मंगळवार, मे ११, २०२१

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : PM Kisan Samman Nidhi Yojana; प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे पिएम किसान सम्मान निधि योजनेचा पुढील हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर आज करणार जमा_केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर

केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली माहिती

दिल्ली,दि 11 मे 2021 : प्रधानमंत्री श्री @narendramodi जी, 14 मे 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता #PMKisan योजनेंतर्गत देशाच्या 9.5 करोड शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 8 व्या हप्त्याच्या रुपाने 19,000 हजार करोड रुपये DBT च्या माध्यमातून थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करणार आहेत

हा कार्यक्रम लाइव्ह पाहण्यासाठी खालील लिंकवर रजिस्ट्रेशन करा

https://t.co/8IRCLWb674

https://t.co/EtuyV09Fmf

माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी हे 14 मे 2021 रोजी सकाळी 11:00 वाजता पीएम किसान सम्मान निधि योजने विषयी शेतकऱ्यांसोबत बोलणार आहेत आणि पि एम किसान सम्मान निधि योजनेअंतर्गत पुढील हप्ता टाकणार आहेत.

या कार्यक्रमामध्ये सर्व लाभार्थी शेतकरी

 http://pmindiawebcast.nic.in तसेच दूरदर्शन द्वारे जुडू शकतात.

आपणास या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे,अशी माहिती केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण मंत्री श्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.


6 हजार मिळवायचे असतील तर लवकर नोंदणी करा

जर आपल्याला पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेचे 6 हजार रूपये मिळवायचे असतील तर 31 मार्च पूर्वी नोंदणी करुण घ्या. या योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी आपल्याला आपले सेवा केंद्र किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये ही नावाची नोंदणी करता येऊ शकेल. यासह शेतकरी आपली कागदपत्रं गावातील तलाठी कार्यालयात जमा करुनही नाव नोंदणी करु शकतो.तसेच New farmer registration form वर स्वतः आपल्या नावाची नोंदणी करु शकता.


हप्ता जमा झाला की नाही?

तुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर लॉगिन करुन पैसे जमा झालेत का नाही हे कळू शकेल.

यासाठी Farmer corner मधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.

Beneficiary Status

माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी 14 मई 2021 को दिन में 11:00 बजे किसानों के साथ

बातचीत करेंगे एवं पीएम किसान योजना के तहत अगली किश्त जारी करेंगे। इस कार्यक्रम में

आप pmindiawebcast.nic.in अथवा दूरदर्शन के माध्यम से जुड़ सकते हैं । आप कार्यक्रम में

सम्मिलित होने के लिए सादर आमंत्रित हैं।

आपका,

नरेंद्र सिंह तोमर

कृषि और किसान कल्याण मंत्री









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता