रविवार, मार्च ०७, २०२१

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी नांदेडच्या तत्कालीन लाचखोर सुनिल नागेश खमितकर या नराधमाकडून (समाज कल्याण अधिकारी,जि.प.लातूर) मुलीकडे पैसे आणि शरीरसुखाची मागणी_योगिता चौधरी यांचा गंभीर आरोप

 


लातूर (दि. ७ मार्च २०२१) : अनुकंपा तत्त्वावर नोकरीस पात्र असताना एका समाज कल्याण अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे एका गरीब मुलीला नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. घरात कोणीच कमावती व्यक्ती नसताना समाज कल्याण अधिकाऱ्याच्या या मनमानी कारभारामुळे एका कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. जीवन विकास प्रतिष्ठान लातूर येथील संस्थेच्या सचिवपदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या मनमानीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. 

जीवन विकास प्रतिष्ठान लातूर, येथील मतीमंद विद्यालयात सहशिक्षक म्हणून नोकरीवर असलेल्या दिलीप माधवराव चौधरी यांचे सेवेत कार्यरत असताना ५ जुलै २००७ रोजी आकस्मिक निधन झाले. त्यानंतर तीन महिन्यांनंतर म्हणजेच १९ नोव्हेंबर २००७ रोजी त्यांच्या पत्नीने जिल्हाधिकारी यांच्याकडे अनुकंपा तत्त्वावर नोकरीसाठी अर्ज केला. वारसदार असूनही त्यांच्या पत्नीला नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले. त्यानंतर दिलीप चौधरी यांच्या मुलीने अनुकंपावरील नोकरीसाठी ९ ऑगस्ट २०२० रोजी अर्ज केला. समाज कल्याण अधिकारी यांनी शाळेचे मुख्याध्यापक यांना पत्र पाठवले. त्यानंतर मुख्याध्यापकांनी रितसर प्रस्ताव समाज कल्याण अधिकाऱ्यांना पाठवला. 

समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर यांनी जाणीवपूर्वक अनुकंपा तत्त्वावरील नोकरी देण्यास टाळाटाळ सुरू केली आहे. सुनिल खमितकर हे नोकरीच्या बदल्यात पैशांच्या मागणीसोबतच शरीरसुखाची मागणी करीत आहे, असा आरोप मुलीने केला आहे. माझ्या मर्जी विना तुला नोकरी कशी मिळते, हे पाहतो, असे सांगून माझ्याविरोधात खोटेनाटे आरोप करायला सुरुवात केली आहे, त्यामुळे माझ्या नियुक्तीचा मार्ग रोखला गेला आहे. वडिलांना जाऊन १४ वर्षाचा काळ लोटला आहे. घरात कमावती व्यक्ती नसल्याने आमच्या कुटुबांवर उपासमारीची वेळ आली आहे. माझे नाव प्रतीक्षा यादीत असून तसेच संबंधित शाळेत रिक्त पद असताना समाज कल्याण अधिकाऱ्याच्या आडमुठेपणामुळे आमच्या कुटुंबाला नाहक त्रास होत असल्याचे दिलीप चौधरी यांच्या मुलीने जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या अर्जात म्हटले आहे. तसेच दिव्यांग कल्याण आयुक्तालयाला पत्र पाठवले असून नोकरी न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा या मुलीने या पत्रातून दिला आहे.














✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window



हॉटेल साठी विज कनेक्शन जोडून देण्याच्या मोबदल्यात ६ हजार लाच स्वीकारताना दोघे एसीबीच्या जाळ्यात



प्रेस नोट

ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगांव दि.०५.०३.२०२१

आरोपी श्री.रविंद्र धनसिंग पाटील,वरीष्ठ तंत्रज्ञ व आरोपी श्री.प्रल्हाद उत्तम सपकाळे, कंत्राटी वायरमन,म.रा.वि.वि.कं. मर्या.विदगांव कक्ष ता.जि.जळगांव यांना ६,०००/- रु. ची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव यांची कारवाई

  1. घटक - जळगांव
  2. गुन्हा नोंद क्रमांक - जळगांव तालुका पो.स्टे. गुरनं.०६६/२०२१
  3. कलम - भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम ७ 
  4. आरोपीचे नांव व कार्यालय - १. श्री.रविंद्र धनसिंग पाटील,वय ४७, व्यवसाय नोकरी,वरीष्ठ तंत्रज्ञ,म.रा. वि.वि.कं.मर्या विदगांव कक्ष ता जि.जळगांव रा.म.रा.वि.वि.कंपनीचे शासकिय निवासस्थान,एम.आय.डि.सी.जळगांव मुळ रा.फुपनगरी ता.जि. जळगांव (खाते म.रा.वि.वि.कं.मर्या, वर्ग-३),२)श्री.प्रल्हाद उत्तम सपकाळे,वय ४१,व्यवसाय खाजगी नोकरी, कंत्राटी वायरमन,म.रा.वि.वि.कं.मर्या विदगांव कक्ष ता.जि.जळगांव रा.बस स्टॅन्ड जवळ, विदगांव ता.जि.जळगांव (खाजगी इसम)
  5. मागणी केलेली लाचेची रक्कम - ७,०००/-रु.
  6. स्विकारलेली लाचेची रक्कम - ६०००/-रु.(त्यात ५००/- रू.दराच्या १२ नोटा अ.पा.लावलेल्या )

थोडक्यात माहीती -

                            यातील तक्ररदार यांचे अमोदे खुर्द ता जि.जळगांव येथील जत्रा हॉटेल साठी विज कनेक्शन जोडुन विज मिटर बसवुन देण्याच्या मोबदल्यात यातील आरोपी क.१ यांनी ७,०००/- रुपयांची लाचेची मागणी केल्याने तकारदार अॅन्टी करण्शन ब्युरो,जळगांव यांचेकडेस दि.०४.०३.२०२१ रोजी तकार दिली होती.

सदर तक्रारीची दि.०५.०३.२०२१ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगांव पथकाने पडताळणी केली असता यातील आरोपी क्र.१ व २ यांनी तक्ररदार यांचे हॉटेलवर विज कनेक्शन जोडुन विज मिटर बसवून देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष ७,०००/-रु.लावेची मागणी केली. त्यानंतर दि.०५.०३.२०२१ रोजी सापळा आयोजित केला असता आरोपी कं.१ यांच्या वतीने आरोपी कं.२ यांनी तक्ररदार यांचेकडुन ६,०००/-रु. लाचेची रक्कम वर नमुद वेळी व ठिकाणी पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आव्हान करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव कार्यालयात संपर्क करावा. 

संपर्क पत्ता:-लाप्रवि.जळगांव कार्यालय

संकेतस्थळ:- dyspacbjalgaon@gmail.com

ऑन लाईन तकार/ॲप्लीकेशन:- acbmaharastra.nct

टोल फ्री कंमाक:- १०६४

दुरध्वनी कंमाक:- ०२५७,२२३५४७७

व्हॉट्सॲप कंमाक:- ९६०७५५६५५६


(एन.एस.लोधी) 

पोलीस निरीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगांव


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

डेअरी मॅनेजरने दुध सेंटरच्या तक्रारी बाबत मागितली १५ हजाराची लाच व दारुचा खंबा

 


मुंबई विभाग

दि./०३/२०२१

प्रेसनोट

  1. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : मुंबई विभाग
  2. गुन्हा नोंद क्रमांक - ११/२०२१
  3. कलम - कलम ७ भ्र.प्र. अधिनियम १९८८
  4. आरोपीताचे नाव व कार्यालय - बापु तानाजी चोरगे, वय ५४ वर्ष धंदा-नोकरी, कनिष्ठ लिपीक,गोरेगांव, मुंबई
  5. मागणी केलेली लाचेची रक्कम - रु.१५,०००/- दारूचा खंबा
  6. तडजोडी अंत स्विकारलेली लाचेची रक्कम - रु.१५,०००/-
  7. स्विकारलेली लाचेची रक्कम - १५,०००/-

थोडक्यात माहिती - 

                            यातील फिर्यादी हे गवई आय आय टी गेट समोर आरे दुध सेंटर चालवितात. दि.०१/११/२०२० रोजी फिर्यादी हे नामीप्रमाणे दुध सेंटर वर असंताना डेअरी अधिकारी श्री. बोरसे व त्यांचेसोबत आणखी एक इसम असे दोघेजण त्यांचे दुध सेंटरवर आले व त्यांनी फिर्यादी यांना " दुध सेटर मधील फ्रिज बंद आहे व दुध सेंटरच्या बाबतीत तक्रारी आहेत" असे सांगुन दुध सेंटरच्या बाहेर फिर्यादी यांना काढून त्यांचे दुध सेंटर सीलबंद केले व निघुन गेले.

दि.०२/११/२०२० रोजी फिर्यादी हे आरे सेंटर गोरेगाव येथील कार्यालयातील डेअरी अधिकारी श्री बोरसे यांना भेटले असता त्यांनी डेअरी मैनेजर श्री जी.एन. राऊत व श्री बापू चोरगे यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी हे श्री.राऊत व श्री चोरगे यांना भेटले. त्यावेळी फिर्यादी यांना लोकसेवक यांनी आज-उद्या असे करत त्यांचे दुध सेंटर उघडून दिले नाही

फेबुवारो २०२१ मध्ये फिर्यादी हे लोकसेवक श्री बापू चोरगे यांना भेटले असता, त्यानी फिर्यादी यांचेकडे रु.१०,०००/- लाचेची मागणी कोली व त्यानंतर दुध सेंटर उघडून देतो असे सांगितले. त्याप्रमाणे फिर्यादी यांनी लोकसेवक चोरगे याना रू १०.०००/- दिले. परंतु पैसे देवुनही लोकसेवक यांनी फिर्यादी याचे दुध सेंटर त्यांना उघडू दिले नाही. त्यामुळे फिर्यादी हे दि.०२/०३/२०२१ रोजी लोकसेवक बापू चोरगे यांना सेंट्रल डेअरी, आरे येथे जावून भेटले असता, श्री बोरगे यांनी फिर्यादी यांना : १५,०००/- व एक दारूचा खंबा घेवून दि.०५/०३/२०२१ रोजी भेटण्यास या असे सांगितले. परलू फिर्यादी यांची लोकसेवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी, मुंबई येथे दि.०३/०५/२०२१ रोजी लेखी तक्रर अर्ज दिला होता.

फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिनांक ०५.०३.२०२१ रोजीच्या पडताळणी दरम्यान लोकसेवक यांनी रु. १५,०००/- व दारूचा खंबा अशी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्याप्रमाणे रचण्यात आलेल्या सापळा कारवाईच्या वेळी लोकसेवक बापु तानाजी चोरगे यांना फिर्यादी यांचेकडुन रू१५.०००/- लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले. आलोसे यांनी लाचेची रक्कम स्थिकारल्याने त्यांचेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

लागलुगपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारा संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभागाशी संपर्क साधावा.

संपर्क : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग, ९१, सरपोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई ३०.

टोलफ्री क्र.१०६४, दूरध्वनी क्र. ०२२-२४९२१२१.२, फेक्स क्र. ०२२-२४९२२६१८, वेबसाईट-acbmaharashtra.gov.in, ईमेल -acbwebmail@mahapolice.gov.in,

ईमेल- addlepacbr ii@mahapolice.gov.in, फेसबुक - www.facebook.com - Maharashtra ACB.

मोबाईलप- www.acbmaharashtra.net

व्हॉट्सॲपक्रमांक-१९३०९९७७००


(वैशाली गोरडे) सहा पोलीस आयुक्त, ला.प्र.वि.,मुंबई विभाग, मुंबई.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

आज नरसी येथे गुरु रविदास जयंती सोहळ्याचे आयोजन : सर्वसमाज बांधवांनी लाभ घ्यावा


नरसी (७ मार्च) :- नायगांव तालुक्यातील नरसी येथे क्रांतीकारी महामानव जगतगुरु गुरु रविदास महाराज यांच्या सार्वजनिक जयंती सोहळ्याचे आयोजन केलेआहे . तरी परीसरातील तमाम बहुजन बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाधर गंगासागरे यांनी केले आहे . 

      दिनांक ०७ मार्च २०२१ रविवार रोजी सकाळी १०-३० वाजता नरसीच्या शामनगर मधील ज्योती प्राथमिक शाळा मैदानावर हा जयंती सोहळा आयोजित केला आसून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर , मास्क , सैनिटायजर चा वापर केला जाईल. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ साहीत्यीक भगवानराव पाटील भिलवंडे हे असतील तर उद्घाटक म्हणून श्रावण पाटील भिलवंडे व प्रमुख वक्ते म्हणून इंजि. चंद्रप्रकाश देगलुरकर यांची उपस्थीती राहणार आहे . तसेच प्रमुखअतिथी म्हणून जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे ,गुरु रविदास समता परीषदेचे नामदेव फुलपगार , प्रकाशभाऊ कामळजकर , राचमचे माधवराव गायकवाड , संभाजी पा.भिलवंडे , प्रकाशदादा भिलवंडे , रविंद्र पा.भिलवंडे , भास्कर पा.भिलवंडे , मारोती पा.भिलवंडे , सपोनि महादेव पुरी , सरपंच पप्पू भिलवंडे , पो.पा. इब्राहीम बेग पटेल , तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर वडगावे आदी मान्यवरांच्या उपस्थीतीत हा जयंती सोहळा पार पडणार आहे .

    तरी परीसरातील बहुजन समाज बांधवांनी या जयंती सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन जयंती मंडळाचे अध्यक्ष तथा पत्रकार गंगाधर गंगासागरे , सचिव हाणमंत गंगासागरे , उपाध्यक्ष माधव गंगासागरे , भारत गंगासागरे , भास्कर गंगासागरे , दत्‍ता गंगासागरे , अणिल गंगासागरे , सुनिल गंगासागरे , संतोष कांबळे , व्यंकट गंगासागरे , ज्ञानेश्वर गंगासागरे , बाबू गंगासागरे , आनंदा बरबडे , बालाजी बरबडे , जमनाजी कांबळे , धोंडीबा कांबळे , सल्लागार दिगांबर गंगासागरे , गंगाराम गंगासागरे , चंद्रकलाबाई गंगासागरे , शशिकलाबाई कांबळे आदींनी केले आहे .


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

लाचखोरी प्रकरणी कारावास : नायगाव सजाच्या तलाठ्याला 13 हजार लाच प्रकरणी पाच वर्षे सक्त मजूरी 10 हजार दंड

 

नाशिक, दि.०५/०३/२०२१

प्रेसनोट

आलोसे मनोज किसन नवाळे, तलाठी, सजा नायगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक यांना भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये शिक्षा झाले बाबत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग/घटक नाशिक

गुन्हा नोंद क्रमांक - सिन्नर पोलीस स्टेशन, जि.नाशिक ग्रामीण गुरनं. ३०१७/२०१३

कलम - भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७,१३(१) (ड) सह १३(२) प्रमाणे

आरोपींचे नांव व कार्यालय - मनोज किसन नवाळे, तलाठी, सजा नायगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक

मागणी कलेली लाचेची रक्कम - १३,०००/-रुपये

स्विकारलेली लाचेची रक्कम - १३,०००/-रुपये

थोडक्यात माहिती - 

                             यातील तक्ररदार यांचे आई व वडीलांनी ब्राम्हणवाडे शिवारात १० गुंठे शेती विकत घेतली होती. त्याबाबत महसुल रेकॉर्डला नोंद घेणेसाठी आलोसे मनोज किसन नवाळे, तलाठी, सजा नायगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडे १३,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्ररदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय, नाशिक कार्यालयात तक्रर दिली होती. तक्रारदार यांचे तक्रारवरुन दिनांक १४/८/२०१३ रोजी ला.प्र.वि. नाशिक पथकाने पडताळणी करुन सापळा आयोजित केला असता आलोसे मनोज किसन नवाळे यांनी तक्ररदार यांचेकडे १३,०००/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम पंच साक्षीदारांसमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहात पकडून त्यांचे विरुद्ध सिन्नर पोलीस स्टेशन गुरनं. ३०१७/२०१३ भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा सन १९८८ चे कलम ७,१३(१) (ड) सह १३(२) प्रमाणे दिनांक १५/८/२०१३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करुन मा. नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सदर खटल्याचा आज दिनांक ०५/०३/२०२१ रोजी मा.श्रीमती एस.एस. नायर, अति. जिल्हा व सत्र न्यायधिश, जिल्हा न्यायालय नाशिक यांनी निकाल दिला असून त्यात आलोसे मनोज किसन नवाळे यांना भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम ७ प्रमाणे - ५ वर्षे सक्त मजूरी व १०,०००/- रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा तसेच कलम १३(२) प्रमाणे - ५ वर्षे सक्त मजूरी व १०,०००/-रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारपक्षातर्फे सह सरकारी अभियोक्ता श्री. कडवे यांनी पाहिलेले आहे.

लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारसंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्यशी संपर्क करावा.

संपर्क पत्ता - ला प्र वि.नाशिक परिक्षेत्र नाशिक कार्यालय

संकेतस्थळ - acbmaharashtra.gov.in

ई-मेल - spacbnasik@mahapolice.gov.in

ऑनलाईन तकार/ॲप्लीकेशन - acbmaharastra.net

टोल फ्री क. - १०६४

दुरध्वनी क. - ०२५३ २५७५६२८, २५७८२३०

 व्हॉटस ॲप क. - ९९३०९९७७००


(विजय जाधव )

वाचक पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उप-मुख्यमंञी,विधानसभा अध्यक्ष,विरोधी पक्षनेते दिनदुळ्या दिव्यांग,वृध्द,निराधार यांना चालू अधिवेशनात न्याय देतील काय? संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे

 


नांदेड (दि. ७ मार्च) :  दिव्यांग,वृध्द,निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ऊपमुख्यमंञी, विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते यांना दिनदुबळ्या दिव्यांग, वृध्द,निराधार यांच्या हक्काचे कायदे अधिवेशनात पास होतात,  मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही,दिव्यांग कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण आदेशित करावे याकरिता जिल्हाधिकारी नांदेड यांचे मार्फत डाकोरे पाटिल शिष्टमंडळ निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या सोबत चर्चा करून खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले. 

प्रमुख मागण्या

  1. दिव्यांग कायदा २०१६ ची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसभा, तालुका, जिल्हास्तरावर ग्रामसभा घेऊन माहिती द्यावी 
  2. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये दिव्यांग निधी पाच टक्के ची अंमलबजावणी करणे 
  3. दिव्यांग वृध्द निराधार यांना दरमहा मिळणारे अनुदान दरमहा पाच हजार रूपये वाढ करून वेळेवर वाटप करावे
  4. दिव्यांग व्यक्ती जीवंत असे पर्यत कायमस्वरूपी निवासी आश्रम उभारण्यात यावे
  5. दिव्यांग विधवा, निराकार, भूमिहीन यांना पाच एकर शासकीय जमीन मिळणे.
  6. दिव्यांगास विवाह प्रोत्साहन भत्ता एक लाख रूपये देण्यात यावा. 
  7. प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांची भवन उतरावे. 
  8. दिव्याग बांधवाना गावठाण जमीनीत घरकुल बांधुन दिव्यांगची वस्ती निर्माण करणे
  9. दिव्यांगाच्या कल्याणासाठी स्वतंञ दिव्यांग विभाग,तालुका, जिल्हा,विभाग,मंञालय स्तरावर, विस्तार करावा. 
  10. दिव्यागासाठी व्यवसाय करण्यासाठी बीज भांडवल व कर्जाचे प्रकरण ना मंजुर करणार्‍या अधिकारी यांना कार्यवाही करणे. 
  11. दिव्यांग पुनर्वसनाशी संबधित ग्रामपंचायत. तालुका जिल्हा पातळिवर सर्व समित्यांवर दिव्यांगाचे प्रतिनिधी देण्यात यावे.
  12. दिव्यांगास व्यवसाय करण्यासाठी बसस्टाँन्ड, रेल्वे स्टेशन शासकीय आँफिस अशा ठिकाणी जागा, गाळे मिळणे 
  13. दिव्यांगाना शासकीय, खाजगी कंपनीत, सेवाभावी सस्थेत नोकरीत दहा टक्के राखीव आरक्षण देऊन पुर्ण अनुशेष भरावा. 
  14. दिव्यांगाना लघु ऊधोग उभारणीसाठी विशेष मोहीम आखावी व्यवसाय करण्यासाठी विनामुल्य स्टाईल साहित्य वाटप करावे 
  15. दिव्यांगाच्या आँनलाईन तपासणीत खरे दिव्यांगाना न्याय द्यावा चाळिस टक्के पेक्षा कमी असलेल्या फेर तपासणी साठी जे जे हास्पिटल मुंबई येथे अपील केल्यानंतर SADM प्रणाली द्वारे तपासणी केली जात होती .परंतु दि ३ आँक्टो. १८ SADM प्रणाली बंद करून युनिक प्रणालीत तपासणी केली जात आहे.पण या प्रणालीत फेर अपिलाची नोंद नसल्याने खरे दिव्यांग वंचित राहात आहेत 
  16. दिव्यांगाना मारहाण अपमानवागणूक देणाऱ्यावर 2016 नुसार कलम 92बी 93 प्रमाणे आरोपी वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी
  17. आमदार निधी - पंधरा लाख दरवर्षी दिव्यांगाना स्थानिक मतदार संघात आमदार निधी २०१६ पासुन मिळत नाही
  18. अंत्योदय राशन योजना - दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे.पण त्याची अंमलबजावणी होत नाही.

     मा.मुख्यमंत्री,उप-मुख्यमंञी,विधानसभा अध्यक्ष,विरोधी पक्षनेते,मंञी यांनी वरील प्रश्न उपस्थित करून दिनदुबळ्यांना न्याय द्यावा

     असे निवेदनाचे पञ दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, नांदेड ता अध्यक्ष गजानन हंबर्ड यांनी दिले.


















✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर

open this link in a new window

www.nandednewsupdate.blogspot.com