मंगळवार, फेब्रुवारी २३, २०२१

घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देणार की नाही? आ.राजेश पवार यांचा प्रशासनाला रोकठोक सवाल...

 


विषय : घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याबाबत.

नायगाव (२२ फेब्रुवारी) : उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, आदरणीय पंतप्रधान मा, श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतुन देशातील प्रत्येक नागरिकांना /शेतकऱ्यांना स्वत:चे घर असावे याकरिता प्रधानमंत्री घरकुल आवास योजना कार्यान्वित आहे. या योजनेकरिता काही ठराविक रक्कम संबधीत लाभाध्यांना घर बांधण्यासाठी देण्यात येते. घराच्या बांधकामासाठी अत्यंत महत्वाचा घटक रेती आहे. परंतु वाढलेल्या रेतीच्या भावामुळे घरकुलासाठी मिळणाऱ्या शासकीय अनुदानातुन घरकुलासाठी सर्वसामान्य नागरिकांना/शेतक-यांना रेती विकत घेणे परवडत नाही. त्यामुळे नायगाव विधानसभा मतदार संघासह संपूर्ण जिल्हामध्ये घरकुल बांधकाम प्रलंबित आहे. सदरील रेती संदर्भात राज्यशासनाचे स्पष्ट निर्देश आहेत की, घरकुल लाभाथ्यांना पाच ब्रास रेती मोफत व माफक दरात दिली जावी. यावाबतीमध्ये मी स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते आपल्या तहसील कार्यालयापर्यंत सतत पाठपुरावा करत आहे. आपणास वैयक्तिक देखील तोंडी व लेखी सूचना दिलेले आहेत. आपण घरकुल लाभार्थ्यांना रेती देण्यात येईल असे मला वारंवार सांगितले आहात, परंतु माझ्या माहितीप्रमाणे जेवढी मागणी गटविकास अधिकारी यांनी केली आहे त्यांपेकी २० लाभाथ्यांना सुध्दा रेती दिलेली नाही.

१) शासनाच्या या धोरणाबाबतीत आपणास माहिती आहे का? आपणास माहिती असल्यास मान्य नाही का ? आपणास मान्य नसल्यास याबाबतीत आपण आपल्या वरिष्ठांस कळविले आहे का? 

२) आपण रेती देण्यास का नकार देत आहात ?

३) आपणास रेती देण्यास काही अडचणी आहेत का?

४) हि रेती जप्त केलेल्या घाटांवरुन द्यावयाची असतांना सुध्दा याचा कोणत्याही प्रकारचा अधिकचा भुर्दंड आपल्यावर वैयक्तिकरित्या किंवा शासनावर येणार नसताना देखील आपण टाळाटाळ का करित आहात ?

५) तालुक्यातील गोरगरिब जनतेची घरे व्हावीत असे आपणास वाटत नाही का?

६) रेती न देता आपणाकडे सदर लाभार्थ्यांना चढ्या भावाने रेती घेण्याकरिता इतर काही पर्याय आहेत का तसे असल्यास आम्हाला आणि शासनाला कळवावे.

वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मला लेखी स्वरुपामध्ये त्वरीत देण्यात यावेत.

आमदार

राजेश संभाजी पवार

नायगाव विधानसभा मतदारसंघ

२२/०२/२०२१


👇घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती बाबत शासन निर्णय

2018010319404321 दि.03/01/2018

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation Ned.

http://saptarangcreation.com/radio-stations/


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता