बुधवार, जून ३०, २०२१

लाच प्रकरण : महा लाचखोर महावितरण सहायक अभियंता चोरावर मोर व्हायला जाऊन 30,000 पाई अडकला एसीबीच्या जाळ्यात

 


प्रेस नोट

दिनांक-३०/०६/२०२१

३० हजार रूपये लाचेची मागणी केली म्हणुन महावितरण शाखा क. १ लातुर च्या सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल.

यातील तक्रारदार यांच्या हॉटेलच्या लाईटने मिटर मधून विद्युत प्रवाह काढून थेट लाईटचा वापर करून विज चोरी केली म्हणुन सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याने कारवाई न करणेसाठी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केली म्हणून दिनांक २९/०६/२०२१ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्या कडे तकार प्राप्त झाली होती. तक्ररदार यांचे तक्ररीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्या कडून दिनांक २९/०६/२०२१ रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली असता, तक्रारदार यांच्या हॉटेलच्या लाईटचे मिटर मधून विद्युत प्रवाह काढून थेट लाईटचा वापर करून विज चोरी केली म्हणून सहायक अभियंता शेख मन्सुर नजीर याने कारवाई न करणेसाठी ३०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

तक्ररदार ३०,०००/- रुपये लाचेची रक्कम घेवून आलोसे शेख मन्सुर नजीर, पद- सहायक अभियंता, वर्ग २. नेमणुक महावितरण कार्यालय लातुर शहर शाखा क १, रा. गरुड चौक लातुर याला देण्याकरीता महावितरण कार्यालय लातुर शाख १ येथे दिनांक २९/०६/२०२१ व ३०/०६/२०२१ रोजी गेले असता शेख मन्सुर नजीर याने लाचेची रक्कम घेण्यास जाणून बुजून टाळले आहे.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी लोकसेवक याच्या विरुध्द पोलीस स्टेशन गांधी चौक लातुर येथे कलम ७ ला.प्र.का अधिनियम १९८८ अन्वये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर हे करीत आहेत.

सदरची सापळा कार्यवाही श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड. परिक्षेत्र, नांदेड, श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, सपोउपनि संजय पस्तापुरे, पोह/लक्ष्मीकांत देशमुख, चंद्रकांत डांगे, पोना / मोहन सुरवसे, मपोना/ शिवकांता शेळके, पोकों / संतोष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, संदीप जाधव, दिपक कलवले, मपोका रुपाली भोसले, चापोना/ राजु महाजन यांनी पार पाडली आहे.

तरी सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय अधिकारी/कर्मचारी हे शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणी संदर्भात मोबाईल फोनवर अधिकारी / कर्मचारी (लोकसेवक) यांचे एसएमएस किंवा व्हिडीओ ऑडीओ क्लिप असल्यास, भ्रष्टाचार संबंधाने काही माहीती असल्यास किंवा शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी शासकीय निधीचा भ्रष्टाचार केला असेल तर खालील क्रमांकावर संपर्क करावा.

लाच प्रकरण : जिल्हा पुरवठा विभागातील महा लाचखोर अव्वल कारकून/पुरवठा निरीक्षकासह लाचखोर कंत्राटी तांत्रिक सहायकाला 40,000 /- रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



आदरणीय महोदय 

*यशस्वी सापळा कारवाई*

▶ *घटक* - अमरावती 

▶ *तक्रारदार* - महिला (शासकिय नोकरदार), वय 28 वर्ष रा. अमरावती.

▶ *आलोसे* -

1) श्री.नारायण जयवंत चव्हाण,वय 29 वर्ष, पद - अव्वल कारकुन/पुरवठा निरिक्षक, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय,अमरावती

2) श्री.अविनाश अनंत भगत,वय 29 वर्ष, पद - तांत्रिक सहायक (कंत्राटी), जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अमरावती.

▶ *लाच मागणी रक्कम* - 50,000/- रूपये 

पडताळणी दरम्यान पहिला हफ्ता लाच मागणी म्हणुन 40,000/- रू.

▶ *स्वीकारलेली लाच रक्कम* - 40,000/- रुपये.

▶ *पडताळणी* -

         दि. 30/06/2021.

➡ *सापळा कारवाई* - 

दि.30/06/2021.

▶ **घटना स्थळ* -

 डी - मार्ट चे मुख्य पार्किंग समोरील बाजुस, बियाणी चौक कॅम्प अमरावती.

▶ *कारण* -     तक्रारदार महिला शासकीय कर्मचारी असून त्यांनी दि.29.06.2021 रोजी तक्रार दिली की, त्यांचेविरुद्ध एका शासकीय रास्त दुकानदार यांनी केलेल्या तक्रारीवर जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय अमरावती येथे होत असलेल्या चौकशी मध्ये कोणतीही कारवाई न होवु देण्याकरिता संबधीत काम पाहणारे अव्वल कारकुन श्री. चव्हाण  हे 50,000 रुपये लाचेची मागणी करीत आहे.वरून आज दि.30.06.2021 रोजी पंचासमक्ष आ.लो.से. श्री.चव्हाण यांनी पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार महिला यांना त्यांचे विरुध्द होत असलेल्या चौकशी मध्ये कोणतीही कारवाई न होवु देण्याकरिता( न करण्याकरीता) 50,000/- रुपये  लाचेची मागणी करून पहिले तात्काळ 40,000/- रूपये स्वीकारण्याचे मान्य करून रक्कम जमल्यास त्यांचेसोबत असलेले आ.लो.से.क्रमांक 2.श्री.अविनाश भगत यांना फोन करून लाच रक्कम त्यांचेकडे देण्यास सांगितली.त्यानंतर आजच सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष आलोसे क्र.1 श्री.चव्हाण  यांचेवतीने आलोसे क्र.2 श्री.भगत यांनी 40,000/- रूपये लाच रक्कम तक्रारदार महीला यांचेकडून पंचासमक्ष स्वीकारली.वरून दोन्ही आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले आहे व पुढील कारवाई सुरू आहे.

 *मार्गदर्शन* -

▶मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती. 

श्री.अरुण सावंत, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी.अमरावती परिक्षेत्र, अमरावती.

श्री. गजानन पडघन, पोलीस उप-अधीक्षक, ला.प्र.वी. अमरावती.

▶️ *सापळा व तपास अधिकारी* - श्री.राहुल वसंतराव तसरे,पोलीस निरीक्षक,ला.प्र.वी.अमरावती.

▶ *सापळा कारवाई पथक* -

श्री. राहुल तसरे ,पोलिस निरिक्षक,

 ना.पो.शी विनोद कुंजाम ,

पो.शी सुनील जायेभाये ,

पो.शी.उपेंद्र थोरात.

▶ *आलोसे क्र.1 यांचे सक्षम अधिकारी* मा. उपआयुक्त , पुरवठा आयुक्त कार्यालय, अमरावती विभाग.अमरावती

-----------------------------------

*सर्व नागरीकांना आवाहन* *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अमरावती पोलीस निरीक्षक राहुल तसरे,मो. नं.8805163100.

*@दुरध्वनी क्रं - 0721-2552355, 2553055

*@टोल फ्रि क्रं 1064*

----------------------------------------

अमृतसर -हुजूर साहिब नांदेड - अमृतसर मार्गे अकोला नवीन विशेष गाडी

 


दक्षिण मध्य रेल्वे

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

प्रेस नोट -३६

दिनांक - ३०.०६. २०२१

आदरणीय संपादक साहेब, 

नमस्कार 

विषय: अमृतसर -हुजूर साहिब नांदेड - अमृतसर मार्गे अकोला नवीन विशेष गाडी 

*****************

उत्तर रेल्वे ने कळविल्या नुसार गाडी संख्या ०४६९२/०४६९१ हि विशेष गाडी दिनांक ५ जुलै पासून अमृतसर येथून सुरु होणार आहे. ती पुढील प्रमाणे – 

१. गाडी संख्या ०४६९२ अमृतसर ते हुजूर साहिब नांदेड (सोमवारी) : हि गाडी अमृतसर येथून दिनांक ५ जुलै २०२१ रोजी दुपारी १४.३०  वाजता सुटेल आणि जालंधर, लुधियाना, न्यू दिल्ली, झांसी, अकोला, वाशीम, हिंगोली मार्गे हुजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी रात्री २१.४० वाजता पोहोचेल. 

२. गाडी संख्या ०४६९१ हुजूर साहिब नांदेड ते अमृतसर (बुधवारी)  : हि गाडी हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर दिनांक ०७ जुलै २०२१ पासून दुपारी ११.०५ वाजता सुटेल आणि हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे अमृतसर येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी १८.३० वाजता पोहोचेल. 

सोबत : गाडीचे वेळापत्रक

आदरणीय संपादक महोदयांना विनंती हि बातमी आपल्या प्रतिष्ठित वर्तमान पात्रात प्रसिद्ध करावी. 

जनसंपर्क कार्यालय, नांदेड



लाच प्रकरण : आश्रम शाळेच्या महा लाचखोर मुख्याध्यापकाला 1500 रुपयाची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले



Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट       :- नांदेड  

➡तक्रारदार  :- पुरुष वय  51 वर्ष 

➡आरोपी  लोकसेवक  :-    1. श्री. नामदेव सोपानराव कैलवाड, वय 56 वर्ष, व्यवसाय नोकरी मुख्याध्यापक, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक, आश्रम शाळा सहस्र्कुंड ता. किनवट रा. वैभव नगर जैन मंदिर जवळ, मालेगाव रोड, नांदेड

➡ तक्रार प्राप्त  :- दिनांक  29/06/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 29/06/2021

➡ सापळा दिनांक :- 30/06/2021

➡ लाचेची रक्कम:-  मागणी 2000/- रु. 

                     तडजोडी अंती 1500/- रुपये  स्विकारले.

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना त्यांचे थकीत असलेले कंत्राटी मजुरीचे 04 महिन्याचे बिल तयार करणे व मंजुर करून आणले त्याचा मोबदला बक्षीस म्हणुन 1500/- रु. लाचेची मागणी करून स्वतः स्विकारली आहे. 

➡  मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡  So  :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡   TLO  :-   श्री. राजेश पुरी , ला.प्र.वि. नांदेड

 ACB नांदेड टीम  सपोउनि संतोष शेट्टे, दर्शन यादव,  एकनाथ गंगातिर्थ, शेख मुजीब

बँका विरुध्द प्राप्त तक्रारी बाबत.जिल्हाधिका-याने जिल्ह्यातील सर्व शाखाधिका-याला कडक कारवाईचा दिला इशारा ! परंतु मुजोर बॅंक मॅनेजर जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाला दाखवत आहेत केराची टोपली



  • जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशाबाबत तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी फक्त मुखदर्शकाच्या भूमिकेत

नांदेड : जिल्हाधिकाऱ्याने जिल्ह्यातील सर्व बॅंकेच्या शाखाधिका-याला पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत की, जिल्हाधिकारी कार्यालयास शेतकरी व जनतेकडून अनेक लेखी तक्रारी प्राप्त होत आहेत, तसेच समक्ष भेटून तक्रारी दिल्या जात आहेत. ज्यामध्ये बँका शेतक-यांना ज्या बँकेतून माफी मिळाली आहे त्याच शाखेतून कर्ज घ्या म्हणत आहेत व कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तसेच अनावश्यक कागदपत्राची मागणी करीत आहेत.

या संदर्भात नांदेड जिल्हयातील सर्व बँकांना सूचित करण्यात येते की, मागच्या वर्षी 2020-21 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता शेतक-यांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व बँकांना प्रासंगिक तत्वावर आदेश देण्यात आले होते की, शेतक-यांना ज्या बँकेतून कर्जमाफी मिळाली त्याच शाखेतून पीककर्ज देण्यात यावे जेणेकरुन कोरोना काळात बँकेतील वर्दळ कमी होईल. सद्यस्थीतीत जी गावे ज्या शाखेस दत्तक आहेत त्या शाखेतूनच शेतक-यांना पीककर्ज देण्यात यावे.

सबब, सर्व बँकांना सूचित करण्यात येते की, शेतक-यांना माफीच्या निकषावर बाद ठरवून कर्जपुरवठयापासून वंचित ठेवू नये व शेतक-यांची अडवणूक करु नये अन्यथा संबंधीता विरुद्ध कडक कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.एक प्रकारे असा इशाराच जिल्ह्यातील सर्व बॅंकेच्या शाखाधिका-याला दिला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालय अधिकृत संकेतस्थळ

https://nanded.gov.in/