गुरुवार, मे ०६, २०२१

शेतीसंबंधी सेवा व कृषी सेवा केंद्र सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत सुरु -जिल्हादंडाधिकारी

 


नांदेड, दि. 6 मे :- जिल्हयात कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये शेती विषयक सेवांशी निगडीत असलेले कृषि सेवा केंद्र जसे बियाणे, खते, किटकनाशके, कृषि साहित्य विक्री दुकाने यांच्याशी निगडीत विक्री साठवणूक व वाहतूक सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिली आहे .

राज्याच्या कृषी आयुक्तालयामार्फत शेती संबंधित येणाऱ्या काळातील पेरणी व शेती व्यवस्थापनाअंतर्गत करावयाच्या अत्यावश्यक कामामध्ये शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये यादृष्टीने विचार करण्यात आला. त्यानुसार कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये शेती संबंधी कार्य, उपक्रम, बियाणे, खते, उपकरणे व त्याची दुरुस्ती यासह कृषिक्षेत्राचे अखंडीत सातत्य सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी घेतला.  

या सेवा सुरु ठेवतांना कोविड-19 संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वाचे तंतोतंत पालन करणे सर्व संबंधीतांना बंधनकारक राहील. या आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपली व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.

✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा


जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजेच्या कडकडाटासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता नागरिकांनी सावधगिरी बाळगावी

 


नांदेड, दि. 6 मे :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 6 मे 2021 रोजी दिलेल्या सूचनेनुसार 6 मे ते 10 मे 2021 या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे.

या गोष्टी करा - विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका- आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाच प्रकरण : लाचखोर कनिष्ठ लेखाधिकारी 1500 रुपयांची लाच स्वीकारताना चतुर्भुज ! एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून घेतले ताब्यात

 


▶️ यशस्वी सापळा कारवाई

▶️घटक - वाशिम 

▶️तक्रारदार - पुरूष, वय 40, वर्ष,रा.रिधोरा पो.राजुरा ता. मालेगाव जि. वाशिम

▶️ आलोसे -  मनोज बिबीचंद जाधव, वय 33वर्ष , व्यवसाय- नोकरी  कनिष्ठ लेखा अधिकारी, पंचायत समिती मालेगाव ता. मालेगाव जि. वाशिम रा. अमरप्रित कॉलनी, बालाजीनगर, डापकी रोड अकोला, जि. अकोला.

▶️लाच मागणी रक्कम- ₹ 1500/- रूपये 

➡स्विकारली रक्कम- ₹ 1500/-

▶️पडताळणी- दि.03/05/2021

▶️ कारवाई दि.-05/05/2021

▶️घटनास्थळ- लेखा विभाग पंचायत समिती मालेगाव

▶️कारण -  कंत्राटी रोजगार सेवक यांचे मागील 8 महिन्याचे मानधन देयक बिल वरून धनादेश तयार करून कॅश रजिस्टर ला नोंद घेण्यासाठी तक्रारदार यांना लाच रक्कम 1500/-₹  ची  पंचासमक्ष मागणी केली असुन, आलोसे  यांनी  आज रोजी सापळा कारवाई दरम्यान पंचा समक्ष लाच रक्कम स्विकारली.आरोपी लोकसेवक यांना ताब्यात घेण्यात आले असून कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनीयम 1988 (सुधारणा 2018) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

मार्गदर्शन -

▶️मा. श्री. विशाल वि.गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती  

मा. श्री. अरूण सावंत, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,

▶️कारवाई पथक-श्री.शंकर शेळके ,पो. उप अधिक्षक ला. प्र.वि.वाशिम, सपोउपनि. नंदकिशोर परळकर,  पोलीस नाईक विनोद अवगळे, योगेश खोटे, चालक पो.शि. नाविद शेख सर्व ला.प्र.वि.वाशिम 

▶️कारवाई मदत पथक- पोहवा रमेश बोडखे, नितीन टवलारकर, पो.ना. राहुल व्यवहारे सर्व ला.प्र.वि. वाशिम 

▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.

----------------------------------------


*सर्व नागरीकांना आवाहन*

 *करण्यात येते की, कोणत्याही* *शासकीय अधिकारी/कर्मचारी

यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी* *केल्यास तात्काळ संपर्क साधावा.* 

लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग

वाशिम 

*दुरध्वनी क्रं 07252 235933* 

*@टोल फ्रि क्रं 1064*                                    मोबाईल नंबर - 9921038111

------------------------------

✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

उघड्या डीपीतच टाकावा लागतो फ्युज ! नागरिकांच्या जीविताला धोका-शेळगाव छत्री येथे वीजवितरणचे दुर्लक्ष

 


  •  २४ तासात ५० वेळा विज गुल होते
  • जे.ई.गंदे यांच्या मनमानी कारभारास शेळगाव छ्त्री ची जनता कंटाळली 

नायगाव,दि 6 मे : नायगाव जवळील शेळगाव छ्त्री येथील डीपी वर फ्युज टाकण्यासाठी महावितरणकडून तारेचा उपयोग करण्यात येतो.मात्र अवघड डीपीला प्राणी पक्षी किंवा माणसाचा हात लागला तर जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे महावितरण विभागाने तात्काळ किटकॅटचि व्यवस्था करून संभाव्य हानी टाळावी अशी करण्याची मागणी गावातील सर्व नागरिकांनी एका निवेदनात केली आहे.

  निवेदनात म्हटले आहे की शेळगाव छत्री येथे महावितरणाच्या डीपीमध्ये फ्युज टाकताना किटकॅट नसल्याने उघड्या तारेचा आधार घेऊन फ्युज टाकावा लागत आहे.महावितरणाच्या संबंधीत जे.ई.गंदे यांना हा प्रकार निदर्शणास अनेक वेळा आणुन दिला पण गंदे हे आपला मनमानी कारभार करत असुन शेळगाव छत्री येथे फ्युज अभावी विज दिवसातुन ५० वेळा गुल होत आहे‌.अगोदरच कडक उन्हाळा त्यात विज गुल या मुळे नागरिक मनस्ताप व्यक्त करत आहेत.

      तसेच गंदे यांना वेळोवेळी तक्रार देऊन पण मात्र उघड्या डीपीवर फ्युज टाकण्यासाठी किटकॅट उपलब्ध करून दिले जात नाही.आता आगामी काळात येणारा पावसाळा,वादळी वाऱ्याचे दिवस लक्षात घेऊन तरी महावितरतने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे‌.या डीपीवर काही काम करण्यास जाणाऱ्या लाईनमन तसेच गावकऱ्यांच्या जिवीतास धोका होऊ शकतो.यावर वेळीच उपाययोजना करावी व होणारी जीवितीहानी टाळावी,अशी मागणी उर्जामंत्री,पालकमंत्री,जिल्हाधीकारी,खासदार,आमदार,व‌ महावितरणाच्या वरिष्ठांना निवेदनाद्वारे सर्व गावकरी यांनी केली आहे.

  लॉकडाऊन असल्याने त्यांनी हे निवेदन संंबंधितांना मेलवर आणि व्हाॅटसॲपवर पाठविले आहे..

✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणासाठी अकरा ठिकाणी लसीकरण केंद्र - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे

 


नांदेड, दि. 5 मे :- 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या कोरोना लसीकरणासाठी लसीचा पुरवठा आवश्यक असून सद्या नांदेड जिल्ह्यात पाच ठिकाणी लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालय नांदेड, शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग नांदेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद ता. धर्माबाद, प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा, प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर येथे 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना लसीकरण केले जात असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी दिली. लसीची उपलब्धता ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तीच्या लसीकरणाची केंद्रे वाढविण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले.

1 मे, 2021 पासून 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींना लसीकरणाची सुरुवात झाली असून जिल्हा रुग्णालय नांदेड येथे 860 लाभार्थ्यांनी शहरी आरोग्य केंद्र हैदरबाग येथे 901 , ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे 855 , प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा 947 , प्राथमिक आरोग्य केंद्र अर्धापूर 877 येथे असे एकूण 4 हजार 440 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. दिनांक 6 मे पासून यात शहरातील सहा नवीन आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत आहे. यात शहरी आरोग्य केंद्र कौठा, जंगमवाडी, शिवाजीनगर, शासकीय गुरु गोविंदसिंगजी मेडीकल कॉलेज विष्णुपुरी, शासकीय आयुर्वेदिक कॉलेज , स्त्री रुग्णालय, शामनगर या केंद्राचा समावेश आहे.

ग्रामीण भागात कोविड -19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामदक्षता समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही यासाठी ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. जनजागृतीसाठी ग्रामीण भागात महाआरोग्य संवाद अभियानाद्वारे प्रचार व प्रसिध्दीसाठी चित्ररथ व विविध माध्यमांचा वापर केला जात आहे. याद्वारे ' माझे कुटूंब माझी जबाबदारी ' व ' मी जबाबदार ' ही मोहिम राबविली जात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

ताप, कोरडा खोकला‍ किंवा श्वास घेण्यास त्रास अशी कांही लक्षणे असल्यास आरटीपीसीआर किंवा अँन्टिजेन तपासणी करुन घेण्याचे आवाहन गावोगावी केले जात आहे. वारंवार हात पाणी व साबण वापरुन स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर राखणे, स्वत: आणि इतरामध्ये कमीत - कमी एक मिटर ( 3 फुट) अंतर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, मास्क वापरणे, श्वसनासंबंधी शिष्टाचार पाळा, जेंव्हा आपल्याला खोकला, शिंक येत तेंव्हा आपल्या तोंडावर व नाकावर रुमाल वापरणे. आपले हात धुणे आवश्यक आहे.  

✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा.चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा