मुंबई : घराच्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या अभियांत्याने 1 लाख 40 हजार रुपयाची लाच मागितली. लाचेचा पहिला हप्ता स्विकारल्यानंतर उर्वरीत रकमेपैकी 50 हजार रुपये खासगी व्यक्तीकडून स्विकारणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर कनिष्ठ अभियंता फरार झाला आहे. ही कारवाई मंगळवार (दि.25) लगून महाकाली रोडवरील एका चहाच्या दुकानासमोर करण्यात आली.
संतोष पवार असे फरार झालेल्या कनिष्ठ अभियंत्याचे नाव आहे. तर अब्दुल आहद खान (वय-43 रा. मार्वे क्रॉस रोड, मालवणी, मलाड (प) मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या खासगी इसमाचे नाव आहे. याप्रकरणी तक्रारदार यांनी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रविवारी (दि.23) तक्रार दाखल केली. पथकाने मंगळवारी (दि.25) सापळा रचून ही कारवाई केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे मालवणी येथे घराचे बांधकाम सुरु आहे. बृहन्मुंबई महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या संतोष पवार याने बांधकामाच्या ठिकाणी येऊन फोटो काढले. हे बांधकाम अवैधरित्या सुरु असल्याचे सांगून भेटण्यास सांगितले. तक्रारदार यांनी संतोष पवार यांची भेट घेतली असता. बांधकामावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपायांची लाच मागितली. तक्रारदार यांनी मे महिन्यात 30 हजार रुपयाचा पहिला हप्ता दिला होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता