मंगळवार, एप्रिल २७, २०२१

बियाणे,खते,किटकनाशके व कृषी साहित्यांचा पुरवठा अडथळा विरहित होण्यासाठी सगळे कृषी सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत चालू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर द्यावेत_कृषी आयुक्त -धीरज कुमार

 


आयुक्त (कृषि)

कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ०१ 

फोन नं. ०२०-२६१२७३०८, २६१२५६६२, फैक्स नं. ०२०-२६१३१०६४] [ email-cocopest@gmail.com

 

जा.क्र.गृनियो/गृनिः ७/८/कोविड/ 14507 /

२०२१, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,

पुणे-४११००१,

दिनांक २७/०४/२०२१


प्रति,

जिल्हाधिकारी (सर्व) महाराष्ट्र राज्य


विषय:-कोबीड १९ ब्रेक द चेन निर्बंध कालावधीमध्ये कृषि विषयक कार्यामध्ये समन्वय व बियाणे, खते, किटकनाशके व कृषि साहित्यांचा अडथळारहित पुरवठाबाबत.

संदर्भ:-१. महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन, मंत्रालय मुंबई ३२ यांचे आदेश क्र. DMU/२०२०/ CR.९३ / DISM/R दि.१३.०४.२०२१ 

२.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग आपत्ती व्यवस्थापन, मंत्रालय मुंबई-३२ यांचे आदेश प्रा DMU/२०२०/ CR.९२/DISM/१ दि.२०.०३.२०२१)

३.महाराष्ट्र शासन कृषि व पद्म विभाग, मंत्रालय यांचे पत्र बैठक/३५२१/ -५६/२० दि.२३.०४.२०२१ 

४. महाराष्ट्र शासन कृषि व पदुम विभाग, मंत्रालय यांचे पत्र क्र. संकिर्ण / २७२१/प्रक्र ५८/१० दि. २३.०४.२०२१


उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळविण्यांत येते की,कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ब्रेक द चेन या नावाने आदेश दिलेले आहेत. त्यामध्ये कृषिनिविष्ठा विषयक दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तथापी, संदर्भ क्र ३ व ४ नुसार खरीप २०२१ च्या अनुषंगाने कृषि कार्यामध्ये समन्वय व बियाणे, खते, किटकनाशके व कृषि साहित्यांचा अडथळारहित पुरवठा या उपक्रमाबाबत प्राधान्याने अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ते निर्देश आयुक्त (कृषि) स्तरावरुन देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

शेतक-यांचे दृष्टीने खरीप हंगाम अत्यंत महत्वाचा असतो व पर्जन्यमानास सुरुवात झाल्यानंतर कृषिनिविष्ठा केंद्रावर खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होते. त्यामुळे अशा परिस्थितीत दुकाने सकाळी ७ ते ११ वा. या वेळेतच उघडी ठेवल्यास दुकानांवर गर्दी होवून फोवीड-१९ चा प्रसार वाढण्याच्या भितीबरोबरच अनावश्यक इतरही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. या बाबींचा विचार करुन रायगड व सांगली जिल्हाधिकारी यांनी कृषिविषयक दुकाने उघडण्याच्या वेळेत शिथिलता दिलेली आहे. त्यामुळे शेतीशी निगडीत असलेली कृषि सेवा केंद्र चालु ठेवण्याबाबत व त्याच्याशी निगडित उत्पादन व वाहतुक चालू ठेवण्यास सकाळी ७ ते सायं. ०७ वाजेपर्यंत चालु ठेवणे, तसेच प्राप्त परिस्थितीत बांधावर निविष्ठा वाटप, इ-कॉमर्स (ऑनलाईन विक्री पध्दतीने कमीत कमी संपर्कात शेतक-यांना निविष्ठा उपलब्ध होतील, यादृष्टीने तसे आदेश आपले स्तरावरून स्थानिकरित्या निर्गमित व्हावेत.

धीरज कुमार (27/04)

आयुक्त (कृषि) कृषि आयुक्तालय,

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१


प्रत,

१. मा. सचिव (कृषि) कृषि व पदुम विभाग, मंत्रालय मुंबई-३२ यांना माहितीस्तव सादर 

२. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सर्व यांना आवश्यक त्या माहिती व कार्यवाहीस्तय 

३. सर्व कृषि निविष्ठा उत्पादक व विक्रेते संघटना, महाराष्ट्र राज्य


✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाच प्रकरण : लाचखोर पोलीस हवालदार ब.नं.827 याने दारुसाठी हप्ता 15 हजार लाचेची मागणी करून 10 हजार लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडून जेरबंद केले

 


*लाचेचा यशस्वी सापळा कारवाई अहवाल** 

27/04/2021

▶️ *युनिट -* अहमदनगर

▶️ *तक्रारदार-* पुरुष, वय-32 वर्ष. पाईप लाईन रोड, अहमदनगर जि.अहमदनगर

▶️ *आरोपी =*

१) बार्शिकर विलास काळे, वय 50 वर्ष, पोलीस हवालदार ब.नं. 827 नेमणूक - तोफखाना पोलीस स्टेशन, अहमदनगर. वर्ग - 3

 ▶️ *लाचेची मागणी दिनांक* 26/04/2021

 ▶️ *लाच मागितली** 15,000/-₹ 

▶️ **लाच स्विकारली दिनांक* * 27/04/2021

▶️ **लाच स्वीकारली* 10,000/- ₹

▶️ हस्तगत रक्कम* 10000/- ₹

▶️ *लाचेचे कारण** -.तक्रारदार यांचा दारु विक्री व्यवसाय असुन हा व्यवसाय सुरळीत सुरू ठेवणे व त्यावर कारवाई न करण्यासाठी हप्ता म्हणून 15,000/- रु लाचेची मागणी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारी वरुन दि.26/04/2021 रोजी केलेल्या लाच मागणी पडताळणीत यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 15000/- रु लाचेची मागणी पंचा समक्ष केली. तक्रारदार यांनी रक्कम कमी करण्यासाठी विनंती केली असता, तडजोड अंती ₹ 10000/- देण्याचे ठरल्याने आज दि.27/04/2021 रोजी आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान 10000/- रु लाचेची रक्कम पंचा समक्ष कॉटेज कॉर्नर, नगर मनमाड हायवे येथे स्विकारली असता आरोपी लोकसेवक यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

▶️ *सापळा अधिकारी* =

शाम पवरे, पोलिस निरीक्षक

 ला.प्र.वि, अहमदनगर

▶️ *सुपरविजन अधिकारी* - हरिष खेडकर, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर

▶ **मार्गदर्शक* -*1)मा.श्री सुनील कडासने सो, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

2)मा.श्री निलेश सोनवणे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक

3) मा. विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.

▶ *आरोपीचे सक्षम अधिकारी* - मा. पोलीस अधीक्षक, अहमदनगर.