गुरुवार, मार्च ०४, २०२१

नांदेडच्या सिईओ श्रीमती आपला परिचययासह ईतर माहिती जि.प.च्या संकेतस्थळावर कधी देणार?

 


नांदेड ( ०४ मार्च) :  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागेवर औरंगाबाद येथील सनदी अधिकारी वर्षा ठाकूर यांची २४ सप्टेंबर २०२० रोजी निवड झाली. सामान्य प्रशासन विभागाने त्यांच्या बदलीचे आदेश गुरुवारी (ता.२४) काढले.
तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांची बदली १७ मार्च रोजी झाली होती.तेव्हापासून हे पद रिक्तच होते. दरम्यान प्रशासकीय कामामध्ये दिरंगाई होवू नये यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला होता

वर्षा ठाकूर यांना नुकतीच भारतीय प्रशासन सेवेमध्ये पदोन्नतीने नियुक्ती मिळाली.या नियुक्तीनंतर त्यांची पहिल्यांदाच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निवड झाली. 
विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष महिलाच आहे. उपाध्यक्ष देखील महिलाच असून आता सीईओ म्हणूनही महिलाच असणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेवरील महिला राज आता प्रत्यक्षात बघायला मिळणार असे वाटत होते पण तसे होताना दिसत नाही. 

कारण सीईओ यांनी पदभार स्वीकारला तेंव्हा पासून आजपर्यंत जिल्हापरिषदेच्या वेबसाईटवर फक्त त्यांच्या फोटोच पाहायला मिळत आहे, पूर्वी होऊन गेलेल्या आणि आत्ताच्या सीईओंबद्ल सविस्तर माहिती अपलोड करायला पाहिजे होते पण त्याची आवश्यकता वाटत नसावी असेच दिसत आहे.वेबसाईट कधीही 
वेबसाईट मेंटेनन्स वर लाखो रुपये खर्च करून त्यावर शासनाच्या धोरणांची,योजना अंमलबजावणीची माहिती अपडेट केली जात नसेल तर दुस-या सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण असेच म्हणावे लागेल.वेबसाईटवर कुठलीही माहिती नसल्यामुळे संकेतस्थळाला भेट देणा-यांची संख्या नगण्यच आहे.




✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता