गुरुवार, मार्च ०४, २०२१

देगाव येथील शिक्षकावर पॉकसो अंतर्गत कुंटुर पोलिसात गुन्हा दाखल

 


नायगाव : विद्यार्थिनी सोबत अश्लिल वाटसप चॅटिंग , वर्गात जवळीक साधने व बस मध्ये मुलीसोबत छेडछाड करण्याच्या प्रकरणावरून नायगाव तालुक्यातील एका शाळेच्या शिक्षकांला कुंटुर पोलिसांनी ताब्यात घेऊन या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केले आहे.या प्रकारावरून नायगाव तालुक्यात खळबळ उडाली असून ऑनलाइन शिक्षणात अश्लीलतेचा हा चाभरा प्रकार घडल्याने पालक वर्गात संतापाची लाट पसरली आहे.
नायगाव तालुक्यातील देगाव येथील पूज्य साने गुरुजी च्या नावाने चालणाऱ्या विद्यालयतील शिक्षक यांनी आपल्याच शाळेतील विद्यार्थिनी सोबत वाटसप वर परीक्षेत गुण वाढवून देतो या नावाखाली अश्लील विषयाची मागणी व वाटसप चॅटिंग टाकल्याची तक्रार विद्यार्थिनींनी केल्याचा प्रकार मंगळवार दिनांक 2 मार्च रोजी घडला. तर त्याच शाळेत शिकून इतरत्र शिक्षण घेणाऱ्या दुसऱ्या एका मुली सोबत याच शिक्षकाने बस मध्ये अश्लील छेडछाड केल्याची याच तक्रारीत नोंद केल्याने सदर शिक्षका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबद सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातील देगाव येथील शिक्षक बापूराव श्रीपतराव मोरे रा देगाव वय 48 यांनी आपल्याच शाळेतील इयता नववी मध्ये शिकणाऱ्या मुलीस वाटसप वर मार्क जास्त टाकतो म्हणून काही विषयाची मागणी केली व ऑफलाईन शाळेत जवळीकता साधली असा आरोप तक्रारीत करण्यात आला असून त्या मुलीच्या बहिणीला ही बस मध्ये छेडले असा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणात कुंटुर पोलिसात 354 ड 12 , 65,अनुसुचित जाती कलम 3 (1),(w),(1)..3(1) (w) !! प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे कुंटुर सपोनि पठाण साहेब यांनी सांगितले आहे.पुढील तपास पोलोस उपअधीक्षक बिलोली हे करीत आहेत.


✍️✍️✍️


संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर


7767912933


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.


👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window


www.nandednewsupdate.blogspot.com

कुंटुर येथे प्रशासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न,अनेक तक्रारी नोंदवून घेतल्या...पांदन रस्ता,घरकुल,सर्व कामे करु_गजानन शिंदे



नायगाव : तालुक्यातील कुंटूर येथील जिल्हा परिषद शाळेत प्रशासन आपल्या गावी अभियानांतर्गत विवीध प्रमाणपत्र पत्र वाटप करण्यात आले.प्रशासन आपल्या गावी या अभियानाअंतर्गत कुंटुर येथील शाळेत हा कार्यक्रम राबवला आला. यावेळी उपस्थित विविध कामांचा तक्रारी तहसीलदार गजानन शिंदे यांच्या कडे लेखी निवेदन देण्यात आले.

   यावेळी राशन कार्ड, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र,विधवा महिलांना सहाय्यक अनुदान वाटप करण्यात आले.बचत गटाचे वस्तू ची प्रदर्शन प्रशिद असलेली मेंढिचा केसा पासुन बनवलेली घोंगडी ,वुलन चे वस्तू, आस अनेक वस्तू चे प्रदर्शन आयोजित केले होते. 

   या अभियानात सहभागी तहसीलदार गजानन शिंदे, पुरवठा विभाग कारखुन आलमवाड सर, संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ योजना अवलकारखुन मोरे सर,

गजानन शिंदे तहसीलदार नांयगाव, नंदकुमार भोशीकर नायम तहसीलदार, फांजेवाड सर गटविकास अधिकारी पं सं नायगाव,शिंगाडे कृषी अधिकारी नायगाव,बि डी नांदगावकर उप अभियंता प्रकल्प उप वि..राजुरे एकात्मिक बाल विकास नायगाव,आर के परोडवाड तलाटि,शेख नवाज मंडळ अधिकारीकुंटुर,बचत गट नायगाव तालुका अभियान यवसथापक अमोल जोंधळे सर, बाबु. डोळे, तुकाराम देवकांबळे, कुंटुर येथील समुह संसाधन व्यक्ती रेखाताई अनिल कांबळे कुंटुर, डॉ.धोतरे पशुवैद्यकीय अधिकारीकुंटुर,विज वितरण कंपनीचे कर्मचारी तेलंग, ग्रामसेवक कुंटुर, कुंटुर येथील नागरिकांनी पांदन रस्ता बनवण्यात यावा, शमसानभुमी शेड उभारले जावे, गावात पाणी पुरवठा योजनेचे काम लवकर पूर्ण करणे, नळ योजना रखडली, शेतातातील चारी व नाला सरळकरण करणे, अपंग व्यक्तींना घरकुल योजना, व्यवसाय करण्यासाठी दुकान देने, बचत गटांना जागा देणे, श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजना राबविणे आस तक्रारी नोंदवून घेण्यास आल्या व त्या सोडवीलया जातील असे आश्वासन दिले आहे. ‌गावातील व परिसरातील नागरिक उपस्थित होते.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

आ.राजेश पवार साहेब यांनी आज विधानसभेत मांडलेले काही विशेष व महत्वपूर्ण मुद्दे

 


   1)*_कुंटूर पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक (API) करीम पठान यांच्यावर आतापर्यंत ही कसल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस अधीक्षक साहेब यांना मागील 15 दिवसांपासून त्यांच्याविरूध्द videos, माहिती देण्यात आली असून ही._

 

2)*_येणार्या अर्थसंकल्पामध्ये असे जे (API _करीम पठान) सारखे अधिकारी आहेत, ज्यांना urgent मध्ये 'टाटा किंवा बिरला' व्हायचं त्याना त्वरित निलंबित करून त्यांच्यासाठी विशेष निधीचं प्रायोजन करावं ही मागणी!_


3)*_नांदेड जिल्ह्यात फक्त 3 "पशुवैद्यकीय रुग्णवाहिका" आहेत, विनंती आहे की 16 तालूक्यांना ही पशुवैद्यकीय रुग्णवाहिका देण्यात यावी._


4)*_पांदण रस्त्याचं रूपांतर former road करूण यांना नंबर द्यावा व विशेष निधी घेऊन एक विशेष मोहीम 'पांदण रस्त्यांसाठी' राबवावी ही विनंती._


5)*_ग्रामीण भागामध्ये 'जिल्हा परिषद शाळेंचे' नविन खोल्या Reparing आणि अंगणवाडी खोलीसाठी सुद्धा तरतूद करावी ही विनंती._


6)*_उर्जा खात्याला विनंती आहे की , आपण जे जुने 'केबल कंडक्टर' आहेत ते बदलण्यासाठी विशेष निधीची तरतूद येणार्या अर्थसंकल्पामध्ये करावी ही विनंती._



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

घोड्यावर येण्याचे निवेदन फेटाळत जिल्हाधिकारी यांनी त्या कर्मचाऱ्याला दिली तंबी

 


नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. त्याला कारणही तसंच खास आहे.

नांदेड ४ मार्च २०२१

हायलाइट्स:

  • नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.
  • कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.
  • अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यात

नांदेड : नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सेवेत असलेले सतिष पंजाबराव देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक अजब विनंती केली असून देशमुख यांचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या पत्राने जिल्हाधिकारी बुचकळ्यात पडले आणि त्यांच्यावरही मग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे याबाबत सल्ला मागण्याची वेळ आली. 

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात कार्यालयीन वेळेत घोडा बांधण्याची परवानगी सतिष देशमुख या अधिकाऱ्याने आपल्या पत्रात मागितली आहे. देशमुख यांच्या पत्रात मोजकाच पण जिल्हाधिकाऱ्यांना चक्रावून टाकणारा मजकूर आहे. या सगळ्यामागे देशमुख यांनी दिलेलं कारणही अजब आहे.

'मी सतिष पंजाबराव देशमुख, सहाय्यक लेखाधिकारी (रोहयो शाखा) जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कार्यरत आहे. मला पाठीच्या कण्याचा त्रास होत असल्यामुळे टू व्हिलरवर येण्यास त्रास होत आहे. त्यामुळे मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. घोड्यावर बसून विहित वेळेत कार्यालयामध्ये येणे मला शक्य होईल. मी घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी देण्यात यावी, ही विनंती.' असे पत्र देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले असून त्यानंतर पुढे बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत.

मेडिकल कॉलेजचा घेतला सल्ला

सतिष देशमुख यांच्या अजब मागणीमुळे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. त्यांनी मग डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्याकडे हे पत्र पाठवलं व सल्ला मागितला. तेथील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाने या पत्राच्या अनुषंगाने आपला सल्ला दिला असून तो सल्लाही खासच आहे. 'पाठीच्या कण्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी घोड्यावर प्रवास केल्यास आणखीन आदळ आपट होते. त्यामुळे मणका दबण्याची, मणक्यातील गादी दबण्याची तसेच सरकण्याची शक्यता असते. त्यामुळे पाठीच्या कण्याचा आजार कमी न होता तो वाढण्याची दाट शक्यता आहे', असे त्यात नमूद करण्यात आले असून तसे अधिष्ठातांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सतिष देशमुख यांची विनंती फेटाळताना त्यांना चांगलीच तंबी दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

महसूल मंत्र्यांच्या आश्वासनानंतर अवैध वाळू उपसा विरोधातील नायगावचे आ.पवार व लक्ष्मण पवार यांचे उपोषण मागे

 


मुंबई : अवैध वाळू उपसा विरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर 5 तासांपासून अधिक काळ आमदारांनी आंदोलन केलं. सकाळी 11 वाजेपासून आमदारांचं हे आंदोलन सुरु होतं. आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार आंदोलनासाठी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले होते. अखेर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांची भेट घेऊन विषय जाणून घेतला आणि त्यांचं महसूलमंत्र्यांशी बोलणं करुन दिलं.(MLA’s agitation on the steps of Vidhan Bhavan against illegal sand extraction)

राज्यातील वाळू माफियांना राजकीय वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप आमदार लक्ष्मण पवार आणि आमदार राजेश पवार यांनी केला आहे. बाळासाहेब थोरात महसूलमंत्री असताना हा विषय मोठा झाला आहे. सरकार बदललं तसं यांचं धोरणही बदललं असल्याचं आमदारांनी म्हटलंय. मध्यम वर्गालाही वाळूच्या लिलावात सहभागी होता यावं. गरिबांच्या घरांसाठी 6 ब्रास वाळू मोफत मिळाली पाहिजे, अशा मागण्या या आमदारांनी केल्या आहेत. सकाळी 11 वाजेपासून या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. देवेंद्र फडणवीस हे देखील दुपारी आमदारांची भेट घेतली आणि विषय जाणून घेतला.

फडणवीसांनी आमदार लक्ष्मण पवार आणि राजेश पवार यांचं महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी फोनवर बोलणं करुन दिलं. अवैध वाळू उपसा प्रश्नावर बैठक लावण्याचं आश्वासन महसूलमंत्र्यांनी दिलं आहे. त्यानंतर या आमदारांनी आपलं आंदोलन संपवलं.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कांडाळा येथील आई व मुलास खुन प्रकरणात जन्मठेप व ५ हजार दंडाची शिक्षा ◆बिलोली येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल

 


नायगाव (दि. ४ मार्च) : कांडाळा ता.नायगाव येथील आरोपी संभाजी रामचंद्र पिल्लेवाड व रेणुकाबाई रामचंद्र पिल्लेवाड यांना माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. विक्रमादित्य मांडे यांनी सत्र खटला क्रमांक ३९/२०१८ मध्ये कलम ३०२, ३४ भा.द.वि. अन्वये आजन्म कारावास (जन्मठेप) व प्रत्येकी ५,०००/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

      दि. २३/०८/२०१८ रोजी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास मयत रामचंद्र पिल्लेवाड हा आपल्या घरासमोर बसला असता त्याची पत्नी रेणुकाबाई व मुलगा संभाजी तिथे आले, रामचंद्र दुसरा मुलगा याचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे त्याचे इन्शुरन्सचे पैसे येणार होते त्यावररुन त्यांच्यात वाद झाला. नंतर आरोपी रेणुकाबाई हिने रामचंद्रवर रॉकेल ओतले व संभाजीने रामचंद्रला पेटवुन दिले तेंव्हा रामचंदचा भाऊ दिगांबर व पुतणी यांनी रामचंद्राची आग बुझविण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात रामचंद्रचा मृत्यू झाला. सदरील घटनेची फिर्याद भाऊ दिगांबर पिल्लेवाड यांनी रामतीर्थ पोलीस स्टेशन येथे दिली. पोलीसांनी तपास करुन आरोपी विरुध्द बिलोली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. माननीय न्यायालयाने सरकार पक्षातर्फे दिलेला पुरावा व युक्तीवाद विचारात घेवुन कलम ३०२, ३४, भा.द.वि. अन्वये आरोपी संभाजी रामचंद्र पिल्लेवाड व रेणुकाबाई भू, रामचंद्र पिल्लेवाड यांना जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास तिन महिन्याची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणात सराकर पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील श्री. एस. बी. कुंडलवाडीकर व पैरवीकार पोलीस नाईक श्री. प्रशांत लक्ष्मणराव केसराळीकर ब. नं. ३५८ यांनी काम पाहिले.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

हालाखीची आयुष्य जगणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला ब्राह्मण संघाने दिला मदतीचा हात

 


पुणे : कर्जाचा डोंगर घेऊन दोन खोलीच्या घरात हालाखीची आयुष्य जगणाऱ्या ज्येष्ठ दाम्पत्याला ब्राह्मण संघाने मदतीचा हात दिला. महासंघाच्या वतीने ज्येष्ठ दाम्पत्याला रोख पंधरा हजार रक्कम तसेच, पुढील महिने पुरेल एवढं किराणा साहित्य, वैद्यकीय सेवा देण्यात आली.

विश्वनाथ सोमण (81) व अपर्णा सोमण (74) असे या दाम्पत्याचे नाव आहे. सिंहगड रोड, नऱ्हे येथील दोन खोलीच्या घरात ते राहत आहेत. एकेकाळी उत्तम परिस्थिती असलेल्या या कुटुंबाची अवस्था सध्या अतिशय बिकट आहे. मुलगा सून यांनी त्यांना बाजूला लोटलं. तरीही हार न मानता हृदयरोग, कर्करोग सारख्या आजारांनी ग्रासले असतानाही त्यांनी घरगुती खाद्य पदार्थाचा व्यवसाय सुरु करुन उदरनिर्वाह चालवला. पण, कोरोनामुळे त्यांच्या उपजीविकेचे साधन पूर्ण बंद झाले.

सोमण यांनी डॉ. गोविंद कुलकर्णी यांना पत्र लिहून मदतीची विनंती केली. महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमण यांची भेट घेऊन रोख पंधरा हजार रक्कम तसेच, पुढील महिने पुरेल एवढं किराणा साहित्य, वैद्यकीय सेवा देण्यात आली.

या उपक्रमाला अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, राष्ट्रीय युवा अध्यक्ष लक्ष्मीकांत धडफळे, जिल्हाध्यक्षा महिला आघाडी केतकी कुलकर्णी, सुनील शिरगांवकर, सुयोग नाईक, गिरीश कुलकर्णी, प्रिया काळे, पराग महाशब्दे, सरचिटणीस दीपिका बापट, स्वरस्वती जोशी, शिल्पा महाजनी, मनीष जोशी, हेमंत कासखेडीकर, सुधाकर मोडक, मंदार रेडे यांनी आर्थिक मदत केली. श्रीकांत देशपांडे, विकास अभ्यंकर यांनी किराणा साहित्य दिले. वारजे शाखेच्या उपाध्यक्षा शैला सोमण यांनी सोमण परिवारातर्फे त्यांना मदतीचे आश्वासन दिले, नाना काटे व ज्येष्ठ नागरिक संघातर्फे पुढील तीन महिने जेवण्याच्या डब्याची तयारी दर्शवली.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

महाराष्ट्र आर्थिक पाहणी २०२०-२१ चा अहवाल ५ मार्च २०२१ ला होणार सादर

 राज्य शासनाच्या व सांख्यिकी संचालनालयाच्या संकेतस्थळावर अहवाल उपलब्ध

मुंबई, (दि.3 मार्च) : राज्याचा सन 2020-21 या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल दि. 5 मार्च 2021 रोजी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री.अजित पवार हे विधिमंडळात सादर करणार आहेत. पत्रकार व अभ्यासकांसाठी हा अहवाल अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या mahades.maharashtra.gov.in तसेच http://mls.org.inhttps://www.maharashtra.gov.inhttps://www.finance.maharashtra.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे, अशी माहिती अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने दिली आहे.

दरवर्षी राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी एक दिवस अगोदर ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी’ हे प्रकाशन विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर केले जाते. दि.1 मार्च, 2021 पासून सुरु झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21 हे प्रकाशन दोन्ही सभागृहांमध्ये दि.5 मार्च, 2021 रोजी सादर केले जाणार आहे.

यंदाच्या वर्षी सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशने डिजिटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार विधिमंडळात वित्तमंत्र्यांनी ‘महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2020-21’ सादर केल्यानंतर पत्रकार तसेच अभ्यासकांसाठी हा अहवाल डिजिटल स्वरुपात वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे.

Tags: 


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

हरवली आहे किंवा अपहरण : रेश्माला घरी जाण्यास मदत करा! शोध पत्रिका_@hingoliSp

सदरचा फोटो हा ३ वर्षापुर्वीचा आहे.

Maharashtra Police

Maharashtra Police Headquarter

✔@DGPMaharashtra


मंगळवारी

बाळापूर, हिंगोली येथून ८-९ वर्ष वयाची मुलगी हरवली आहे. तिचे वर्णन व माहिती शोधपत्रिकेत दिल्याप्रमाणे आहे.

ही मुलगी आपल्याला मिळून आल्यास नमूद संपर्क क्रमांकावर हिंगोली पोलीस यांना माहिती द्यावी असे आवाहन.@HingoliSp


नांव : रेश्मा गुडडु शाह

पो.स्टेशन : आखाडा बाळापुर ता.कळमनुरी जि.हिंगोली. गु.र.नं. : ५२/२१ कलम ३६३ भादवि.

वय : ८ ते ९ वर्षे

रंग : गव्हाळ

नाक : दोन्ही बाजूला टोचलेले.

गळ्यात: सोनेरी रंगाची प्लॅस्टीक मण्याची माळ

अंगावरील कपडे : पांढऱ्या रंगाचा फ्रॉक व गुलाबी ओढणी 

केस : काळे लांब गुलाबी रंगाची दोरी बांधलेली.

आवडी निवडी : कुरकुरे आवडतात.

भाषा : हिंन्दी,राजस्थानी,आणि थोडी-थोडी मराठी

सदरचा फोटो हा ३ वर्षापुर्वीचा आहे.

खुलासा : वरील वर्णनाची मुलगी ही दि. २२/०२/२०२१ रोजी दुपारचे दरम्यान कामठा (फाटा) आ.बाळापुर जि.हिंगोली (महाराष्ट्र) येथून हरवली आहे किंवा अपहरण करण्यात आले आहे.

तरी वरील वर्णनाची मुलगी मिळून आल्यास हिंगोली पोलिसांना संपर्क करावा. उपयुक्त माहिती देणाऱ्यास आकर्षक बक्षीस देण्यात येईल.


संपर्क

  1. आर.एम.हुंडेकर (स.पो.नि.) पो. स्टे.आ.बाळापुर मो.क्र.8888867757,8459888464
  2. अच्युत मुपडे (पो.उपनि.) पो.स्टे.आ.बाळापुर मो.क्र.6300991779, 
  3. स्था.गु.शा. मो.क्र.8378803004

टिप : रेश्माचे वडिल दोरीवरील मनोरंजनाचे खेळ करतात.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

नांदेडच्या सिईओ श्रीमती आपला परिचययासह ईतर माहिती जि.प.च्या संकेतस्थळावर कधी देणार?

