गंगाखेड,(19 फेब्रुवारी) :- गंगाखेड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असणारी देवळी जिनिंग जनाबाई रोड येथील सर्वे नंबर ४४५ मधील जागेच्या वादातून दिनांक १८ फेब्रुवारी रोजी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सभागृह नियोजित जागेची पाटी लावली आहे. त्यामध्ये त्यांनी ठाम राहून सभागृह उभारावे मी त्यांचे स्वागत करतो. माझ्या फंडातून पन्नास लाख रुपये देतो असे यावेळी गुट्टे यांनी व्यक्त केले .यासंदर्भात दिनांक १९ फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परभणी जिल्हा अध्यक्ष धम्मानंद घोबाळे यांनी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी दुपारी १:०० वाजता सर्वे नंबर ४४५ जागेसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन क्षेत्र ३० आर बद्दल खुलासा करीत खासरा मालकी पत्रक १९५२ पासून दत्तोपंत देवळे हेच मालक आहेत. त्यांच्याकडून आम्ही खरेदीखत केली आहे. आणि या जागेवर पिढ्यानपिढ्या त्यांचा ताबा आहे.
दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ दस्त क्रमांक ५००, ५०१, ५०२ एकूण क्षेत्रफळ ३१२०० चौ. फूट, नगरपरिषद मालमत्ता क्रमांक १) ४८ बी १ /३-१ ,२)४८-ए- १/३-१ ,३) १८९६/ ३-२ दोन एन ए ऑर्डर जावक क्रमांक २०१० अकृषीत/ सीआर / २७ दि.९/ ११/ २०१० असा आहे. या जागेवर आम्ही काय करायचे हे आम्हाला सांगण्याची गरज नाही. आमचा सत्कार करण्याची गरज नाही. आम्ही आंबेडकरवादी आहोत आणि बहुजनवादी ही आमदार साहेब यांच्या घरात व कार्यालयात बाबासाहेब किंवा बुद्धाचा फोटो दाखवा मी त्यांचा भर चौकात ५ लाखाचा चांदीचा हार घालून स्वागत करतो.आमदार साहेब निवडून आल्याच्या नंतर कोणत्या बुद्धविहाराला फंड दिला आहे. सर्वे नंबर ४४५ चे जे मूळ मालक आहेत त्यांच्याकडून आम्ही ही जागा घेतली आहे .शरद देवळे यांचा या जागेवर काहीही एक संबंध नाही. संबंधित खरेदी केलेल्या जागेचा मालकाने खोटे व बनावट कागदपत्रे तयार करून जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे. गंगाखेड तालुक्यातील अनेक ठिकाणी असे प्रकार झाले पण भीतीपोटी व्यापारी व नागरिक समोर येण्यास घाबरत आहेत. त्या पूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी आम्हाला न्याय देण्यात यावा असे पत्रकार परिषदेत बोलताना धम्मानंद घोबाळे, प्रवीण काबरा ,मनोहर केंद्रे , सुरेश केळकर यांनी व्यक्त केले आहे.
👇धम्मानंद घोबाळे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ
पत्रकार परिषदेचे व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇बातमी पाठवणार
भिमराव कांबळे पत्रकार ता.गंगाखेड जि. परभणी
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता