मंगळवार, फेब्रुवारी २३, २०२१

विनापरवानगी अनाधिकृत रेती साठ्याचा बुधवारी म्हणजे २४ फेब्रुवारीला लिलाव

 


 नांदेड (दि. 22 फेब्रुवारी) :- नांदेड तालुक्यात विनापरवानगी अनाधिकृत गोळा केलेला रेतीसाठा महसूल विभागाने जप्त केला आहे. त्याची ईटीएस मोजणी करण्यात आली आहे. या रेतीसाठ्याचा लिलाव उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या अधिपत्याखाली बुधवार 24 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. तहसिल कार्यालय नांदेड येथे केला जाणार आहे. 

सदर अवैध रेतीसाठा हा 425 ब्रास असून सदर रेतीसाठा मौजे ब्राम्हणवाडा येथे उपलब्ध आहे. सदर रेतीसाठा गटनंबर निहाय असून तो पाहून तपासून घेऊन लिलावात भाग घ्यावा व अटी आणि शर्तीबाबतची माहिती गौण खनिज विभागात कार्यालयीन वेळेत पाहून घ्यावी, असे आवाहन तहसिलदार नांदेड यांनी केले आहे.

👇 जिल्हा माहिती कार्यालय नांदेड ब्लॉग स्पॉट

dionanded.blogspot.com

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना आता अधिनियमातील शक्तीचे पाठबळ नांदेड जिल्हादंडाधिका-याचा आदेश

 


नांदेड (दि. 23 फेब्रुवारी) :- बालविवाहाला प्रतिबंध व्हावा व कोणत्याही अल्पवयीन मुला-मुलीला यात भरडावे लागू नये यासाठी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कठोर पावले उचली आहेत. ग्रामीण भागातही याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी आता या अधिनियमातील कलम 16 च्या पोटकलम 1 अन्वये ग्रामसेवकांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये उक्त अधिनियमातील शक्तीचा वापर करता यावा व कर्तव्य पार पाडता यावीत यासाठी ग्रामसेवक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली. तसे आदेश त्यांनी आज निर्गमीत केले. 

याचबरोबरच सर्व नागरिक, आई-वडिल, पालक, प्रिंटींग प्रेस, पुरोहित (सर्व धर्मिय), फोटोग्राफर, आचारी, मंडप डेकोरेशन, केटरर्स, व्यवस्थापक, मंगल कार्यालय तसेच लग्न कार्याशी जे कोणी संबंधित व्यावसायिक जर बालविवाहला चालना देतांना, त्यांच्यासाठी सहकार्य करतांना, लग्नाचे विधी करतांना आढळतील अथवा या कार्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करतील त्यांना दोन वर्षापर्यंत एवढ्या कालावधीचा सश्रम कारावास शिक्षा व एक लाख रुपयापर्यंत द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहतील, असेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर अशा बालविवाहस उपस्थित राहणाऱ्या व्यक्ती किंवा यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींचाही यात समावेश आहे. 

विवाह करणाऱ्या व्यक्ती यात कायदानुसार सज्ञान म्हणजेच मुलाचे वय 21 व मुलीचे वय 18 असल्याची खातरजमा करुनच विवाह संबंधित कामे करावीत. शिवाय या संबंधितची माहिती फलक दर्शनी भागावर डकविण्याबाबतही आदेशात सांगितले आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या अधिनियमाच्या कारवाईबाबत तसे स्पष्ट आदेश मंडप डेकोरेशन व्यवस्थापक, सर्व आचारी-केटरर्स, सर्व प्रिंटींग प्रेस, सर्व पुरोहित सर्व छायाचित्रकार, सर्व मंगल कार्यालय व्यवस्थापक यांच्या नावे काढली आहेत.


👇 जिल्हा माहिती कार्यालय नांदेड ब्लॉग स्पॉट

dionanded.blogspot.com

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा मुख्याध्यापक/प्राचार्य गुलाब पिंजारी ३ हजाराची लाच घेताना चतुर्भुज

 

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कॅम्प साकी

दि. १७/०२/२०२१

प्रेस नोट

लोकसेवक गुलाब नथ्थु पिंजारी,वय-५५ वर्ष, प्राचार्य/मुख्याध्यापक, न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविदयालय, पिंजार झाडी ता.साकी. जि.धुळे यानी तकारदार यांचेकडे पहिला हप्ता ३,०००/ रुपये लाचेची मागणी करुन लाचेची रक्कम स्विकारली म्हणुन गुन्हा..

तक्रारदार यांचे वडिल हे न्यु इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविदयालय, पिंजारझाडी ता. साकी येथुन सेवानिवृत्त होत असल्याने, त्यांचा सेवानिवृत्तीनंतरचा पेंशन प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय, धुळे येथे सादर करणेसाठी व प्रस्तावावर सहया करण्याच्या मोबदल्यात आलोसे गुलाब नथ्थु पिंजारी यांनी ८,०००/ रुपये लाचेची मागणी केली होती म्हणुन तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे तकार केली होती.स

सदरतकारीचे अनुषंगाने आज रोजी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक गुलाब नथ्थु पिंजारी यांनी तडजोडी अंती पंच साक्षीदार यांच्या समक्ष पहिला हप्ता म्हणुन ३०००/-रुपयाची मागणी केली. त्या अनुषंगाने सापळा कारवाई केली असता आलोसे यांनी तक्रारदार यांच्याकडून आज रोजी पंचांसमक्ष ३०००/ रुपये ( पहिला हप्त) लाच स्विकारतांना त्यांना पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

सदर लाचेची मागणी संदर्भाची कारवाई मा.पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश सोनवणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक सुनिल कुराडे, पोनि/प्रकाश झोडगे, पोनि/मंजितसिंग चव्हाण, व त्यांच्या पथकातील पोहेकॉ/जयंत साळवे, पोना/संतोष हिरे, संदीप सरग, राजन कदम, सुधीर सोनवणे, कृष्णकांत वाडीले, कैलास जोहरे, शरद काटके, प्रकाश सोनार, पोको/प्रशांत चौधरी, भुषण खलाणेकर, संदीप कदम, भुषण शेटे, सुधीर मोरे अशांनी सदरची कारवाई केलेली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे मार्फत सामान्य जनतेस आवाहन करण्यात येते की, ज्यांच्या कडे शासकीय कामा करीता शासकीय अधिकारी/कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी तात्काळ खालीलक्रमांकावर संपर्क साधावा.

फोन नं. ०२५६२/२३४०२० टोल फ्री नं.१०६४

भ्रमणध्वनी न ८७६६८५८६५२

Website : www.acbmaharashtra.gov.in.

Mobile App : www.acbmaharashtra.net Facebook Page: www.facebook.com/MaharasthraACB

(सुनिल कुराडे)

पोलीस उप अधिक्षक,

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com


राज्य उत्पादन शुल्काचा निरिक्षक सुभाष खंडेराय 2 लाख लाचेची मागणी, 1 लाख लाच घेताना जेरबंद

 उत्पादन शुल्क स्वतःसाठी की राज्यासाठी

Respected sir/madam 

* Demand CASE 

➡युनिट :- नांदेड  

➡तक्रारदार :- पुरुष वय 32 वर्ष 

➡आरोपी लोकसेवक :- 1)श्री सुभाष खंडेराय, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बिलोली (अ) ता बिलोली जि. नांदेड 

➡ तक्रार प्राप्त :- दिनांक 01/02/2021

➡ लाचमामागणी पडताळणी दिनांक :- 01/02/2021          

➡ लाच मागणी रक्कम:- 2,00,000/- रुपये तडजोडीअंती 1,00,000/-रू                              

➡ कारण:-  यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांना एफ. एल. 03 अनुज्ञप्ती क्र. 90 (बियर बार) हे फिर्यादीचे नावाने कायम स्वरूपी वर्ग करणे बाबत दिलेल्या अर्जाची पडताळणी करुन अहवाल मा. जिल्हा अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड यांना सादर करण्यासाठी 2,00,000/- रु. लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 1,00,000/- रु. स्वीकारण्यचे मान्य केले.

➡️मार्गदर्शक:- मा. श्रीमती कल्पना बारवकर,पोलीस अधीक्षक ला.प्र.वि.नांदेड परिक्षेत्र नांदेड 

मा. श्रीमती अर्चना पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र.वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड                

➡️ SO:- विजय डोंगरे पोलीस उपअधिक्षक ला.प्र.वि.नांदेड_मो नं.-8975769118

  ➡️TLO:- राजेश पुरी ,पोलीस निरीक्षक  

ACB नांदेड, टीम सपोउपनि संतोष शेट्टे, पोना एकनाथ गंगतिर्थ,दर्शन यादव, नरेंद्र बोडके

1)लाच लुचपत टोलफ्री हेल्पलाईन क्रमांक - 1064 (2) 2)कार्यालयाचा फोन क्रमांक - 02462-253512

वेबसाईट : www.acbmaharastra.gov.in

मोबाईल ॲप : www.acbmaharastra.net

फेसबुक पेज : www.facebook.com/MaharastraACB



👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देणार की नाही? आ.राजेश पवार यांचा प्रशासनाला रोकठोक सवाल...

 


विषय : घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याबाबत.

नायगाव (२२ फेब्रुवारी) : उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आदरणीय पंतप्रधान मा, श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतुन देशातील प्रत्येक नागरिकांना /शेतकऱ्यांना स्वत:चे घर असावे याकरिता प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कार्यान्वित आहे. या योजनेकरिता काही ठराविक रक्कम संबधीत लाभाध्यांना घर बांधण्यासाठी देण्यात येते. घराच्या बांधकामासाठी अत्यंत महत्वाचा घटक रेती आहे. परंतु वाढलेल्या रेतीच्या भावामुळे घरकुलासाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानातुन घरकुलासाठी सर्वसामान्य नागरिकांना/शेतक-यांना रेती विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जिल्हामध्ये घरकुल बांधकाम प्रलंबित आहे. सदरील रेती संदर्भात राज्यशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत की, घरकुल लाभाथ्यांना पाच ब्रास रेती मोफत व माफक दरात दिली जावी. यावाबतीमध्ये मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते आपल्या तहसील कार्यालयापर्यंत सतत पाठपुरावा करत आहे. आपणास वैयक्तिक देखील तोंडी व लेखी सूचना दिलेले आहेत. आपण घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्यात येईल असे मला वारंवार सांगितले आहात, परंतु माझ्या माहितीप्रमाणे जेवढी मागणी गटविकास अधिकारी यांनी केली आहे त्यांपेकी २० लाभाथ्यांना सुध्दा रेती दिलेली नाही.

१) शासनाच्या या धोरणाबाबतीत आपणास माहिती आहे का? आपणास माहिती असल्यास मान्य नाही का ? आपणास मान्य नसल्यास याबाबतीत आपण आपल्या वरिष्ठांस कळविले आहे का? 

२) आपण रेती देण्यास का नकार देत आहात ?

३) आपणास रेती देण्यास काही अडचणी आहेत का?

४) हि रेती जप्त केलेल्या घाटांवरुन द्यावयाची असतांना सुध्दा याचा कोणत्याही प्रकारचा अधिकचा भुर्दंड आपल्यावर वैयक्तिकरित्या किंवा शासनावर येणार नसताना देखील आपण टाळाटाळ का करित आहात ?

५) तालुक्यातील गोरगरिब जनतेची घरे व्हावीत असे आपणास वाटत नाही का?

६) रेती न देता आपणाकडे सदर लाभार्थ्यांना चढ्या भावाने रेती घेण्याकरिता इतर काही पर्याय आहेत का तसे असल्यास आम्हाला आणि शासनाला कळवावे.

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मला लेखी स्वरुपामध्ये त्वरीत देण्यात यावेत.

आमदार

राजेश संभाजी पवार

नायगाव विधानसभा मतदारसंघ

२२/०२/२०२१


👇घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती बाबत शासन निर्णय

2018010319404321 दि.03/01/2018

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com