गुरुवार, मे २७, २०२१

लाच प्रकरण : लाचखोर वनपालासह वखारचालक 1500 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात

 


 

May 27 2021 5:22AM

सांगली ः कारवाई टाळण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना वन विभागातील वनपाल आणि वखारचालक यांना पेठ नाका येथे पकडण्यात आले. शिराळा वनक्षेत्रपाल कार्यालयातील वनपाल अमोल दत्तात्रय शिंदे (वय 41, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) आणि वखारचालक पांडुरंग रामचंद्र खुडे (वय 37, रा. खंडेश्वर मंदिराजवळ, पेठ, ता. वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांनी दहा दिवसांपूर्वी भाटशेरगाव येथील शेतातील निलगिरीची झाडे तोडून विक्रीकरिता पेठनाका येथील खुडे यांच्या वखारीमध्ये ट्रॅक्टरने आणली होती. त्यावर कारवाई करू नये, यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःसाठी दोन हजार व वनक्षेत्रपाल यांच्यासाठी पाच हजार रुपये आणि प्रत्येक ट्रॉलीसाठी पाचशे रुपयांची मागणी केली होती. त्यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली.

या तक्रारीनुसार पडताळणी केली असता शिंदे व खुडे यांनी यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चेअंती पंधराशे रुपयांवर व्यवहार ठरला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुडे यांच्या वखारीमध्ये सापळा लावला. शिंदे आणि खुडे यांना पंधराशे रुपये घेताना पकडले. या दोघांविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.  

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, पोलिस अंमलदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अविनाश सागर, सलीम मकानदार, श्रीपती देशपांडे, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, अजित पाटील, सोहेल मुल्ला, राधिका माने, वीणा जाधव यांनी ही कारवाई केली.  


२६ - मे - २०२१ इस्लामपूर पोलीस ठाणे गु र नं ३९२/२१ भ्र .प्र .आधी . १९८८ चे कलाम ७, ७ अ , १२ पहा http://acbmaharashtra.gov.in/files/press_release/1482.pdf



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता