सोमवार, मे १०, २०२१

धक्कादायक : पोलीस स्टेशन मध्ये चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही”;माजी मंत्री काँग्रेस आमदाराची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल;कडक कारवाई करण्याची राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेची कलेक्टर एसपी कडे मागणी


आरोग्य अधिकाऱ्यास धमकावल्याप्रकरणी आमदार रणजित कांबळेवर गुन्हा दाखल

वर्धा, दि 10 मे : वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांना फोन वरून धमकी दिल्या प्रकरणी काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांच्यावर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय सेवा व्यक्ती व संस्था विरोधात हिंसक कृत्ये अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे ठाणेदार सत्यजित बंडेवार यांनी सांगितले आहे.

करोनाच्या संकटामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दररोज नवनव्या समस्यांना सामोरं जावं लागत असून, नातेवाईकांकडूनही हल्ले आणि असभ्य वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र, वर्ध्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. माजी मंत्री आणि काँग्रेसचा आमदार रणजित कांबळे याने थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

Incidence with DHO WARDHA

Telephonic conversation with MLA Ranjit Kamble
Abusive language

वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरणाला वाचा फुटली. डॉ. डवले यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी निवेदन वजा तक्रार दिली आहे. ९ मे रोजी नाचन गाव येथे आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्र काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे याने डवले यांना फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीव मारण्याची धमकी दिली. “तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता… तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे याने धमकावले आहे, असं डवले यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वर्धा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अजय डवले यांनी केली आहे.


Vardha letter







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता