
नायगाव : कोविशिल्ड पुणे व्हँकशिण लस निर्धोक व सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यावश्यक असून सर्व नागरीक यांनी घ्यावी असे मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष पत्रकार बाळासाहेब पांडे मांजरमकर यांनी सर्व नागरिकांना आवाहन करून आमच्या प्रतिनिधींशी बोलतानाकेले आहे.
दिनांक 17 मार्च रोजी ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे नोडल अॉफीसर डॉ. नरेश देशपांडे देवणीकर यांच्या देखरेखीखाली व वैद्यकीय अधिक्षक डॉ. हनुमंतराव गुंटूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविल्ड शिल्डची लस जेष्ठ पत्रकार तथा अध्यापक बाळासाहेब पांडे यांनी घेतली. ही लस सिस्टर (नर्शने ) दिली.
या वेळी पुण्यनगरीचे नायगाव ता प्रतिनिधी बाळासाहेब पांडें यांनी भ्रमणध्वनिवरून संपर्क साधला व सांगितले की, कोविशिल्ड पुणेची लस पूर्णपणे सुरक्षित असून ५० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक बंधू-भगिनींनी कसलीच भिती न बाळगता सोबत आधार कार्ड घेऊन येऊन सकाळी १० ते ५ या वेळेत ग्रामीण रूग्णालय नायगाव बा. येथे व प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम, बरबडा, कुंटुर येथे जाऊन लस घ्यावी. अशी विनंती व आवाहन केले पांडे यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले देशातील राज्यातील कोव्हिडं 19 कोरोना चे प्रमाण वाढत आहे.येणाऱ्या काळात घाई गडबड न करता शांत जीवन जगण्या साठी कोव्हिडं ची लस घेऊन मानसिक भीती दूर करावी व आपली ह्युमनीटी पावर वाढवून घ्यावी तसेच प्रशासन आरोग्य यंत्रणा यांना सहकार्य करावे असे आवाहन बाळासाहेब पांडे यांनी इतरांना केले आहे.पांडे यांनी लस घेणाऱ्या नागरिकांना प्रमाण पत्र देण्यात यावे अशी ही मागणी केली(.
या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी दुरणाळे,यमुनाबाई प्राथमिक शाळा नायगाव च्या मुख्याधिपिका सुनंदा बाळासाहेब पांडे,पत्रकार साहेबराव मेळगवकर,सौ मेळगावकर आदीने ही लस घेतली.
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा
open this link in a new window
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता