गुरुवार, मे २७, २०२१

लाच प्रकरण : गागलेगाव येथील लाचखोर तलाठी 4,000 हजार रुपयांची लाच घेताना नांदेड एसीबीच्या जाळ्यात

 


Respected sir/madam 

* TRAP CASE 

➡युनिट :- नांदेड  

➡तक्रारदार :- पुरुष वय 30 वर्ष 

➡आरोपी लोकसेवक :- विजयकुमार गोपाळराव कुलकर्णी, वय 48 वर्ष, तलाठी सज्जा मौजे गागलेगाव ता. बिलोली जि. नांदेड 

➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 24/05/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 25/05/2021

➡ सापळा दिनांक :- 27/05/2021

➡ लाचेची रक्कम:- 5,000/- रुपये मागणी तडजोडीअंती 4,000/- रु.

➡ कारण:-

            यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार हे अध्यक्ष असलेले श्रीकृष्ण देवस्थान मौजे गागलेगाव करिता दान पत्राद्वारे मिळालेल्या जमिनीची नोंद 7/12 ला घेण्यासाठी दि. 18/05/2021 रोजी 15,000/- रु. ची मागणी करून 10,000/- रु. त्याच दिवशी घेतले व उर्वरित 5,000/- रु लाचेची मागणी करून तडजोडीअंती 4,000/- रु. स्वतः स्वीकारले. 

➡ मार्गदर्शक:- 

मा.श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

मा.श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड.

➡ So :- श्री. विजय डोंगरे, पोलिस उपअधीक्षक, ला. प्र. वि. नांदेड

➡ TLO :- श्री. राजेश पुरी ला.प्र.वि. नांदेड

 ACB नांदेड टीम सपोउपनी संतोष शेटटे, पोना एकनाथ गंगातिर्थ, गणेश केजकर ,नरेंद्र बोडके

*सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन*

 करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी* *केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग नांदेड

पत्रकार
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933
 _लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार_ 
*सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग*
*👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇* 


Mehul Choksi arrested:पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार फरार मेहुल चोक्सी सापडला; अँटिग्वामधून बोटीतून पळालेला होता

 गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेला मेहुल चोक्सी बेपत्ता झाला होता.


पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणातील (PNB Scam) घोटाळेबाज मेहुल चोक्सी (Mehul Choksi) गेल्या काही दिवसांपासून अँटिग्वामधून गायब झाला होता. त्याला डॉमिनिकामध्ये ट्रेस करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. आता अँटिग्वा पोलिसांनी डॉमिनिका प्रशासनाशी संपर्क साधला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पंजाब नॅशनल बँकेच्या १४ हजार कोटींच्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार असलेला मेहुल चोक्सी बेपत्ता झाला होता. मेहुल चोक्सीचे नागरिकत्व रद्द करण्याबाबत केंद्र सरकार आणि अँटिग्वा सरकारमध्ये चर्चा सुरू होती. मात्र, याचा अंदाज आल्यामुळे मेहुल चोक्सी अँटिग्वामधून पसार झाल्याचे सांगितले जात होते. 

पीएनबी बँकेचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढत अँटिग्वा आणि बाबुर्डा या देशांमध्ये लपला होता. अँटिग्वा येथील स्थानिक वृत्त एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, मेहुल रविवारपासून बेपत्ता आहे. रविवारी २३ मे रोजी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी चोक्सी निवासस्थानातून कारमधून बाहेर पडताना दिसून आला होता. तेव्हापासून तो त्या ठिकाणी नाही त्यामुळे पोलिसांनी चोक्सीचा शोध सुरू केला आहे.
गुरुवारी डॉमिनिकामध्ये चोक्सी असल्याची खबर मिळाली आणि पोलिसांनी लगेचच कारवाई केली. तो बोटीतून पळाला होता. 



लाच प्रकरण : लाचखोर वनपालासह वखारचालक 1500 रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात

 


 

May 27 2021 5:22AM

सांगली ः कारवाई टाळण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना वन विभागातील वनपाल आणि वखारचालक यांना पेठ नाका येथे पकडण्यात आले. शिराळा वनक्षेत्रपाल कार्यालयातील वनपाल अमोल दत्तात्रय शिंदे (वय 41, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर) आणि वखारचालक पांडुरंग रामचंद्र खुडे (वय 37, रा. खंडेश्वर मंदिराजवळ, पेठ, ता. वाळवा) अशी संशयितांची नावे आहेत. सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी, तक्रारदार यांनी दहा दिवसांपूर्वी भाटशेरगाव येथील शेतातील निलगिरीची झाडे तोडून विक्रीकरिता पेठनाका येथील खुडे यांच्या वखारीमध्ये ट्रॅक्टरने आणली होती. त्यावर कारवाई करू नये, यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःसाठी दोन हजार व वनक्षेत्रपाल यांच्यासाठी पाच हजार रुपये आणि प्रत्येक ट्रॉलीसाठी पाचशे रुपयांची मागणी केली होती. त्यावर तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली.

या तक्रारीनुसार पडताळणी केली असता शिंदे व खुडे यांनी यांनी तक्रारदार यांच्याकडे चर्चेअंती पंधराशे रुपयांवर व्यवहार ठरला. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुडे यांच्या वखारीमध्ये सापळा लावला. शिंदे आणि खुडे यांना पंधराशे रुपये घेताना पकडले. या दोघांविरुद्ध इस्लामपूर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.  

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलिस निरीक्षक प्रशांत चौगुले, गुरुदत्त मोरे, पोलिस अंमलदार संजय संकपाळ, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, अविनाश सागर, सलीम मकानदार, श्रीपती देशपांडे, भास्कर भोरे, संजय कलकुटगी, अजित पाटील, सोहेल मुल्ला, राधिका माने, वीणा जाधव यांनी ही कारवाई केली.  


२६ - मे - २०२१ इस्लामपूर पोलीस ठाणे गु र नं ३९२/२१ भ्र .प्र .आधी . १९८८ चे कलाम ७, ७ अ , १२ पहा http://acbmaharashtra.gov.in/files/press_release/1482.pdf