 


नांदेड ( ०४ मार्च) :  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर औरंगाबाद येथील सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांची २४ सप्टेंबर २०२० रोजी निवड झाली. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी (ता.२४) काढले.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची बदली १७ मार्च रोजी झाली होती.तेव्हापासून हे पद रिक्तच होते. दरम्यान प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई होवू नये यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता

वर्षा ठाकूर यांना नुकतीच भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने नियुक्ती मिळाली.या नियुक्तीनंतर त्यांची पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. 
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महिलाच आहे. उपाध्यक्ष देखील महिलाच असून आता सीईओ म्हणूनही महिलाच असणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील महिला राज आता प्रत्यक्षात बघायला मिळणार असे वाटत होते पण तसे होताना दिसत नाही. 

कारण सीईओ यांनी पदभार स्वीकारला तेंव्हा पासून आजपर्यंत जिल्हापरिषदेच्या वेबसाईटवर फक्त त्यांच्या फोटोच पाहायला मिळत आहे, पूर्वी होऊन गेलेल्या आणि आत्ताच्या सीईओंबद्ल सविस्तर माहिती अपलोड करायला पाहिजे होते पण त्याची आवश्यकता वाटत नसावी असेच दिसत आहे.वेबसाईट कधीही 
वेबसाईट मेंटेनन्स वर लाखो रुपये खर्च करून त्यावर शासनाच्या धोरणांची,योजना अंमलबजावणीची माहिती अपडेट केली जात नसेल तर दुस-या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असेच म्हणावे लागेल.वेबसाईटवर कुठलीही माहिती नसल्यामुळे संकेतस्थळाला भेट देणा-यांची संख्या नगण्यच आहे.




✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

राज्य पोलीस दलातील स.पो.आयुक्त,उप.वि.पो.अधिका-यांच्या बदल्या

"सद् रक्षणाय खलनिग्रहनाय"


मुुंबई (०३  मार्च) : महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सहायक पोलिस (police) आयुक्त,उप-विभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज बुधवार दिनांक ०३/०३/२०२१ रोजी गृहविभागाने काढले आहेत. गृहमंत्रालयाने एकूण सात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.यात तीन सहायक पोलीस आयुक्त तर चार उप-विभागीय पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे,यात दोन महिला अधिकारी आहेत.


बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आणि कंसात नवीन नियुक्तीचे ठिकाण

  1. अमोल नारायण ठाकूर – (उपविभागीय पोलीस अधिकारी, अहेरी उपविभाग, जिल्हा गडचिरोली)
  2. निलेश श्रीराम पालवे – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
  3. सचिन धोंडीबा थोरबोले – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
  4. प्रमिल प्रफुल्ल गिल्डा – (उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली)
  5. अश्विनी रामदास जगताप – (सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूर शहर)
  6. राजश्री संभाजीराव पाटील – (उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग, जिल्हा सोलापूर)
  7. सुनिल सदाशिव साळुंखे – (उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी उपविभाग, जिल्हा विर्धा)

तसेच दत्तात्रय आनंदराव पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगळवेढा उपविभाग जिल्हा सोलापूर यांची बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या बदलीचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत. 



👇Maharashtra State Police

www.mahapolice.gov.in

The motto of Maharashtra Police is ′सद् रक्षणाय खलनिग्रहणाय′ . It means that Maharashtra Police is committed to ...


'रक्षणकर्ता मास्क माणसा तुझिया आयुष्याचे'!

'जगाच्या पाठीवर' कुठेही मास्क व्यवस्थित लावणाऱ्या व्यक्तींना कोरोनाचा धोका कमी असतो.



✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कै.यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प सर्वसाधारण सभेचे आयोजन_सचिवाचे संबंधितांना आवाहन

 


जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 5 मार्चला

नांदेड (दि. 3 मार्च) :- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवार 5 मार्च 2021 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृहजिल्हा परिषदनांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.


👉जिल्हा परिषद वेबसाईट🖱️




✍️✍️✍️


संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर


7767912933


बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.


👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window


www.nandednewsupdate.blogspot.com