शुक्रवार, मार्च १९, २०२१

लाचखोर महिला सहायक पोलीस निरीक्षक(HSP) व पोलीस नाईक 8,000 हजाराची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

 

Respected Sir,

 Demand Case Report

➡ घटक :- नाशिक

➡ तक्रारदार :- पुरुष,वय 37 वर्षे धंदा- ट्रांसपोर्ट व्यवसाय रा नाशिक

➡ आरोपी : 1)वर्षा कृष्णराव कदम वय 37 वर्ष सहायक पोलीस निरीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक(HSP),,कोकंणगाव, पिंपळगाव जि नाशिक 2) उमेश भास्कर सानप,पोलीस नाईक 1089 नेम- महामार्ग सुरक्षापथक(HSP),,कोकंणगाव, पिंपळगाव रा नाशिक

▶️ पडताळणी तारीख - 15/3/2021

▶️ गुन्हा दाखल तारीख - आज ता. 19/03/2021 ओझर पोलीस स्टेशन, जि नाशिक 

(गुरक्र 11/2021)

➡ *लाचेची मागणी :- मागणी 8000/- रूपये  

➡ कारण :- तक्ररदार यांचा ट्रांसपोर्ट व्यवसाय असून,,त्यांच्या माल वहातुकीच्या गाड्या न रोखणेसाठी व गाड्यावर कारवाई न करने साठी म्हणून, आरोपी क्र 1 व 2 यांनी पंचासमक्ष फिर्यादिकड़े महामार्ग सुरक्षा पथक(HSP),,कोकंणगाव, पिंपळगाव,जि नाशिक येथील कार्यालयात 8000/- रुपये लाचेची मागणी केली आहे.ओझर पो स्टे येथे गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करण्यात आले आहे

▶️ सापळा पथक :-श्री सतीश भामरे, पोलीस उपअधीक्षक, ला प्र वि, नाशिक 

▶️ सह सापळा पथक ----श्री नरेंद्र पवार, Dysp तसेच 1)पो हवा सुकदेव मुरकुटे 2), पो ना मनोज पाटील,3)पो हवा डोंगरे 4) पो ना इंगळे व पो चा जाधव सर्व ला प्र वि नाशिक

 ▶️ मार्गदर्शन 1)मा .श्री सुनील कडासने सो,पोलीस अधीक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र 2)मा .श्री नीलेश सोनवणे सो अप्पर पो अधीक्षक, ला प्र वि नाशिक परिक्षेत्र 3)पो उप अधीक्षक श्री विजय जाधव (वाचक )एसीबी,नाशिक परिक्षेत्र 

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.

www.acbmaharashtra.gov.in

अँन्टी करप्शन ब्युरो,नाशिक

@ दुरध्वनी क्रं. 0253-2578230

@ टोल फ्रि क्रं. 1064

====================

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

नायगाव तालुक्यातील गावांना ग्रामविकास विभागाच्या विविध योजनेतून विकासाकरिता निधी द्यावा-रा.यु.कॉं.सरचिटणीस वसंत सुगावे पाटील

 राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी

नायगाव : नायगाव तालुक्यातील घुंगराळा, वंजारवाडी, रुई, सावरखेड, कहाळा(खु),पाटोदा, कहाळा(बु) या गावातील सी .सी.रस्ते,नालीबांधकाम या कामांकरिता ग्रामविकास विभागाच्या 25/15 ,गट ब या योजनेतून निधी द्यावा. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटनिस वसंत सुगावे पाटील यांनी मंत्रालय मुंबई येथे मा.ना. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन अशी मागणी केली आहे. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मारोतराव कदम कुंटूरकर हेही उपस्थित होते .

     काही गावामध्ये ही कामे अपूर्ण असून तर काही गावांत आद्यप ही कामे झालेली नाहीत त्यामुळे या गावात कामे करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या गावांना लवकरात लवकर निधी देऊन ही कामे मार्गी लावावीत अशी मागणी वसंत सुगावे पाटील यांनी ग्रामविकासमंत्री मा.ना.हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे..निवेदन पत्रात नमूद केलेल्या गावांसहित इतर अजुन काही गावांमध्ये निधी ची आवश्यकता आहे त्या मुळे त्या गावांना सुद्धा निधी देण्यात यावा, अशी मागणी सुद्धा सुगावे यांनी या वेळी केली.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

व्होक्सवॕगन तर्फे एम एम तंञनिकेतनला ३० लाखांची मशिनरी भेट

 


पुणे : मराठवाडा मित्र मंडळ, पिंपरी चिंचवड येथील तंञनिकेतनच्या आॕटोमोबाईल डिपार्टमेंट मधे असलेल्या व्होक्सवॕगन प्रशिक्षण केंद्रात मागील १० वर्षापासून चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यामध्ये कौशल्य निर्माण केले जात आहे.तरी याची दखल घेऊन कंपनीने ऑटोमोबाईल क्षेत्रातील होणाऱ्या बदलांस अनुसरून आणि येणाऱ्या विद्युत वाहनांच्या अनुषंगाने कंपनीने ३० लाखाची काही मशिनरी आणि इतर साहित्य पुरवठा केला आहे. ज्याद्वारे भविष्यात येणाऱ्या विद्युत वाहनांचे तंञज्ञान तंत्रज्ञान विद्यार्थ्याना महाविद्यालयामार्फत शिकवता येईल.

यापूर्वी कंपनीने याच संस्थेत ६३ लाखाची गुंतवणूक केलेली होती.

आतापर्यंत व्होक्सवॕगन ग्रुप आॕफ टेक्निकल अॕप्रेंटिसशिप प्रोग्राम च्या अंतर्गत एकूण १० बॅचेस पूर्ण झाल्या आहेत . एकूण २४० विद्यार्थी व्होक्सवॕगन , स्कोडा, आॕडी या जर्मन कंपनीने बनवलेल्या वाहनावर प्रशिक्षण घेऊन विविध वाहन ऊद्योग क्षेत्रातील कंपनी मध्ये कार्यरत आहेत.

काही मुलांना या प्रशिक्षणांतर्गत दुबई येथील आॕडीसह इतर बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे. अशी माहिती ऑटोमोबाईल प्रमुख पी एन सूर्यवंशी यांनी दिली.

 ज्या पद्धतीने वाहन ऊद्योगात बदल सुरू आहेत त्याच्या अनुषंगाने मराठवाडा मित्र मंडळ मधील ऑटोमोबाईल डिपार्टमेंट विविध ऑटोमोबाईल कंपनी सोबत करार करून बदल स्वीकारत असल्याची माहिती प्राचार्या गीता जोशी यांनी दिली.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

दैनिक तुफान क्रांतीचा आदर्श सेवा सन्मान साहित्य पुरस्कार जेष्ठ साहित्यिक सुनील दबडे यांना जाहीर झाला आहे .


सांगोला (सोलापूर ) : येथील लोकप्रिय दैनिक तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब रज्जाक मुजावर यांनी साहित्यिक दबडे यांची आदर्श सेवा सन्मान साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेबाबत पत्राने दबडे यांना कळविले आहे .

    रविवार २१ मार्च रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत जिजामाता मल्टीपर्पज हॉल धायटी येथे पुरस्कार वितरण सोहळा रंगणार आहे . यावेळी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना पुरस्कार देवून गौरविले जाणार आहे .

  गेल्या आठवड्यात दबडे यांना नाशिकच्या तेजस फाऊंडेशनचा समाजभूषण पुरस्कार मिळाला आहे .

   दबडे यांची हाराटीची भुई , उन्हातल्या सावल्या , शिक्षणाचा टिळा , गावपांढरीच्या कविता ही पुस्तके प्रसिद्ध असून त्यांना आतापर्यंत अनेक साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे . शिक्षक परिषदेच्या व माध्यमिक शिक्षक संघाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारानेही दबडे यांना गौरविण्यात आले आहे .

   समाजातली अंधश्रद्धा दूर व्हावी , समाजात नवा विज्ञान विचार रुजावा म्हणून त्यांनी आतापर्यंत शेकडो सहप्रयोग व्याख्याने दिली आहेत . शासकीय ग्रंथ महोत्सवातून निमंत्रित कवी , व्याख्याते तसेच डोंबिवली मुंबई येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनात त्यांची निमंत्रित कवी म्हणून निवड झाली होती .

   लांजा राजापूर नागरिक संघामार्फत आयोजित ग्रामीण साहित्य संमेलनात दोन वेळा कवी संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती . जागुष्टे कुवारबाव तसेच कोंडये (कोकण) येथे भरलेल्या बालकुमार साहित्य संमेलनांची अध्यक्षपदे दबडे यांनी भुषविली आहेत .

   ग्रामीण तसेच बालकुमार साहित्य संमेलनांचे संयोजनही दबडे यांनी केले आहे .

  दैनिक पुढारी , दैनिक लोकमत , दैनिक रत्नागिरी टाईम्समध्ये पत्रकार म्हणून काम करून त्यांनी अनेक सामाजिक विषयांना वाचा फोडली आहे .

  आकाशवाणी व दूरदर्शनवरून त्यांचे अनेक समाजप्रबोधनपर तसेच साहित्यिक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत .

   साहित्यिक दबडे हे आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी गावचे आहेत . त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

राज्यात 18 ते 25 मार्च दरम्याण दररोज भाग बदलत तुरकक ठिकाणी अवकाळी पाउस व काही भागात जोरात वारे वाहू लागतील !


पंजाब डख - राज्यात 18 ते 25 मार्च दरम्याण  दररोज भाग बदलत तुरकक ठिकाणी  अवकाळी पाउस व काही भागात जोरात वारे  वाहू लागतील !

दिनांक 18,19,20,21, 22,2324,25 मार्च ला  महाराष्ट्रा मध्ये भाग बदलत पाउस पडणार आहे शेतकऱ्यांनी हळद, कांदा हरभरा ज्वारी गहू काढूण घ्यावे नसता झाकूण ठेवण्याची तयारी ठेवावी .

      

⛈️⚡ विजेचा कडकडाट सुरु झाला की सरळ घरा कडे      जा .🌳 झाडाखाली थांबू नका . जणावरा पासून दूर रहा . अंबा, वड, चिचं, लिबं, बाभळी,  या झाडाखाली थांबू नका व लाईट ट्रॉन्स फार्म या ठिकाणी थाबूं नका । अर्थिंग ठिकाणी विज पडते  . स्वःत ची काळजी घ्या .

🔴2021🟢⤵️

या वर्षी 14 जून ला मान्सून पाउस दाखल होइल . व ऑगस्ट संप्टेबर ऑक्टोबर पाउस जास्त राहील 3 नोव्हेंबर ला राज्यात मोठी पेरणी होइल .


🟢  उर्वरीत राज्यात   🌥️⛅ ढगाळ वातावरण राहणार.


🔴  वर दिलेले अंदाज विभाग नुसार आहेत . गावानुसार नाही माहीत असावे .


🟠  दिलेल्या तारखेत एक दिवस मागे पुढे होऊ शकतो माहीत असावे .


शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की दिशा ठिकाण वेळ बदलतो .


पंजाब डख

हवामान अभ्यासक

गुगळी धामणगाव ता . रा . कि . सस्था . महाराष्ट्र राज्य,ता. सेलू जि,परभणी ( मराठवाडा)

दि 18/03/2021

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com