- गडगा कृषी सहायक पदाचा अतिरिक्त पदभार घेण्यास कुणीही तयार नाही
- गडगा मुख्यालयाचे कृषी सहायक मनुरकर यांची पदोन्नतीने बदली
नायगाव दि 22 जून : तालुका कृषी अधिकारी अधिनिस्त मंडळ कृषी अधिकारी नायगाव, मुख्यालय गडगा येथील कृषी सहाय्यक मनुरकर किशन शंकरराव यांची कृषी सहाय्यक पदावरून (संवर्गातून) कृषी पर्यवेक्षक पदावर(संवर्गात) तदर्थ पदोन्नतीने तालुका कृषी अधिकारी बिलोली अधिनिस्त मंडळ कृषी अधिकारी बिलोली, मुख्यालय बिलोली वर्ग-1 येथे रिक्त पदावर टी एन जगताप सह संचालक कृषी, लातूर विभाग,लातूर यांनी मा.आयुक्त कृषी पत्र क्र.जा.क्र.कृसेभ/संघटना.मा/२००६/आस्था-४/१५९६०/२० दि.१७ मे २०२१ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून ८ जून २०२१ रोजी बदली करण्यात आली आहे.
नायगाव तालुक्यातील नायगाव मंडाळाअंतर्गत येणा-या गडगा मुख्यालयाचे कृषी सहायक किशन मनूरकर यांची बिलोली येथे पदोन्नतीने बदली झाल्याने कृषी सहाय्यक मनुरकर यांना तालुका कृषी अधिकारी भागवत साधू शिंगाडे यांनी १० जून २०२१ रोजी कार्यमुक्त ही केले आहे. त्यानंतर रातोळी मुख्यालयाचे कृषी सहाय्यक नव्हारे हेमराज पांडुरंग यांच्याकडे गडगा येथील रिक्त कृषी सहायकांचे अतिरिक्त पद सांभाळण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी भागवत साधू शिंगाडे यांनी काढले परंतु रातोळी येथील कृषी सहायक नव्हारे यांच्याकडे त्यांच्या मुख्यालयाअंतर्गत येणारी गावे सांभाळणे अवघड होऊन बसल्यामुळे त्यांनी गडगा मुख्यालयाचा अतिरिक्त पदभार घेण्याचे पत्र आजून स्विकारले नाही.
त्यात गडगा मुख्यालयाअंतर्गत येणा-या आठ-दहा गावांचा पदभार त्यांच्याकडे दिल्यामुळे ते हैराण परेशान झाले आहेत.आता ते गडगा मुख्यालयाअंतर्गत येणा-या गावांचा पदभार स्वीकारण की नाही हे पहावे लागणार, तालुका कृषी अधिकारी काय ऍक्शन घेतात ते येणारा काळच ठरवेल.गडगा येथील कृषी सहायकाचे पद रिक्त झाल्यामुळे जोपर्यंत पूर्ण वेळ कृषी सहायक येत नाहीत तोपर्यंत या गावाच्या शेतकऱ्यांना मात्र अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे.कृषी सहायक मनुरकर यांची बदली होणार होती त्याअगोदर त्यांना पर्यवेक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे.त्यांनी जवळपास सहा-सात वर्षे सेवा दिली आहे.मी कधीही पदभार देण्यास तयार आहे.माझ्याकडे यादी तयार आहे असे मनुरकर यांनी सांगितले.
नायगावची एक तालुका कृषी कार्यालय, एक मंडळ अशी अवस्था झाली झाली आहे.याला नेमकं कोण जबाबदार आहे.वरिष्ठांकडे रिक्त पदांचा दरमहिण्याला रिपोर्ट पाठवूनही जर वरिष्ठ अधिकारी,तालुका,जिल्ह्यातील नेते याकडे दुर्लक्ष करत असतील याला काय म्हणायचे शेवटी शेतकऱ्यांचे दुर्दैवच म्हणावे लागेल.तालुक्यात ८९ गावांचा भार १२ कृषी सहायकांवर आहे.आज घडिला कृषी सहायकांची चार पदं रिक्त आहेत.या गंभीर समस्येकडे स्थानिक आमदार, पालकमंत्री यांनी विशेष लक्ष घालून येथे नविन मंडळाची निर्मिती करणे गरजेचे आहे.एकिकडे भारत हा कृषिप्रधान देश आहे म्हणायचे दुसरीकडे त्याच कृषीप्रधान देशाच्या कृषी विभागाकडे दुर्लक्ष करायचे यामुळे कृषी योजनांची अंमलबजावणी कशी होणार.
प्रतिक्रिया
गडगा मुख्यालयाच्या कृषी सहायक पदाचे अतिरिक्त पदभार घेण्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी मला न विचारता पत्र काढले,त्यामुळे मी पत्र घेतलेच नाही तसेच मला न विचारता आदेश काढण्यात आले आहेत,त्यामुळे मनुरकर यांच्याकडून पदभार घेतलेला नाही.गडगा मुख्यालयाअंतर्ग येणारी गावे घ्यायचं की नाही घ्यायचं विचारायला पाहिजे होते,अगोदरच माझेकडे पोकराची ७-८ गावं आहेत.२१ जून रोजी मिटिंग होती,आज तालुका कृषी अधिकारी आले नाहीत,एक दोन दिवसात तालुका कृषी अधिकारी याच्याशी बोलून घेतो.
कृषी सहायक नव्हारे,रातोळी
प्रतिक्रिया
गडगा मुख्यालयाचा अतिरिक्त पदभार घेण्याकरिता नव्हारे यांच्या नावाने आदेश काढले आहेत.आजून चार्ज घेतला नाही, त्यांना चार्ज घ्यावाच लागेल, जॉईन झालेत कागदपत्र द्यायचे आहेत.जास्त गावं सर्वांकडेच आहेत,नायगाव तालुक्यात चार असिस्टंट कमी आहेत.त्यांची गावं कुणाकडेतरी द्यावेच लागतील रिकामे कशी ठेवता येतील,नोकरी आहे करावेच लागणार आहे.कार्यालयाकडून महिण्याला पदं रिक्त असल्याचा वरिष्ठांना रिपोर्ट पाठवत असतो.आजून कुणाच्या बदल्या झालेल्या नाहीत,३० तारखेनंतर असिस्टंटच्या बदल्या होणार आहेत,त्यात असिस्टंट भेटले तर भेटतील.प्रमोशन झाल्यामुळे दोघं जन गेले आहेत,बदल्या होताना असिस्टंट येतील.नविन असिस्टंट भरणार आहेत म्हणे,असिस्टंट च्या बदल्या होणार आहेत.नव्हारे यांचेकडेही पोकराचे गावं आहेत,ही पण गावं पोकराची झालेत,थोडे काही कमी करुन करा म्हणून म्हणतो.दोन-चार गावं कमी करुन दुस-यांना दिली जातील.
तालुका कृषी अधिकारी, नायगाव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता