प्रेस नोट
ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगांव दि.०५.०३.२०२१
आरोपी श्री.रविंद्र धनसिंग पाटील,वरीष्ठ तंत्रज्ञ व आरोपी श्री.प्रल्हाद उत्तम सपकाळे, कंत्राटी वायरमन,म.रा.वि.वि.कं. मर्या.विदगांव कक्ष ता.जि.जळगांव यांना ६,०००/- रु. ची लाच स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव यांची कारवाई
- घटक - जळगांव
- गुन्हा नोंद क्रमांक - जळगांव तालुका पो.स्टे. गुरनं.०६६/२०२१
- कलम - भ्रष्टाचार प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम ७
- आरोपीचे नांव व कार्यालय - १. श्री.रविंद्र धनसिंग पाटील,वय ४७, व्यवसाय नोकरी,वरीष्ठ तंत्रज्ञ,म.रा. वि.वि.कं.मर्या विदगांव कक्ष ता जि.जळगांव रा.म.रा.वि.वि.कंपनीचे शासकिय निवासस्थान,एम.आय.डि.सी.जळगांव मुळ रा.फुपनगरी ता.जि. जळगांव (खाते म.रा.वि.वि.कं.मर्या, वर्ग-३),२)श्री.प्रल्हाद उत्तम सपकाळे,वय ४१,व्यवसाय खाजगी नोकरी, कंत्राटी वायरमन,म.रा.वि.वि.कं.मर्या विदगांव कक्ष ता.जि.जळगांव रा.बस स्टॅन्ड जवळ, विदगांव ता.जि.जळगांव (खाजगी इसम)
- मागणी केलेली लाचेची रक्कम - ७,०००/-रु.
- स्विकारलेली लाचेची रक्कम - ६०००/-रु.(त्यात ५००/- रू.दराच्या १२ नोटा अ.पा.लावलेल्या )
थोडक्यात माहीती -
यातील तक्ररदार यांचे अमोदे खुर्द ता जि.जळगांव येथील जत्रा हॉटेल साठी विज कनेक्शन जोडुन विज मिटर बसवुन देण्याच्या मोबदल्यात यातील आरोपी क.१ यांनी ७,०००/- रुपयांची लाचेची मागणी केल्याने तकारदार अॅन्टी करण्शन ब्युरो,जळगांव यांचेकडेस दि.०४.०३.२०२१ रोजी तकार दिली होती.
सदर तक्रारीची दि.०५.०३.२०२१ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, जळगांव पथकाने पडताळणी केली असता यातील आरोपी क्र.१ व २ यांनी तक्ररदार यांचे हॉटेलवर विज कनेक्शन जोडुन विज मिटर बसवून देण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष ७,०००/-रु.लावेची मागणी केली. त्यानंतर दि.०५.०३.२०२१ रोजी सापळा आयोजित केला असता आरोपी कं.१ यांच्या वतीने आरोपी कं.२ यांनी तक्ररदार यांचेकडुन ६,०००/-रु. लाचेची रक्कम वर नमुद वेळी व ठिकाणी पंच साक्षीदार यांचे समक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आव्हान करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबधी काही माहीती असल्यास अगर लाच मागणा-या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जळगांव कार्यालयात संपर्क करावा.
संपर्क पत्ता:-लाप्रवि.जळगांव कार्यालय
संकेतस्थळ:- dyspacbjalgaon@gmail.com
ऑन लाईन तकार/ॲप्लीकेशन:- acbmaharastra.nct
टोल फ्री कंमाक:- १०६४
दुरध्वनी कंमाक:- ०२५७,२२३५४७७
व्हॉट्सॲप कंमाक:- ९६०७५५६५५६
(एन.एस.लोधी)
पोलीस निरीक्षक ॲन्टी करप्शन ब्युरो,जळगांव
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक कर
open this link in a new window

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता