शनिवार, मे १५, २०२१

मिशन ब्रेक द चैन काळात नायगावमध्ये विना परवाना दुकान चालू ठेवून विक्री केल्याने पाच हजार रुपयाचा दंड

 


मिशन ब्रेक द चैनची अंमलबजावणी चालू असताना सहेली लेडीज एम्पोरियम नायगाव हे दुकान विनापरवानगी चालू ठेवून ते विक्री व्यवहार करीत असल्याचे आढळून आल्यामुळे दि.15.05.2021 रोजी नायब तहसीलदार नवनाथ वगवाड यांचे उपस्थितीत पाच हजार रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे.या  यावेळी नायगाव पोलीस स्टेशनचे पि.आय पडवळ,तलाठी राठोड, नगरपंचायतचे कार्यालयीन अधीक्षक संतराम जाधव, नगरपंचायतचे कर्मचारी बापुले, जाधव व नगरपंचायतचे इतरही कर्मचारी उपस्थित होते.

एवढा मोठा फौजफाटा घेऊन जाऊन ही कारवाई केल्यामुळे व्यापारी वर्गाचे नक्कीच धाबे दणाणले असणार यामध्ये तिळमात्र शंका नाही.भविष्यात अशा प्रकारे कोरोना नियमांचे उलंघन करुन या पुढे अशी जोखिम पत्करून कोणी दुकाने चालू ठेवून विक्री करण्याची हिम्मत करेल असे वाटत नाही.जरी कोणी नियम डावळून कोरोना पसरवण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासन उत्तरोत्तर कारवाई करण्यात कुठेही कमी पडणार नाही अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही.नागरिकांनीही स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे, खरेदी काय उद्याही करता येईल पण गेलेला जीव परत मिळार नाही याचेही भान ठेवून खरेदी साठी गर्दी न करणे महत्त्वाचे आहे.या कारवाई मुळे नागरिकांच्या भूवया उंचावल्या आहेत.सर्वत्र या कारवाईचे कौतुक होत असताना मात्र व्यावसायिकांमध्ये नाराजीचा सूर ऐकायला येत आहे.

नांदेड खा.प्रतापराव चिखलीकरांच्या गावातच 15 दिवसांपासून अंधार,ना लाईट ना पाणी ! ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील नागरिकांनी सरपंचाच्या घरावर काढला मोर्चा

 


कंधार,15 मे 2021 : तालुक्यातील चिखली गावातील वार्ड क्र.3 व 4 मध्ये मागिल 15 दिवसांपासून लाईट नसल्याने गावकरी अंधारात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.लाईट नसल्यामुळे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे पाणी कुठून आणायचे हा प्रश्न या प्रभागातील नागरिकांना पडला आहे.विशेष म्हणजे चिखली हे गाव नांदेडचे खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे जन्मगाव आहे,ग्रामपंचायचा सरपंच खासदारच्या गटाचा आहे.

सरपंचाच्या घरावर मोर्चा


नागरिकांनी सरपंच,ग्रामसेवक व लाईनमन तसेच अभियंत्याला गावात लाईट नसल्याची वारंवार कल्पना देवून सुद्धा गावात लाईटची सोय करण्याच्या गावकऱ्यांच्या रास्त मागणी कडे सरपंच, संबंधित यंत्रणेने दूर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य तथा विरोधी गटनेते मनोहर चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत सदस्य भरत कदम, बाबुराव गायकवाड,सुलेभान करेवाड व गणेश पवळे, केशव पवळे,शरद कदम,अशोक चिखलीकर सह गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रात्रीच्या अंधारात सरपंचाच्या घरावर धडक मोर्चा काढला, आणि सरपंचाला घेराव घालत लाईटची लवकरात लवकर सोय करण्याची मागणी केली.


ग्रामसेवक प्रतिक्रिया
आठ दिवस झाले लाईट नाही, डिपीचा प्रोब्लेम आहे, डीपी जिल्हा लेवललाच उपलब्ध झालेली नाही,उद्याला डिपी उपलब्ध होईल म्हणजे 17 मे रोजी,वार्ड क्र. 3 व 4 मध्ये लाईट नाही,बारुळ वरून पाईप लाईन आहे,बारुळहून पाणी चालू आहे.वार्ड क्र.4 मध्ये अर्ध्या भागाला व टोटल प्रभाग क्र.3 मध्ये पाणी नाही.एक डीपी जळालेली आहे.जील्ह्यावरच डबडे उपलब्ध नाहीत,आपल्याला कुठून देणार आहेत त्यांनी.
  गंगाधर कांबळे-ग्रामसेवक,चिखली, कंधार
16 मे 2021,9:51am

विरोधी गटनेते  प्रतिक्रिया

वार्ड क्र.4 मध्ये पाइपलाइन नाही,तेथे पाणीच नाही,रात्री डिपी आणली आम्ही,चव्हाण साहेबांनी सहकार्य केले, चव्हाण साहेबांनी सांगितले लातूरला,डिपी मिळाला, गेल्या 15 दिवसांपासून लाईट आणि पाणी नाही,वार्ड क्र.4 पूर्ण व 3 ,वार्ड क्र.2 मध्ये दुस-या डिपीवरुन वायर टाकून घ्यावे लागते, सरपंचाच्या हातचे काही नाही, सरपंच चिखलीकर जे सांगल ते करते,दोन डिपीचा लोड एका डिपीवर आहे,दुसरी डिपी आणण्यासाठी ठराव द्या म्हटलं तर ठराव द्यायला तयार नाहीत.गाव अंधारात आहे डिपी उपलब्ध होत नसल्याने सरपंचाच्या घरावर मोर्चा काढल्या, मोर्चा कसा काढला म्हणून आमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला,दोन प्रकारचे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न होता,आता पर्यंत तेच करत आलेत,आपण सक्षम असल्यामुळे आता ते जूळणा झालय, पंधरा वीस लोकांचे घरकुल मस्टरचे पैसे लाभार्थ्यांना मिळाले नाहीत, अपंगाचे पैसे वाटप केले नाहीत, गावात स्मशानभूमी नाही,गावात नाल्या नाहीत.

ग्रा.प सदस्य तथा गटनेते-मनोहर गायकवाड

चिखली,कंधार


सरपंच प्रतिक्रिया


घरकुल मस्टर संदर्भात रोजगार सेवक प्रतिक्रिया


लाच प्रकरण : महा लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह लाचखोर पोलीस शिपाई चतुर्भुज ! 15 हजारांची लाच स्वीकारताना दोन्ही लाचखोरांवर गुन्हा दाखल करुन एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात

 


**आदरणीय सर* 

*लाचेची यशस्वी सापळा कारवाई* 

▶️ *युनिट -* ठाणे

▶️ *तक्रारदार-* स्त्री, वय- २९ वर्षें,  

▶️ आरोपी- १) राजेश सखाराम धुमाळ, वय- ५७ वर्षे, हुद्दा.पोलीस उप निरीक्षक, (वर्ग २ अराजपत्रित), व २) प्रकाश धीरु पवार, हुद्दा. पोलीस शिपाई, दोघे नेमणूक. बोईसर MIDC पोलीस ठाणे, पालघर.

▶️ *लाचेची मागणी-* २०,०००/- रुपये.

▶️ *लाच स्विकारली* तडजोडअंती १५,०००/- रुपये. 

▶️ *हस्तगत रक्कम*- १५,०००/- रुपये.

▶️ *लाचेची मागणी दिनांक*- १४/०५/२०२१. 

▶️ *लाच स्विकारली दिनांक*- १४/०५/२०२१, रोजी १८.२४ वा. 

▶️ *लाचेचे कारण -*. यातील तक्रारदार यांचे पती याना बोईसर पो ठाणे गुन्हा क्रमांक १६१/२०२१, यात अटक केली असून, सदर गुन्हा शिथिल (तीव्रता कमी) करून देणेसाठी, आलोसे क्रमांक १ आणि २ यांनी मागणी २०,०००/- रुपयांची मागणी करुन, तडजोडी अंती आलोसे क्रमांक १ यांना लाचेची रक्कम १५,०००/- रुपये स्वीकारताना आज रोजी दोन्ही लोकसेवक यांना रंगेहात पकडण्यात आले.                           

 ▶️ *सापळा अधिकारी* पल्लवी ढगे पाटील.

पोलीस निरीक्षक, एसीबी ठाणे.

▶️ *सापळा पथक* पो.हवा/परदेशी, पोना/लोटेकार, पोना संदेश शिंदे.

▶️ *मार्गदर्शन अधिकारी*-

मा.श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र.

मा.श्री.मुकुंद हातोटे सो. अपर पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र.

▶️ *आलोसे यांचे सक्षम अधिकारी* - मा.विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, कोकण भवन, नवी मुंबई.

पालघर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपणास कोणी सरकारी नोकर अथवा खासगी इसम सरकारी कामाकरीता लाच मागितली तर अँटी करपशन ब्युरो पालघर येथे संपर्क साधावा.

मोबाईल नं. DySP जगताप-9850158810/9923346810

पोलिस निरीक्षक साळुंखे-9923699430