गुरुवार, मार्च १८, २०२१

नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी तात्पुरती औरंगाबाद, मनमाड मार्गे धावेल


दक्षिण मध्य रेल्वे

जनसंपर्क कार्यालय, नांदेड

दिनांक 17.03.2021

प्रेस नोट – 1008

आदरणीय संपादक साहेब

नमस्कार

विषय – नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी तात्पुरती औरंगाबाद, मनमाड मार्गे धावेल  

सोलापूर विभाग, मध्य रेल्वे मधील भाळवणी ते भिगवण या रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरण चे कार्य पूर्ण करण्याकरिता तसेच इतर तांत्रिक कार्य करण्याकरिता नॉन-इंटरलॉक ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक मुळे गाडी संख्या ०७६१४/०७६१३ नांदेड-पनवेल-नांदेड या विशेष मार्गे परळी, लातूर या गाडीच्या १८ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या . 

परंतु प्रवाशांच्या आग्रहाखातर नांदेड-पनवेल-नांदेड विशेष गाडी रद्द केलेल्या कालावधीत आठवड्यातून चार दिवस (सोमवारी-बुधवारी-गुरुवारी आणि शनिवारी ) तिचा नियमित मार्ग बदलून परभणी, औरंगाबाद-मनमाड मार्गे धावेल. ती पुढील प्रमाणे –

मार्ग बदलून धावणाऱ्या गाड्या :

1) गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पवनेल विशेष गाडी दिनांक १८, २०, २२, २४, २५, २७, २९ आणि ३१ मार्च, २०२१ रोजी परळी, लातूर, कुर्दुवारी मार्गे न धावता मार्ग बदलून परभणी-१८.५०, सेलू-१९.३१, परतूर-१९.५१, जालना-२०.३२, औरंगाबाद -२२.०५, मनमाड-०१.३५ कोपरगाव-०३.०७ , पुणे-०९.३० , मार्गे धावून पनवेल येथे १२.३० वाजता पोहोचेल.  

2) गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड विशेष गाडी दिनांक १९, २१, २३, २५, २६, २८ आणि ३० मार्च, २०२१ रोजी पनवेल येथून १६.०० वाजता सुटून लातूर, परळी मार्गे न धावता तिचा मार्ग बदलून पुणे-१९.३०, कोपरगाव- ०२.०२, मनमाड-०४.१०, औरंगाबाद-०६.१५, जालना-०७.०२, परतूर-०७.३१, सेलू-०७.५१, परभणी-०८.४७, पूर्णा ०९.२० मार्गे नांदेड येथे सकाळी ११.०० वाजता पोहोचेल . .

 गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे 

आदरणीय संपादक महोदयांना विनंती आहे हि महत्वाची बातमी आपल्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध करावी.

जनसंपर्क कार्यालय, नांदेड


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

महाडीबीटी पोर्टल वर पुन्हा सर्व शेतकरी बांधवांनी सन 2021-22 साठी अर्ज करावेत व विविध शेती विषयक योजनेचा लाभ घ्यावा-गजानन पाटील चव्हाण

     


  नायगाव : कृषी खात्याच्या विविध योजनेमधील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दर वेळी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची किटकिट पद्धत आता बंद करण्यात आली आहे पारदर्शकतेसाठी सर्व सुविधा देणारे https.mahadbtmahait.gov.in हे महाडीबीटी पोर्टल सुरू झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय दूर झाली बहुतेक योजनांसाठी एकाच ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा मिळाल्याने सन वर्ष 2020 व 21 मध्ये 12 लाख शेतकर्‍यांनी पहिल्याच टप्प्यात 24 लाख बाबीसाठी अर्ज केले आहे. 

तालुका कृषी अधिकारी सिंगाडे यांच्याशी चर्चा केली असता सदर पोर्टलवर 2020 -21 साठीच्या या योजनांना चांगला प्रतिसाद मिळाला त्यानुसार आलेल्या लॉटरीमध्ये शेतकऱ्यांना काही ठिकाणी पूर्व संमती पत्रे देणे सुरू आहे. 

तर काही योजनांमध्ये निधीची उपलब्धता पाहून कामे सुरू आहेत मात्र कोणत्याही योजनेसाठी निवड झालेल्या शेतकरी आता पुन्हा पोर्टलवर जाऊन त्यांच्या  अर्जामध्ये बदल करू शकतात असे सुधारित अर्ज 2021-22 करिता ग्राह्य धरणार आहेत तसेच असा बदल करणाऱ्या शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाहीत.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्यभरात कोणत्याही सामुहीक सेवा केंद्राची मदत शेतकरी बांधव घेऊ शकतात 

मात्र कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास helpdeskdbtfarmer@gmail.com या मेलवर किंवा 020-25511479 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक मात्र आधी महाडीबीटीच्या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागणार आहे.

एखाद्या शेतकऱ्याकडे आधार क्रमांक नसल्यास प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन नोंदणी करावी लागणार आहे आधारचा असा नोंदणी क्रमांक मिळताच पुन्हा महाडीबीटी पोर्टलमध्ये तो क्रमांक नमूद करून योजनेसाठी अर्ज करता येईल मात्र आधार क्रमांक प्रमाणित करून घेतला नसल्यास अनुदानाचे वितरण होणार नाही,असे कृषी खात्याच्या वरिष्ठ व संबंधितासोबत चर्चा करते वेळेस स्पष्ट सांगितले आहे  

पुढील प्रमाणे फलोत्पादन योजने अंतर्गत

👉🏻 कांदा चाळ 👉🏻 पॅक हाऊस 👉🏻जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन 👉🏻फळबागांना आकार देणे 👉🏻 फळबाग लागवड

👉🏻 मधुमक्षिकापालन

👉🏻 हरितगृह 👉🏻शेडनेट हाऊस 👉🏻प्लास्टिक मल्चिंग 

*तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत* 

 👉🏻 आंबा लागवड 👉🏻डाळिंब लागवड 👉🏻मोसंबी लागवड 👉🏻पेरू लागवड 👉🏻सिताफळ लागवड 

👉🏻तसेच इतर फळबाग लागवड योजना 👉🏻शेततळ्यातील पन्नी

👉🏻 सामायिक शेततळे 

कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत

👉🏻ट्रॅक्टर 👉🏻 ट्रॅक्टर व पावर ट्रेलर चलित अवजारे 👉🏻प्रक्रिया संच 👉🏻पावर टिलर 👉🏻बैलचलित अवजारे

👉🏻 मनुष्य अवजारे 👉🏻स्वयंचलित अवजारे

👉🏻 कल्टीवेटर 👉🏻कापणी यंत्र 👉🏻नांगर 👉🏻पेरणी यंत्र 👉🏻मल्चिंग यंत्र 👉🏻मळणी यंत्र 👉🏻रोटावेटर 👉🏻 वखर

आवश्यक कागदपत्रे

1) ७/१२, 2)८ अ, 3)बॅक पासबुक,4)आधारकार्ड

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. 

 संबंधित कृषी कार्यालयाच्या अधिकारी यांचे सोबत चर्चा करते वेळेस तालुका कृषी अधिकारी बी एस सिंगाडे, कृषी मंडळ अधिकारी टी जी सुगावे,शेतकरी मित्र डुमणे, धनंजय पा.चव्हाण सह कार्यालयातील सर्व स्टॉप उपस्थित होते

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com


संपत्तीच्या वादातून इसमाचा संशयास्पद मृत्यू ४ बहिणी व भावजींसह १२ जणांविरुध्द गुन्हा

 
नायगाव : तालुक्यातील धानोरा तमा येथे लटकवलेल्या स्थितीत आढळून आला, या प्रकरणी रामतीर्थ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. परंतु या इसमाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केल्याने या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिव्यली. संपत्तीच्या वादातून या इसमाची बहीण,भावजी व भाच्यांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी एकूण १२ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील टाकळी त.मा.येथील रहिवासी तुळशीराम दता झेलेकर ५० व त्याच्या बहिणी केराबाई शेषेराव गोरगे रा.धानोरा त.मा., चंदरबाई धोडिबा गिने रा.मुगाव,सुनीता हणमंत बोडके रा.पोखणी, अनिता अशोक लव्हाळे, रासालेगाव यांच्यात संपत्तीचा वाद होता. दोन वर्षांपासून हा वाद नायगावच्या न्यायालयात सुरु आहे.या संदर्भात दोन्ही बाजूंनी अनेक बैठका घेण्यात आल्या पण त्या निष्फळ ठरल्या. बैठक आहे म्हणून तुळशीराम यांना धानोरा येथे १६ मार्च रोजी मेव्हणा शेषेराव गोरगे यांनी तुळशीरामचा मुलगा अर्जुन जवळ निरोप देऊन बोलावून घेतले. तुळशीराम हा टाकळी त.मा येथून गेला. पण परत आला नाही. यामुळे मयताच्या नातेवाईकांचा संशय बळावला. वडील मुलगा अर्जुन तुळशीराम झेलेकर हा १७ मार्च रोजी सकाळी वडिलांच्या शोधार्थ टाकळी त.मा.रस्त्याने पायी निघाला असता काही महिला त्याला भेटल्या व त्यांना चौकशी केला असता धानोरा शिवारात पश्चिम दिशेला शेषेराव गोरगे यांच्या शेतात एकाचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या स्थितीत असल्याचे आढळून आले. अर्जुनने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा प्रकार संशयास्पद वाटला. त्याने त्याने ही माहिती नातेवाईकांना दिली. नंतर रामतीर्थ पोलिसांना ही घटना कळविली. पोलीस घटनास्थळी आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी रामतीर्थ पोलिसांना सांगितले रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी मयताचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करु असे आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी सहा तासानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नायगावला नेण्यास परवानगी दिली. मृत व्यक्ती तुळशीराम हा टाकळी त.मा. येथील रहिवासी आहे त्यास १० एकर भिजवणीची जमीन आहे. संपत्ती बळकावण्याच्या हेतूने मयताच्या ४ बहिणींनी वाद निर्माण केला आहे. पूर्वी तुळशीराम यांचे वडील दत्ता झेलकर यांचाही धानोरा येथेच गोरगे यांच्या घरी मृत्यू झाला असून, जमिनीच्या वादातून ४ बहिणी व त्यांचे मालक, मुलांनी तुळशीरामला संपविण्यासाठी प्रकार केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला.

हा मयत तुळशीराम यास २ मुले, सुना नातवंडे,२ मुली असा परिवार आहे. पत्नीचा दोन महिन्यापूर्वी याच वादातून तणावात अपघाती मृत्यू झाल्याचा आरोपही नातेवाई कांनी केला.मयताचा मुलगा अर्जुन झेलेकर याच्या फिर्यादीवरुन केराबाई शेषेराव गोरगे बहीण-भाजवी, रा धानोरा त.मा, चंदरबाई धोंडिबा गिने बहीण भावजी रा.मुगाव, सुनीता हणमंत बोडके बहीण भावजी रा.पोकर्णी,ता बिलोली, अनिता अशोक लव्हाळे बहीण व भावजी रा.सालेगाव नायगाव व अन्य चार भाचे यांच्याविरुध्द रामतीर्थ पोलीस ठाण्यात कलम ३०६ नुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि महादेव पुरी अधिक तपास करीत आहेत.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोव्हिडं ची लस निर्धोक नागरिकांनी स्वयंस्फूर्त पणे घ्यावी-बाळासाहेब पांडे मांजरमकर


नायगाव : कोविशिल्ड पुणे व्हँकशिण लस निर्धोक व सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक असून सर्व नागरीक यांनी घ्यावी असे मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी सर्व नागरिकांना आवाहन करून आमच्या प्रतिनिधींशी बोलतानाकेले आहे.

    दिनांक 17 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे नोडल अॉफीसर डॉ. नरेश देशपांडे देवणीकर यांच्या देखरेखीखाली व वैद्यकीय अधिक्षक डॉ. हनुमंतराव गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविल्ड शिल्डची लस जेष्ठ पत्रकार तथा अध्यापक बाळासाहेब पांडे यांनी घेतली. ही लस सिस्टर (नर्शने ) दिली.

     या वेळी पुण्यनगरीचे नायगाव ता प्रतिनिधी बाळासाहेब पांडें यांनी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधला व सांगितले की, कोविशिल्ड पुणेची लस पूर्णपणे सुरक्षित असून ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींनी कसलीच भिती न बाळगता सोबत आधार कार्ड घेऊन येऊन सकाळी १० ते ५ या वेळेत ग्रामीण रूग्णालय नायगाव बा. येथे व प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम, बरबडा, कुंटुर येथे जाऊन लस घ्यावी. अशी विनंती व आवाहन केले पांडे यांनी केले आहे.     

    ते पुढे म्हणाले देशातील राज्यातील कोव्हिडं 19 कोरोना चे प्रमाण वाढत आहे.येणाऱ्या काळात घाई गडबड न करता शांत जीवन जगण्या साठी कोव्हिडं ची लस घेऊन मानसिक भीती दूर करावी व आपली ह्युमनीटी पावर वाढवून घ्यावी तसेच प्रशासन आरोग्य यंत्रणा यांना सहकार्य करावे असे आवाहन बाळासाहेब पांडे यांनी इतरांना केले आहे.पांडे यांनी लस घेणाऱ्या नागरिकांना प्रमाण पत्र देण्यात यावे अशी ही मागणी केली(.

     या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी दुरणाळे,यमुनाबाई प्राथमिक शाळा नायगाव च्या मुख्याधिपिका सुनंदा बाळासाहेब पांडे,पत्रकार साहेबराव मेळगवकर,सौ मेळगावकर आदीने ही लस घेतली.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com