रविवार, जानेवारी ०९, २०२२

सर्वसामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्याचे काम पत्रकारच करतात-पोलीस निरिक्षक अभिषेक शिंदे

 


नायगाव,दि ०९ जानेवारी २०२१ : समाजातील वाईट प्रवृतीचा समूळ नायनाट करण्यासाठी पत्रकारांनी निर्भीडपणे लिखाण करावे,अन्यायाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेचा आवाज हे पत्रकारच बुलंद करतात.पत्रकार वृत्तपत्राविना समाजाची कल्पनाच करवत नाही, चौथा स्तंभ नसेल तर समाजात अराजकता माजेल.प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम हे पत्रकार करत असतात. लोकांच्या अडी अडचणी मांडण्याचे कार्य पत्रकारांनी सदैव करावे,मी राज्य शासनाच्या सेवेतील पाईक या नात्याने मी जोपर्यंत नायगाव पोलीस स्टेशन येथे आहे तोपर्यंत सदैव पत्रकारांच्या सोबत आहे.पत्रकारीता करत असताना समाजकंटकांकडून कुठलीही  धमकी, समस्या आल्यास पत्रकारांनी निसंकोचपणे मला अर्ध्यारात्री फोन करावा,मी सदैव पत्रकारांच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन नायगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांनी केले.

ते नायगाव पोलीस ठाण्याच्यावतीने दर्पणदिनानिमित्त तालुक्यातील पत्रकार बाधंवाच्या आयोजीत करण्यात आलेल्या सत्कारा प्रसंगी बोलत होते.पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या वतीने तालुक्यातील उपस्थित सर्व पत्रकारांचा पेन डायरी व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार सन्मान करण्यात आला.पोलीस ठाण्यात आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमास नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पांडे, तालुका अध्यक्ष नागेश कल्याण, पत्रकार मित्र गजानन चव्हाण सह मान्यवर पत्रकार उपस्थित होते.

या वेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शन पर भाषणे या प्रसंगी झाली या वेळी बोलताना त्यांनी समाज, पोलीस, आणी पत्रकार यांचा संबंध चिखल पाण्या सारखा आहे. समाजातील अन्यायग्रस्त घटकाना न्याय मिळवून देण्याचे कार्य करण्याची जवाबदारी समाजातील या दोन मुख्य घटकावर असल्याचे मनोगत या वेळी व्यक्त केले.

या कार्यक्रमास पत्रकार संघाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य एस एम मुदखेडकर, माजी तालुकाध्यक्ष मनोहर तेलंग,प्रभाकर लखपत्रेवार पंडीत वाघमारे, र विकास भुरे, आनंदा सूर्यवंशी, गोविदंटोकलवाड, गंगाधर गंगासागरे, गंगाधर ढवळे, माधव घडेकर, संजय चिखले, रामकृष्ण मोरे देगावकर, प्रकाश महिपाळे, शर्मा, पोहेका सोपानराव वळगे, इंगोले शिवाजी ईबीतदार, संजय ब्रम्हानंद चिखले, अंकुश देगावकर, शाम गायकवाड, माधव बेलकवाड, शे. अरीफ, वाघमारे राम प्रसाद चनावार सह अनेक पत्रकार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रकाश हानमंते यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता