प्रेसनोट - 1375
दिनांक : १२/०३/२०२१
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : मुंबई विभाग
- गुन्हा नोंद क्रमांक : १४/२०२१
- कलम : कलम ७ भ. प्र. अधिनियम १९८८
- आरोपीचे नाव व कार्यालय : संदीप ज्ञानदेव पन्हाळकर वय ३९ वर्षे
- धंदा कामगार ( नेमणुक - सहा. अभियंता (जलकामे) अ विभाग, जलमापक विभाग व जलदेयके विभाग, ६ या मजला बुहन्मुंबई महानगरपालिका, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई ४००००१)
- मागणी केलेली लाचेची रक्कम : र.३५.०००/-
- स्विकासलेली रक्कम : ३५,०००/-
थोडक्यात माहिती - यातील तक्रारदार हे मेकर आर्केड शॉपिंग सेंटर, कफ परेड, मुंबई ०५ येथे सोसायटी मॅनेजर म्हणुन काम करीत आहेत. दि. ०९/०३/२०२१ रोजी तक्रारदार है सोसायटीच्या ऑफीस मध्ये असताना सहा. अभियंता ( जलकामे ) अं विभाग, जलमापक विभाग व जलदेयके विभाग, ६ वा मजला बृहन्मुंबई महानगरपालिका, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई या कार्यालयातील आरोपी लोकमेवक हे तक्रारदार यांना भेटून मेकर आर्केड शॉपिंग सेंटरमधील एका दुकानाचा वॉटर रीडींग मीटर बऱ्याच दिवसापासुन नादुरूस्त असल्यामुळे संबंधित दुकानदाराला पाण्याच्या बिलाची नोटीस काढून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सांगितले तसेच दंडाची स्क्कम सुमारे रू. २,००,०००/- एवढी होईल असे सांगुन बिलाची नोटीस व दंडात्मक कारवाई न करण्याकरीता रु. १,००,०००/- रक्कम भरावी लागेल असे सांगितले. आलोसे यास लाच देण्याची फिर्यादी यांची इच्छा नसल्याने त्यांनी दि. १०/०३/२०२१ रोजी लापवि. मुंबई कार्यालयात लेखी तक्रार दिली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक १२/०३/२०२१ रोजीव्या पडताळणी दरम्यान नोटीस बजावणी व दंडात्मक कारवाई न करण्याकरीता तड़जोडीअंती लोकमेवक यांनी रू. ३५.०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन झाले. त्यानंतर लावण्यात आलेल्या सापळा कारवाईच्या वेळी लोकसेवक संदीप पन्हाळकर यांना तक्रारदार यांच्याकडून रूपये ३५.०००/- लाचेची रक्कम स्थिकारताना सगोहात पकडल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भष्ट्राचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाकडे संपर्क साधावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग, ९१, सरपोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई- ३०.
संकेतस्थळ - www.acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन- www.acbmaharashtra.net
टोलफ्री क्र.१०६४
दूरध्वनी क्र.०२२-२४९२१२१२,
फॅक्स क्र.०२२-२४९२२६१८,
व्हॉट्स अॅप क्रमांक-९९३०९९७७००
वैशाली गोरडे
सहाय्यक पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिवधक विभाग, मुंबई
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता