By संजय चिखले मरवाळीकर
नांदेड,दि.२३ डिसेंबर: विष्णुपुरी, नांदेड येथील शैक्षणिक प्रतिष्ठान सहयोग कॅम्पस या ठिकाणी सोमवार, दिनांक २३ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२:०० वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा च्या वतीने सदस्यता नोंदणी अभियानाचे जिल्हा संयोजक डॉ.माधवराव पाटील उच्चेकर यांच्या विनंतीवरून जिल्हाध्यक्ष मा.डॉ.संतुकराव हंबर्डे यांचे अध्यक्षतेखाली संघटन पर्व: भाजपा राष्ट्रीय सदस्यता नोंदणी अभियान - २०२४ अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा कार्यशाळेला सुरुवात करण्या आधी दीपप्रज्वलन करून भारत माता, डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारत माता की जय च्या जयघोषाने पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
मार्गदर्शक म्हणून विभाग संघटनमंत्री मा.संजयजी कौडगे होते, तसेच या कार्यशाळेस मा.खासदार,मा.आमदार,प्रदेश पदाधिकारी व प्रदेश कार्यकारिणी सदस्य,प्रदेश मोर्चा पदाधिकारी,जिल्हा पदाधिकारी,जिल्हा मोर्चा अध्यक्ष,आघाडी, प्रकोष्ठ, सेल जिल्हा संयोजक,मंडळ अध्यक्ष व सरचिटणीस,माजी जि. प. सदस्य,सोशल मिडिया संयोजक,सदस्यता अभियान जिल्हा समिती,विस्तारक या अपेक्षितांची उपस्थिती अनिवार्य होती.या कार्यशाळेच्या माध्यमातून भाजपा सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या.
या प्रसंगी मंचावर जिल्हाध्यक्ष डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे मराठवाडा विभागीय संघटनमंत्री संजयजी कौडगे, प्रदेश सचिव देविदासजी राठोड, भाजपा ज्येष्ठ केरबाजी सावकार बिडवई, जिल्हासरचिटणीस लक्ष्मणराव ठक्करवाड, डॉ. माधव पाटील उच्चेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सतीश अण्णा गोड, यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे सर्व मोर्चा व प्रकोष्ठचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी नांदेड दक्षिण जिल्हा संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान अंतर्गत जिल्हा कार्यशाळेचे आयोजन आज शैक्षणिक...
Santuk Hambarde यांनी वर पोस्ट केले सोमवार, २३ डिसेंबर, २०२४



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता