शुक्रवार, मार्च १२, २०२१

कृषी कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांनी "ऋण समाधान योजना" कर्जमाफीचा लाभ घ्यावा_एसबीआय मुख्य व्यवस्थापक शंकर येरावार

 


नांदेड, दि.12 : स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने नोव्हेंबर २०२० पासून कृषी कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जमाफी योजना सुरू केली आहे. या कर्जमाफीचे नाव "ऋण समाधान योजना " असे आहे. ऋण समाधान योजनेत, कर्जदार शेतकऱ्यांना संपूर्ण व्याज माफ केले जात असून उचललेल्या कर्जातील मुद्दलापैकी १० ते २० टक्के रक्कम बँकेत भरणा करून कर्ज मुक्त होता येणार आहे. यासाठी कर्जाची रक्कम किमान दोन वर्षांपूर्वी थकीत असेल तर थकबाकीदार लाभास पात्र ठरणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक ३१ जानेवारी २०२१ ही शेवटची तारीख या पुर्वी जाहिर करण्यात आली होती. आता या तारखेत वाढ करण्यात आली असून ३१ मार्च २०२१ ही शेवटची तारीख ठेवण्यात आली आहे. 


तेंव्हा अधिक अधिक थकबाकीदार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्ज मुक्त व्हावे. असे आवाहन  स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नांदेड क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य व्यवस्थापक श्री शंकर येरावार यांनी केलं आहे. विशेष म्हणजे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्ज दिले जाणार आहे. असही मुख्य व्यवस्थापक येरावार यांनी आकाशवाणीशी बोलतांना सांगीतलं. यापुर्वी राज्यातील भाजप सरकारने मुद्दल आणि व्याजाच्या रक्कमेसह दिड लाख रुपयांपर्यंतचे तर विद्यमान महाविकास आघाडी सरकारने मुद्दल आणि व्याजासह दोन लाख रुपयांची शेती कर्जमाफी दिली होती. त्या पुढील रक्कमेच्या थकबाकीदारांना दोन्ही कर्ज माफीचा लाभ मिळाला नव्हता. तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या थकीत शेती कर्ज खातेदारांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी जवळच्या SBI बँकेशी भेट द्या.

https://www.onlinesbi.com/

PM Mudra Yojana

https://sbi.co.in/web/business/sme/sme-loans/pm-mudra-yojana

AGRICULTURAL & RURAL_ Agriculture Banking

Crop Loan

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan

Kisan Credit Card

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/crop-loan/kisan-credit-card

Gold Loan

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/gold-loan

Multi Purpose Gold Loan

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/gold-loan/multi-purpose-gold-loan

Farm Mechanization Loan

https://sbi.co.in/web/agri-rural/agriculture-banking/farm-mechanization-loan

Missed call account balance check number 9223866666



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता