मुंबई विभाग
  2. गुन्हा नोंद क्रमांक : १४/२०२१
  3. कलम : कलम ७ भ. प्र. अधिनियम १९८८
  4. आरोपीचे नाव व कार्यालय : संदीप ज्ञानदेव पन्हाळकर वय ३९ वर्षे
  5. धंदा कामगार ( नेमणुक - सहा. अभियंता (जलकामे) अ विभाग, जलमापक विभाग व जलदेयके विभाग, ६ या मजला बुहन्मुंबई महानगरपालिका, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१)
  6. मागणी केलेली लाचेची रक्कम : र.३५.०००/-
  7. स्विकासलेली रक्कम : ३५,०००/-

थोडक्यात माहिती - यातील तक्रारदार हे मेकर आर्केड शॉपिंग सेंटर, कफ परेड, मुंबई ०५ येथे सोसायटी मॅनेजर म्हणुन काम करीत आहेत. दि. ०९/०३/२०२१ रोजी तक्रारदार है सोसायटीच्या ऑफीस मध्ये असताना सहा. अभियंता ( जलकामे ) अं विभाग, जलमापक विभाग व जलदेयके विभाग, ६ वा मजला बृहन्मुंबई महानगरपालिका, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई या कार्यालयातील आरोपी लोकमेवक हे तक्रारदार यांना भेटून मेकर आर्केड शॉपिंग सेंटरमधील एका दुकानाचा वॉटर रीडींग मीटर बऱ्याच दिवसापासुन नादुरूस्त असल्यामुळे संबंधित दुकानदाराला पाण्याच्या बिलाची नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगितले तसेच दंडाची स्क्कम सुमारे रू. २,००,०००/- एवढी होईल असे सांगुन बिलाची नोटीस व दंडात्मक कारवाई न करण्याकरीता रु. १,००,०००/- रक्कम भरावी लागेल असे सांगितले. आलोसे यास लाच देण्याची फिर्यादी यांची इच्छा नसल्याने त्यांनी दि. १०/०३/२०२१ रोजी लापवि. मुंबई कार्यालयात लेखी तक्रार दिली.


तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक १२/०३/२०२१ रोजीव्या पडताळणी दरम्यान नोटीस बजावणी व दंडात्मक कारवाई न करण्याकरीता तड़जोडीअंती लोकमेवक यांनी रू. ३५.०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन झाले. त्यानंतर लावण्यात आलेल्या सापळा कारवाईच्या वेळी लोकसेवक संदीप पन्हाळकर यांना तक्रारदार यांच्याकडून रूपये ३५.०००/- लाचेची रक्कम स्थिकारताना सगोहात पकडल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भष्ट्राचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाकडे संपर्क साधावा. 

 लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग, ९१, सरपोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई- ३०.

संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in

ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन- www.acbmaharashtra.net

टोलफ्री क्र.१०६४

दूरध्वनी क्र.०२२-२४९२१२१२,

फॅक्स क्र.०२२-२४९२२६१८,

व्हॉट्स अॅप क्रमांक-९९३०९९७७००


वैशाली गोरडे

सहाय्यक पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिवधक विभाग, मुंबई


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

पंचायत समितीच्या ढिसाळ कारभारामुळे ग्रामविकास अधिकारी नसल्याने मांजरम ग्राम पंचायतला संतप्त नागरिकांनी कुलूप ठोकले

 


नायगाव,दि १२ : मांजरम ग्राम पंचायतला गेल्या पंधरा दिवसापासून ग्रामविकास अधिकारी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी,शेतकरी,व जनतेच्या कामाच्या अडचणी वाढल्या असून संतप्त ग्रामस्थांनी महाशिवरात्रीच्या दिनी ग्राम पंचायतला कुलूप ठोकून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

     मांजरम येथील ग्राम पंचायतला ग्रामविकास आधिकारी पंधरा दिवस झाले नसल्यामुळे सर्वेसामन्य नागरीकांचे व विद्यार्थ्यांचे दोनशे आडीशे फार्म ,शेतकऱ्याच्या कृषी योजनेच्या कामातील अडथळे निर्माण झाले असून,अनेकांच्या कामाच्या फाईली ग्रामपंचायत येथे पडुन आहेत त्यामूळे नागरीकांचे बेहाल होत आहेत .

----------------------–---------------------

     या विषयी गटविकास अधिकारी पी.पी.फाणजेवाड यांच्या शी दोन दिवसा पूर्वी संपर्क केला असता तत्कालीन ग्रामसेवक सुधाकर वडजे यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी पाटील ग्रामसेवक हे मुगाव हुन मांजरम वर बदलीच्या जागी आले असून येत्या दोन दिवसात चार्ज घेतील असे सांगितले.या विषयी नूतन ग्रामसेवक पाटील यांना बोलले असता येत्या शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात पदभार घेण्या साठी येणार असल्याचे सांगितले.

---------------------------------------------

      या विषयी पंचायत समीती येथील गटविकास आधिकारी यांना वेळोवेळी फोन वर कल्पना देवुनही आजुन जुने ग्रामसेवक सुधाकर वडजे हे पदभार देत नाहीत या मुळे नवे ग्रामसेवक पाटील 2 मार्च रोजी आर्डर निघुनही आलेले नाहीत.गावकऱ्यांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागले.पूर्वीचे ग्रामसेवक वडजे हे अनेकांना उद्धट बोलल्याच्या तक्रारी ही ऐकण्यात आल्या.त्यामूळे गावातील संतप्त नागरीकांनी ग्रा.पं.मांजरमला कुलुप लावले आहे.

कुलुप लावते वेळी माजी ग्रा प सदस्य पत्रकार शिवाजी पा.शिंदे (शिवसेना सर्केल प्रमुख),तसेच दिलीप दीगबर पा.शिंदे

विठ्ठल शेट्टेवाड (ग्रां.प.सदस्य.प्र),

संजय जाधव (ग्रा.प.सदस्या.प्र),

गोविंद उलगुलवाड (ग्रां.प.सदस्य.प्र),

शेषेराव वाकरडे व महिला उपस्थीत होते.

*****************************************

ग्रामविकास अधिकारी नाही हे वरिष्ठांना तात्काळ सांगूनही कार्यवाही न झाल्याने हा प्रसंग ओढवला_ सरपंच शोभाबाई मांजरमकर

 मांजरम ग्रामपंचायत च्या नूतन सरपंच शोभाबाई निळकंठ मांजरमकर याना संपर्क केला असता ग्रामविकास अधिकारी नसल्याने कामे खोळंबत आहेत त्वरित नवीन ग्रामसेवकाला जुन्या ग्रामसेवकांनी पदभार देण्या साठी सांगावे असे गटविकास अधिकारी पी.पी. फाणजेवाड, विस्तार अधिकारी कांबळे, यांना सांगितले .येत्या दोन दिवसात पदभार दिला जाईल नाही दिल्यास कार्यवाहीचे आश्वासन गटविकास अधिकारी याना दिल्याने शुक्रवारी पदभार होणार आहे असे ग्रामस्थांना मी कळवले . संबंधितांना कळवून ही लवकर कार्यवाही झाली नसल्याने हा प्रकार घडला आहे.


ग्रामसेवकाची एका ग्रामपंचायत मधून बदली होऊन त्या ठिकाणी दुस-या ग्रामसेवकाची नेमणुक केल्यानंतर पुर्वीच्या ग्रामसेकाने नवनियुक्त ग्रामसेकास सात दिवसांच्या आत पदभार देणे बंधनकारक आहे,मग दोन तारखेची नियुक्ती आदेश असताना बारा तारिख आली तरी पदभार का झाला नाही,यात विस्तार अधिका-याची भुमिका महत्वाची असते, ग्रामसेवक नसल्याने, वेळेत पदभार झाला नसल्याने संतप्त ग्रामस्थांना ग्रापंचायतीला कुलुप लावण्याची वेळ आली,या गैर कृत्याबद्दल गटविकास अधिकारी हे विस्तार अधिका-यासह संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करतात की पाठिशी घालतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.

www.zpnanded.in

www.maharashtra.gov.in

#tag : ग्रामपंचायत पदभार


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कृषी कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांनी "ऋण समाधान योजना" कर्जमाफीचा लाभ घ्यावा_एसबीआय मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार

 


नांदेड, दि.12 : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने नोव्हेंबर २०२० पासून कृषी कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या कर्जमाफीचे नाव "ऋण समाधान योजना " असे आहे. ऋण समाधान योजनेत, कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण व्याज माफ केले जात असून उचललेल्या कर्जातील मुद्दलापैकी १० ते २० टक्के रक्कम बँकेत भरणा करून कर्ज मुक्त होता येणार आहे. यासाठी कर्जाची रक्कम किमान दोन वर्षांपूर्वी थकीत असेल तर थकबाकीदार लाभास पात्र ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक ३१ जानेवारी २०२१ ही शेवटची तारीख या पुर्वी जाहिर करण्यात आली होती. आता या तारखेत वाढ करण्यात आली असून ३१ मार्च २०२१ ही शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे. 


