गुरुवार, फेब्रुवारी १८, २०२१

नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथे विज पडून सालगड्याचा मृत्यू तर पाच महिला मजूर गंभीर जखमी

नायगाव,दि. 18 फेब्रुवारी) : नायगाव तालुक्यातील सुजलेगाव येथे माधव दिगंबर वाघमारे हे पाऊस पडत असल्यामुळे शेतात आंब्याच्या झाडाखाली थांबले असता नैसर्गिक विज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे.

 हाती आलेली माहिती अशी की,सुजलेगाव येथील माधव रामजी कु-हाडे यांच्याकडे सालगडी म्हणून असलेले माधव दिगंबर वाघमारे वय वर्षे ५० हे व काही महिला मजूर आज दिनांक १८ फेब्रुवारी रोजी कु-हाडे यांच्या शेतात हरभरा जमा करण्याचे काम करत होते.महिला ह्या हरभरा जमा करुन त्याचे गाठोडे बांधून वाघमारे यांच्या डोक्यावर उचलून देत होत्या व वाघमारे हे ते गाठोडे नेऊन शेतात एका ठिकाणी ढिगारा घालण्याचे काम करत होते.

हवामान खात्याने चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होता व कालपासून महाराष्ट्रात ब-याच जागी पावसाने हजेरीही लावली.नायगाव परिसरात आज सकाळ पासून ढगाळ वातावरण होते,माधव वाघमारे व महिला या हरभरा जमा करत असताना अचान पाऊस आल्यामुळे शेतात असलेल्या आंब्याच्या झाडाखाली आश्रय घेण्यासाठी गेले, परंतु काळ दबा धरून बसला होता हे कुणालाही ठाऊक नव्हते,पाऊस चालू असताना झाडाखाली बसलेल्या माधव वाघमारे यांच्या अंगावर विज पडली आणि ते गतप्राण झाले,क्षणात होत्याचं नव्हतं झालं, बाकीच्या महीला मजूर काही अंतरावर असल्यामुळे त्या जबर जखमी झाल्याचे समजते, सुमनबाई दिगंबर वाघमारे, गयाबाई मोहन आईलवार,राधिका माधव पवार, सम्राज्ञी माधव पवार, अर्चना दिगंबर वाघमारे अशी जखमी महिला मजूरांची नावे आहेत.

त्यांना पुढिल उपचारासाठी नायगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते, परंतु येथील डॉक्टरांनी नांदेडच्या सरकारी दवाखान्याला रेफर केले असल्याची माहिती मिळाली आहे, वाघमारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेची बातमी कळताच सुजलेगावात शोककळा पसरली, मंडळ अधिकारी व तलाठी यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तेथे जाऊन पंचनामा केला.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता