
जिल्हा परिषद प्रशासनाने नियमांचे पालन करुन कोरोना सारख्या गंभीर महामारी बाबत सजग राहून 30 टक्केच विश्वासार्हता असलेल्या Antigen चाचणीचा निकाल न लादता RT-PCR चाचणीचा निकाल वेळेत घ्यावा
मांजरम, (दि.14 मार्च) : नायगाव तालुक्यातील मांजरम गटाच्या दबंग महिला जिल्हा परिषद सदस्या पुनमताई राजेश पवार यांनी 17 मार्च रोजीच्या जि.प.अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेच्या 48 तास पूर्वी सर्व जि.प.सदस्यांची,अधिकारी वर्गाची RT-PCR चाचणी संदर्भात योग्य नियोजन करण्याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर यांना 12 मार्च रोजी एक पत्र दिले आहे,पत्राद्वारे त्यांनी 5 मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या दिवशीच घेण्यात आलेल्या कोरोना चाचणी संदर्भात प्रशासन व सत्ताधाऱ्यांच्या नियोजन शून्यतेबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्हा परिषदेला ग्रामिण भागातील मिनी मंत्रालय म्हटले जाते.17 मार्च रोजी नांदेड जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा होणार आहे,या सभेत पुढील वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येतो,या अर्थसंकल्पातील तरतुदींवर सभागृहात चर्चा केली जाते,
हि सभा सर्व सदस्यांसाठी महत्वाची असल्याने आणि सद्या कोरोना महामारीमुळे या सभेला सर्व जि.प सदस्यांना उपस्थित रहाता यावे त्याकरिता सर्व सदस्य व अधिकारी वर्गाची सभेच्या 48 तास अगोदर RT-PCR चाचणी व्हावी अशी विनंती केली आहे.
पत्रात त्यांनी पुढे असे म्हटले आहे की,दि. 05.03.202। रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेसाठी अचानक आदल्या दिवशी संध्याकाळी म्हणजे दि.04.03.2021 रोजी सायं. 4.48 वा. व्हॉट्सअप ग्रुपवर Antigen चाचणी बाबत आलेल्या सुचनेमुळे सभेच्या दिवशी विनाकारण गोंधळ व Confusion झाले. तसेच सभा वेळेतही चालू होऊ शकली नाही. केवळ 30 टक्के विश्वासार्हता असलेल्या त्यांच्या Antigen चाचणी चा निकाल Weakly Positive ठरवल्यामुळे (त्याच वेळेला केलेल्या त्यांच्या दुसऱ्या Antigen चाचणी चा निकाल निगेटीव्ह ही दर्शविला गेला.) त्यांना सभागृह सोडावे लागले. त्याच दिवशी केलेल्या त्यांच्या RT-PCR चाचणीचा 12 तासातील निकाल हा निगेटीव्ह आला.
त्यांनी दि. 05.03.2021 रोजी घेवून आलेल्या जनसामान्यांचे प्रश्न मांडण्याची संधी व न्याय दोन्ही हुकले,काही शुभचिंतकांनी त्यांचे अवमान व्हावे असे मजकूर वर्तमानपत्रातुन छापूनही आणले व त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला,जेव्हा की जिल्हा परिषद प्रशासनाने नियमांचे पालन करुन कोरोना सारख्या गंभीर महामारी बाबत सजग राहून 30 टक्केच विश्वासार्हता असलेल्या Antigen चाचणीचा निकाल न लादता RT-PCR चाचणीचा निकाल वेळेत घेवून सर्व सन्माननीय सदस्यांच्या दि. 05.03.2021 रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या उपस्थिती बाबत निश्चिती करणे आवश्यक होते. याच पध्दतीने परत कुठल्याही सन्माननीय सदस्यांवर कारण नसतांना अन्याय। अवमान होण्याची पाळी,वेळ येऊ नये यासाठी दि. 17.03.2021 रोजी होणाऱ्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेसाठी सर्व सन्माननीय सदस्यांची सभेच्या 48 तास अगोदर RT-PCR चाचणीचा निकाल गृहीत धरला जावा व या पध्दतीने नियोजन व्हावे असे पत्रात म्हटले आहे.
पत्राच्या शेवटी त्यांनी कोरोणाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या अधिवेशनाचा संदर्भ दिला आहे : महाराष्ट्र विधानसभा मार्च-2021 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान सर्वच सम्माननीय विधानसभा सदस्यांची 48 तास आधी RT-PCR चाचणीचे नियोजन झाल्या कारणाने असूविधा झाली नाही.संबंधित उपस्थिती सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य अशा निर्णयाचे स्वागतच आहे.
https://rdd.maharashtra.gov.in/
https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions
https://www.maharashtra.gov.in/1144/Cabinet-Decisions
https://www.maharashtra.gov.in/1125/Home
https://www.maharashtra.gov.in/1126/1177/
https://www.panchayatportals.gov.in/
https://www.panchayat.gov.in/en/web/guest/home
https://www.maharashtra.gov.in/1150/Acts-Rules
#tag : #जिल्हा परिषद#अर्थसंकल्पीय #सर्वसाधारण#सभा
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता