शुक्रवार, फेब्रुवारी १९, २०२१

छत्रपती शिवाजी महाराज जयंती-

 



मरवाळी,(दि. 19 फेब्रुवारी) : मरवाळी ता.नायगाव येथे कुळवाडी भूषण बहूजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुजरा करण्यात आला त्या वेळी देशाचेआर्मी गजानन माणिकराव वडजे, मरवाळी चे ग्रामसेवक श्री कुलकर्णी साहेब, पत्रकार संजय ब्रम्हानंदराव चिखले,

सुभाष निळकंठराव चिखले, प्रताप जयवंतराव पवळे, बालाजीराव मुदखेडे , आदी मरवाळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

बनावट कागदपत्रे तयार करून जमीन लाटणाऱ्यावर गुन्हा दाखल करा-धम्मानंद घोबाळे


गंगाखेड,(19 फेब्रुवारी) :-  गंगाखेड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणारी देवळी जिनिंग जनाबाई रोड येथील सर्वे नंबर ४४५ मधील जागेच्या वादातून दिनांक १८ फेब्रुवारी रोजी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सभागृह नियोजित जागेची पाटी लावली आहे. त्यामध्ये त्यांनी ठाम राहून सभागृह उभारावे मी त्यांचे स्वागत करतो. माझ्या फंडातून पन्नास लाख रुपये देतो असे यावेळी गुट्टे यांनी व्यक्त केले .यासंदर्भात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परभणी जिल्हा अध्यक्ष धम्मानंद घोबाळे यांनी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दुपारी १:०० वाजता सर्वे नंबर ४४५ जागेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन क्षेत्र ३० आर बद्दल खुलासा करीत खासरा मालकी पत्रक १९५२ पासून दत्तोपंत देवळे हेच मालक आहेत. त्यांच्याकडून आम्ही खरेदीखत केली आहे. आणि या जागेवर पिढ्यानपिढ्या त्यांचा ताबा आहे.

दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ दस्त क्रमांक ५००, ५०१, ५०२ एकूण क्षेत्रफळ ३१२०० चौ. फूट, नगरपरिषद मालमत्ता क्रमांक १) ४८ बी १ /३-१ ,२)४८-ए- १/३-१ ,३) १८९६/ ३-२ दोन एन ए ऑर्डर  जावक क्रमांक २०१० अकृषीत/ सीआर / २७ दि.९/ ११/ २०१० असा आहे. या जागेवर आम्ही काय करायचे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आमचा सत्कार करण्याची गरज नाही. आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि बहुजनवादी ही आमदार साहेब यांच्या घरात व कार्यालयात बाबासाहेब किंवा बुद्धाचा फोटो दाखवा मी त्यांचा भर चौकात ५ लाखाचा चांदीचा हार घालून स्वागत करतो.आमदार साहेब निवडून आल्याच्या नंतर कोणत्या बुद्धविहाराला फंड दिला आहे. सर्वे नंबर ४४५ चे जे मूळ मालक आहेत त्यांच्याकडून आम्ही ही जागा घेतली आहे .शरद देवळे यांचा या जागेवर काहीही एक संबंध नाही. संबंधित खरेदी केलेल्या जागेचा मालकाने खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे. गंगाखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी असे प्रकार झाले पण भीतीपोटी व्यापारी व नागरिक समोर येण्यास घाबरत आहेत. त्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आम्हाला न्याय देण्यात यावा असे पत्रकार परिषदेत बोलताना धम्मानंद घोबाळे, प्रवीण काबरा ,मनोहर केंद्रे , सुरेश केळकर यांनी व्यक्त केले आहे.

👇धम्मानंद घोबाळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ

पत्रकार परिषदेचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

👇बातमी पाठवणार

भिमराव कांबळे पत्रकार ता.गंगाखेड जि. परभणी 

9921440492


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

बिलोली-देगलूर मतदारसंघामधील भाजपच्या सक्रीय कार्यकर्त्याची नायगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी पदी निवड_जिल्हाध्यक्ष धोंडगेचा तुघलकी कारभार-स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर



 नायगाव,(१९ फेब्रुवारी) : जिल्ह्यातील विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्षपदाची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. मात्र नायगाव तालुक्यातील निवड वादाच्या भोव-यात सापडली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेला पदाधिकारी चक्क देगलूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे काम करणारा तर तालुकाध्यक्षपदीही भाजपचेच सक्रीय काम करणा-यांची वर्णी लावण्यात आली असल्याचा पक्षातील तरूण निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दावा केला असून मतदार संघात असंख्य सक्षम पदाधिकारी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हत्वाच्या पदावर मतदार संघाबाहेरील व पक्षाबाहेरील लोकांची निवड का ? असा सवाल करण्यात येत आहे. 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप धोंडगे यांनी जिल्हा भरातील विविध तालुक्यातील विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष पदाची निवड नुकतीच जाहीर केली आहे. 

नायगाव तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आलेला अमोल जाधव हा पदाधिकारी भाजपाचे नेते राजेश देशमुख कुंटूरकर यांचा सक्रीय कार्यकर्ता आहे. तो त्यांच्या नावाने ' राजेश कुंटूरकर युवा समुह ' या नावाचा व्हाटस्प् ग्रुप चालवतो. या माध्यमातून त्यांनी राजेश कुंटूरकर यांच्यामागे तरूणांची एक मोठी फळी उभी केला आहे. 

विधानसभा अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेला पंडीत जाधव हा पदाधिकारी चक्क देगलूर विधानसभा संघातील कामरसपल्ली (ता. बिलोली) या गावचा रहिवासी आहे. तो नुकताच आपल्या गावात भाजपाच्या गटाकडून आपल्या चुलत्याला उभा करून ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली होती. स्वतः ला राष्ट्रवादी कॉंग्रेस युवा नेता म्हणून घेणारा हा नेता खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, रवी पाटील खतगावकर, श्रावण पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे या भाजपातील जेष्ठ कनिष्ठ नेते मंडळीकडे वावरतो. विशेष म्हणजे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड चा तो धर्माबाद तालुकाध्यक्ष आहे. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माधव देवसरकर हे भाजपाचेचं काम करतात. तर मग पंडित जाधव हा युवा नेता नेमका कोणत्या पक्षाचा ? असा सवाल करण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे निवड करण्यात आलेले दोन्ही पदाधिकारी हे आता पर्यंत तालुक्यात झालेल्या कोणत्याच चळवळीत कधी भाग घेतला नसल्याचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

नायगाव तालुका हा खूप जुना राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मधल्या काळात थोडीशी पडझड झाली असली तरी गेल्या दहा बारा वर्षा पासून तालुकाध्यक्ष भास्कर भिलवंडे यांनी उतरत्या काळात पक्षाची कमान सांभाळत तरूणांची एक फार मोठी फळी निर्माण केली आहे. तालुक्यात असंख्य सक्षम कार्यकर्ते असताना बाहेरच्या मतदार संघातील व बाहेर च्या पक्षात काम करणा-या लोकांची पक्षातील म्हत्वाच्या पदावर वर्णी लावण्यात आल्याने नायगाव विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यंक्त केली आहे. जिल्हाध्यक्ष धोंडगे हे फादरचे जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांना विश्वासात न घेता घरी बसूनच पदाधिका-यांची निवड करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कडे तक्रार करण्यात येणार असल्याचे पक्षाचे सक्रीय कार्यकर्ते गजानन पाटील पवार यांनी सांगितले आहे.

👇 राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष अधिकृत वेबसाईट/संकेतस्थळ

https://www.ncp.org.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com



आलोसे सुधाकर शिवनाथ सोनावणे महावितरण कंत्राटी कर्मचारी ३५०० लाच घेताना अटक


 नाशिक

दि. १८/०२/२०२१ 

प्रेसनोट

आलोसे सुधाकर शिवनाथ सोनावणे, बाहयस्त्रोत कर्मचारी (कंत्राटी कर्मचारी) म.रा.वि.वि.कं. सिन्नर शहर सब स्टेशन कार्यालय, ता.सिन्नर, जि.नाशिक यांना ३,५००/- रूपये लाचेची रक्कम स्विकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांची कारवाई.

घटक :- नाशिक

गुन्हा नोंद क्रमांक :- कार्यवाही चालू आहे

कलम :- लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ (संशोधन सन २०१८) चे कलम ७ प्रमाणे

आरोपींचे नांव व कार्यालय :- सुधाकर शिवनाथ सोनावणे, बाहयस्त्रोत कर्मचारी (कंत्राटी कर्मचारी) म.रा.वि.वि. क. सिन्नर शहर सब स्टेशन कार्यालय, ता.सिन्नर, जि.नाशिक.

मागणी कलेली लाचेची रक्कम :- ३,५००/- रुपये

स्विकारलेली लाचेची रक्कम :- ३,५००/- रुपये

थोडक्यात माहिती :- यातील तक्रारदार यांना घरगुती वीज वापरावे मीटर व त्याची जोडणीचे काम करुन देण्याचे मोबदल्यात आलोसे सुधाकर शिवनाथ सोनावणे, बाहयस्त्रोत कर्मचारी (कंत्राटी कर्मचारी) म.रा.वि.वि.कं. सिन्नर शहर सब स्टेशन कार्यालय ता.सिन्नर, जि. नाशिक यांनी तकारदार यांचेकडून ३,५००/- रुपये लाचेची मागणी केल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तकार दिली. सदर तकारीवरुन दि.१८/०२/२०२१ रोजी ला. प्र.वि.नाशिक पथकाने पडताळणी करुन सापळा आयोजित केला असता आलोसे सुधाकर शिवनाथ सोनावणे, बाहयस्त्रोत कर्मचारी (कंत्राटी कर्मचारी) म.रा.वि.वि.कं. सिन्नर शहर शहर सब स्टेशन कार्यालय ता. सिन्नर, जि.नाशिक यांनी तकारदार यांचेकडून ३,५००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम पंच व साक्षीदार यांचे समक्ष म. रा.वि.वि.कं. सिन्नर शहर शहर सब स्टेशन कार्यालयाचे आवारात स्विकारली असताना त्यांना पकडण्यात आले आहे.

लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तकार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक कार्यालयात संपर्क करावा.

संपर्काचा पत्ता :- ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक कार्यालय

संकेतस्थळ :- www.acbmaharashtra.gov.in

ऑनलाईन तक्रार/ऍप्लिकेशन :- acbmaharashtra.net

ई-मेल :- spacbnashik@mahapolice.gov.in

टोल फ्री क्रमांक :- १०६४

दुरध्वनी क्रमांक :- ०२५३ -२५७५६२८,२५७८२३०

व्हॉटस अप क्र. :-९९३०९९७७००


(विजय जाधव) 

वाचक पोलीस उपअधीक्षक

पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक करीता


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

उपविभागीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात वाळूच्या गाडीसाठी मागितली६५ हजार रुपयांची लाच, सलग दुसऱ्या दिवशी बडा अधिकारी पकडला


 माजलगाव(जि. बीड) : अवैध वाळू उपसा करणारी गाडी चालू देण्यासाठी ६५ हजार रुपयांची लाच घेताना माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई जालना येथील एसीबीच्या पथकाने केली.

माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचा उपसा करण्यात येतो. यासाठी अधिकाऱ्यांना हप्ते द्यावे लागतात, अशी चर्चा सर्रास करण्यात येते. गुरुवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास माजलगावचे उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी वाळूची गाडी चालू ठेवण्यासाठी ६५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाचेची रक्कम गायकवाड यांच्या

बीड व पाटोदा पंचायत समितीचे बीडीओ नारायण मिसाळ यांनी पाटोदा तालुक्यातील सार्वजनिक विहिरीचे देयक अदा करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती.

बीड येथील राहत्या घरी ३७ हजारांची लाच घेताना बीड एसीबीने बुधवारी रंगेहात पकडले होते. यानंतर दुसऱ्याच दिवशी माजलगाव येथील उपविभागीय अधिकारी चालकामार्फत ६५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आला. या दोन घटनांमुळे बीड जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे.

गाडीचालकाकडे तक्रारदाराने देताना माजलगावातील संभाजी चौकात एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदीतून वाळूचा अवैधरीत्या उपसा मोठ्या प्रमाणावर होतो. यास वाळू माफियास पाठबळ देण्याचे काम अधिकारी करत असतात. गोदावरी नदीच्या पलीकडे जालना जिल्ह्याची हह सरू होते दोन्ही भागातन वाळचा

मोठ्या प्रमाणावर अवैधरीत्या उपसा होतो. हा अवैध उपसा होऊ द्यावा यासाठी वाळू माफिया है अधिकार्यांना लाच देऊन स्वत:चे उखळ पांढरे करतात. यात सर्वांची मिलीभगत असल्याचेही वारंवार समोर आले आहे. दरम्यान, याप्रकरणी उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड व त्यांचा चालक यांना पुढील कार्यवाहीसाठी बीड येथे नेण्यात आले आहे.

* आदरणीय सर*   

Trap Case Report

➡ घटक :- जालना

➡ तक्रारदार :- पुरुष ४५ वर्ष व वाहतुक व शेती

➡ आरोपी : लोकसेवक श्रीकांत शाहू गायकवाड वय ३० वर्ष पद - उपविभागीय अधिकारी,वर्ग १.माजलगाव, जिल्हा बीड,रा मूळ गाव..तूगत तालूका पंढरपूर.जिल्हा सोलापूर

2..लक्ष्मण तात्यासाहेब काळे. वय ३० कोतवाल/डायव्हर.वर्ग ४

➡ लाचेची मागणी:-

     ६५०००/- 

➡ लाच स्विकारली

     ६५०००/-

▶️लाचेची मागणी व स्वीकृति दिनांक :-

  १८/०२/२०२१

➡ कारण :- यातील तक्रारदार यांना वाळू वाहतूक करु देण्यासाठी व वाळू वाहतूक करतांना कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी क्रं. १ यांनी ६५०००/- रु ची लाचेची मागणी करून आरोपि क्र.2 याने स्विकारली. 

➡ सापळा पथक :- श्री रवींद्र निकाळजे पोलीस उपअधीक्षक, श्री जावेद, चेके,मस्के .लाप्रवि जालना. 

➡मार्गदर्शन अधिकारी :- मा.डाॅ.श्री राहुल खाडे,पोलीस अधीक्षक लाप्रवि ॵरंगाबाद, 

मा डाॅ.अनिता जमादार, अपर पोलिस अधीक्षक , लाप्रवि, ॵरंगाबाद

➡ सक्षम आधिकरी:- प्रधान सचिव,महसुल व वन विभाग,मंत्रालय,मुंबई


👇 लाच लुचपत सापळा कार्यवाहीची वेबसाईट

www.maharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com