सोमवार, एप्रिल ०५, २०२१

कोरोनाची लस सर्वच पञकारांना द्या व बळी गेलेल्या पञकारांच्या कुटूंबियास आर्थिक मदत द्या... मुख्यमंञी ना.ठाकरे यांच्याकडे नायगांव तालुक्यातील पञकारांची मागणी...

 

नायगांव,(दि 5 एप्रिल) :  महाराष्ट्रातील सर्व वयोगटातील पत्रकारांना उत्तराखंडच्या धर्तीवर कोविड-19 ची लस देणेची तसेच,कोरोनाने बळी गेलेल्या महाराष्ट्रातील पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद्राच्या धर्तीवर पाच लाख रूपयांची आर्थिक मदत देणेबाबतची विनंती राज्याचे मुख्यमंञी ना.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे ई-मेल द्वारे तसेच, तहसीलदार यांच्या मार्फत नायगांव तालुक्यातील पञकारांनी केली आहे.

    कोरोना काळात राज्यातील पञकारांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे व संबधितांना मराठी पञकारांची मातृसंस्था असलेल्या मराठी पञकार परिषद मुंबईचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज ई-मेल (डिजीटल) आंदोलनाचे आवाहन केले होते त्यास प्रतिसाद देत मराठी पञकार परिषद मुंबई संलग्न, नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर व जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे यांच्या नेतृत्वाखाली संबंधितांना ई-मेल करण्यात आले तसेच, तहसीलदार नायगांव मार्फत त्यांचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार नवनाथ वगवाड यांना निवेदन सादर करण्यात आले.

     कोरोना काळात राज्यातील पत्रकारांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. लोकांना जागरूक करण्याचेच काम पत्रकारांनी केले असे नाही तर प्रसंगी रस्त्यावर उतरून जनतेला आणि कोरोना बाधितांना मदत करण्याचे काम करत अनेक पत्रकारांनी "फ्रंन्टलाईन वर्कर"ची भूमिका पार पाडली आहे.पत्रकारांच्या या भूमिकेचा पंतप्रधानांनी 'कोरोना योध्दे' अशा शब्दात गौरव केलेला आहे.आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतांना राज्यातील जवळपास 800 पत्रकार कोरोना बाधित झाले. त्यातील 78 पत्रकारांचे बळी कोरोनानं घेतले आहेत. ज्यांचे बळी गेले अशा पत्रकारांचे कुटुंबं आज रस्त्यावर आली आहेत.अनेकांना कोणताच आधार उरलेला नाही.अशा स्थितीत सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या पत्रकारांच्या कुटुबाला आर्थिक मदत करणे हे सरकारचं कर्तव्य आहे. आरोग्यमंत्री मा.राजेश टोपे यांनी खामगाव येथील एका कार्यक्रमात कोरोनानं बळी गेलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना पन्नास लाख रूपये देण्याची घोषणा केली होती.ती घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही.आमची आपणांस विनंती आहे की,पन्नास लाख नाही तर किमान पाच लाख रूपयांची मदत तरी दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना झाली पाहिजे.केंद्र सरकारने दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना पाच लाख रूपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे.त्याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील सरकारने आर्थिक  मदत करावी अशी आमची विनंती आहे.कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 40 ते 50 या वयोगटातील पत्रकार जास्त बाधित झाल्याचे आणि त्यातील काहींचे मृत्यू झाल्याचे वास्तव समोर आले आहे.हे लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने सर्व वयोगटातील पत्रकारांना तातडीने कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे.आम्ही गेली महिनाभर सरकारकडे यासाठी पाठपुरावा करतो आहोत की,सर्व वयोगटातील पत्रकारांना ही लस दिली जावी मात्र सरकार त्याबाबत काही निर्णय घेताना दिसत नाही.त्यामुळे तरूण पत्रकारांचे बळी जात आहेत.आमच्याकडे जी आकडेवारी उपलब्ध आहे त्यानुसार राज्यातील 78 पत्रकारांचे कोरोनाने बळी घेतले आहेत.800पेक्षा जास्त पत्रकार बाधित झाले आहेत. प्रत्यक्षात ही आकडेवारी यापेक्षा मोठी असू शकते..कारण अनेक घटना समोर आलेल्याही नाहीत. देशात सध्या 45 पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे.पत्रकार हे फ्रन्टलाईन वर्कर आहेत हे लक्षात घेऊन सर्व वयोगटातील पत्रकारांसाठी तातडीने लस उपलब्ध करून द्यावी आणि पत्रकारांचे प्राण वाचवावेत. यासाठी सरकारला फार वेगळे काही करावे लागणार नाही. तेव्हा हा निर्णय तातडीने घ्यावा अशी पुनश्‍च विनंती करुन आपल्याकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचेही मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.

    या निवेदनाच्या प्रति राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन विभागाचे मंञी ना.अजितदादा पवार,आरोग्य मंञी ना.राजेश टोपे,जिल्ह्याचे पालकमंञी ना.अशोकराव चव्हाण,माहिती व जनसंपर्क विभागाच्या राज्यमंञी ना. आदिती तटकरे,विधानपरिषदेचे आ.अमरनाथ राजूरकर,आ.राम पाटील रातोळीकर,नायगांव विधानसभा मतदारसंघाचे आ.राजेश पवार,राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक दिलीप पांढरपट्टे, नांदेडचे जिल्हाधिकारी व नायगावचे तहसीलदार यांच्यासह मराठी पञकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,कोषाध्यक्ष विजय जोशी,विभागीय सचिव प्रकाश कांबळे,नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नागापूरकर यांना पाठविण्यात आल्या आहेत. 

  या निवेदनावर नांदेड जिल्हा मराठी पञकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत सोनखेडकर,जिल्हा उपाध्यक्ष तथा तालुका प्रभारी लक्ष्मणराव मा.भवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर लखपञेवार,पंडित वाघमारे,रामप्रसाद चन्नावार, मधुकर जवळे,गंगाधर गंगासागरे,किरण वाघमारे, प्रकाश महिपाळे,संभाजी वाघमारे,प्रशांत वाघमारे आदी पञकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



✍✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी समिती, काँग्रेस नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

 


राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी समिती नेमण्यात येणार असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी आज दिली.

सरकारच्या निधीवाटपाबाबत काँग्रेसचे काही आक्षेप आहेत. सरकारमध्ये काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना पुरेसा निधी मिळत नाही, अशी काँग्रेसच्या मंत्र्यांची तक्रार आहे. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे एच. के. पाटील यांनी सांगितले.


वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे शुक्रवारी पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील राजकीय स्थितीचा आढावा घेताना मंत्र्यांनी निधीवाटपाचा तसेच राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाबाबत प्रत्येक पक्षाच्या दोन नेत्यांनी एकत्रित बसून आढावा घेतला पाहिजे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानुसार किमान समान कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी एक समन्वय समिती नेमण्यात येणार आहे.

बैठकीत निधीवाटपात होत असलेला असमतोल दूर करणे, कोरोनाची सद्यस्थिती आणि उपाययोजना तसेच सद्य राजकीय परिस्थिती यावरही चर्चा झाल्याचे पाटील म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.