तेंव्हा अधिक अधिक थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे. असे आवाहन  स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक श्री शंकर येरावार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिले जाणार आहे. असही मुख्य व्यवस्थापक येरावार यांनी आकाशवाणीशी बोलतांना सांगीतलं. यापुर्वी राज्यातील भाजप सरकारने मुद्दल आणि व्याजाच्या रक्कमेसह दिड लाख रुपयांपर्यंतचे तर विद्यमान महाविकास आघाडी सरकारने मुद्दल आणि व्याजासह दोन लाख रुपयांची शेती कर्जमाफी दिली होती. त्या पुढील रक्कमेच्या थकबाकीदारांना दोन्ही कर्ज माफीचा लाभ मिळाला नव्हता. तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थकीत शेती कर्ज खातेदारांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या SBI बँकेशी भेट द्या.

https://www.onlinesbi.com/

PM Mudra Yojana

https://sbi.co.in/web/business/sme/sme-loans/pm-mudra-yojana

AGRICULTURAL & RURAL_ Agriculture Banking

Crop Loan

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan

Kisan Credit Card

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card

Gold Loan

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/gold-loan

Multi Purpose Gold Loan

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/gold-loan/multi-purpose-gold-loan

Farm Mechanization Loan

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/farm-mechanization-loan

Missed call account balance check number 9223866666



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कलाक्षेत्रातील सावित्री ज्योती पुरस्काराने प्रोत्साहन वाढले-अभिनेत्री सायली वाघमारे

 


सांगली- मोहोळ तालुका समता परिषदेच्या वतीने जो आद्यशिक्षिका व महिला भगिनींच्या प्रेरणास्थान सावित्रीमाईई फुले यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून 'एक गाव तेरा भानगडी'वेब सिरीज मधून माझा जो नावलौकिक झाला,त्यामुळे मला कलाक्षेत्रातील सावित्री ज्योती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले,त्यामुळे मला पुढील कार्यास प्रोत्साहन मिळाले असल्याचे नवोदित अभिनेत्री सायली वाघमारे यांनी सांगितले. 

      अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मोहोळ तालुका यांच्या वतीने सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.यात नागज येथील नवोदित अभिनेत्री सायली वाघमारे हिला समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अमोल माळी व पत्रकार सावता जाधव यांच्या हस्ते सावित्रीज्योती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी उपसरपंच अण्णाप्पा वाघमारे,आकाश जाधव,उल्हास मलमे,शारदा वाघमारे,सारिका वाघमारे,आनंदा माळी,किरण पासले आदी उपस्थित होते. तिच्या या पुरस्कारामुळे तिच्या सर्व टीमने,शाळेतील सर्व मित्र-मैत्रिणी, गुरुजनाकडून व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

पुण्याच्या गुंड गजा मारणेला सातारा पुलीसांनी 'सिंघम'स्टाईल कसं पकडलं

 


पुणे , 



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

दुष्काळग्रस्त/टंचाईग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती योजनेबाबत आवाहन

 

नांदेेड, दि. 10 :- सन 2017-18 व 2018-19 मधील खरीप हंगामातील / दुष्काळग्रस्त भागातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा शुल्क माफीस पात्र तथापि अद्याप परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती झालेली नाही अशा विद्यार्थ्यांनी स्वत:च्या / पालकाच्या आधार संलग्न बॅक खात्याच्या माहितीसह संबंधित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.   


तसेच सन 2019-20 मधील अवेळी पावसामुळे बाधित क्षेत्रातील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या कार्यवाहीसाठी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित करण्यात आले आहे. संबंधितांनी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाशी संपर्क साधावा. याबाबतची तपशीलवार माहिती मंडळाच्या http://mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर इयत्ता दहावीसाठी http://feerefund.mh-ssc.ac.in व इयत्ता बारावीसाठी http://feerafund.mh-hsc.ac.in या लिंकवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, असेही आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com