बुधवार, फेब्रुवारी १७, २०२१

५.००,०००/- रुपये सांगुन २,५०,०००/- रुपयांची लाच स्विकारतांना आरोपी लोकसेवक नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर, आरोग्य अधिकारी, वर्ग-१ यास रंगेहाथ पकडून एसीबीच्या कस्टडीत ठेवले.


 प्रेस नोट

दि.१७/०२/२०२१

आरोपी लोकसेवक नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर, आरोग्य अधिकारी, वर्ग-१, घन कचरा व्यवस्थापन विभाग, महानगरपालिका अहमदनगर यांना २,५०,०००/- रुपयांची लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडले.

प्रस्तुत बातमीतील हकीगत अशी की, तक्रारदार यांची अहमदनगर महानगरपालिका येथे मृत जनावरांचे दाहीनीचा प्रोजेक्ट असून त्या प्रोजेक्ट संदर्भात NEERI ने त्रुटी काढल्या आहेत असे सांगून त्या दूर करून तक्रारदार यांचे राहीलेले बील काढण्यासाठी आरोपी लोकसेवक नरसिंह सर्वोत्तमराव पैठणकर, वय-४७ वर्ष, आरोग्य अधिकारी, वर्ग-१, घन कचरा व्यवस्थापन विभाग, महानगरपालिका, अहमदनगर यांनी तक्रारदार यांना ५.००,०००/- रुपये सांगुन दि.११/२/२०२१ रोजी पंचासमक्ष तडजोडअंती २,५०,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती.

आरोपी लोकसेवक पैठणकर यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने दि.१७/२/२०२१ रोजी सकाळी पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर व पोलीस निरीक्षक किरण रासकर, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी संयुक्तपणे यशस्वी सापळा कारवाईचे आयोजन करून आरोपी लोकसेवक नरसिंह सर्वोल्मराव पैठणकर यांना सावेडी कचरा डेपो, अहमदनगर येथे पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून २,५०,०००/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारल्यानंतर रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आरोपी लोकसेवक पैठणकर यांचेविरुध्द तोफखाना पो.स्टे. येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर हे करीत आहेत.

सदर सापळा कारवाई ही मा सुनिल कडासने, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक व मा निलेश सोनवणे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर कडील पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर, पोलीस निरीक्षक किरण रासकर, पोलीस निरीक्षक मृदुला नाईक, पोहेका मोरे, पोहेकॉ गोसावी, पोहेकॉ कुशारे व चालक पोकॉ पवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांचे पथकाने केली आहे.

कोणीही लोकसेवक सर्व सामान्य जनतेला त्यांचे काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, अहमदनगर येथे खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उप अधीक्षक हरिष खेडकर यांनी केले आहे.

कार्यालयाचा पत्ता

पोलीस उप अधीक्षक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती प्रशासकिय इमारत, टि.व्ही. सेंटरसमोर, सावेडी, अहमदनगर

फोन नंबर

०२४१-२४२३६७७

टोल फ्री नंबर

१०६४

पोलीस उप अभीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,

अहमदनगर


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले

7767912933

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

नांदेड परिक्षेत्राचा सापळा कारवाई दोषसिद्धी अहवाल-७,००० लाच घेतलेल्या ग्रामसेवकास ३ वर्षे कारावासाची शिक्षा

 

*सापळा कार्यवाही दोषसिध्दी अहवाल*

▶️ *युनिट -* लातूर

▶️ *न्यायालयाचे नाव* - मा.अतिरिक्त सत्र न्यायालय 06, लातूर.

▶ *पो.स्टे गु.र.नं. व कलम* - पो.स्टे. चाकुर गु.र.नं. 3020/2012  कलम 7,12, 13(1)(ड) सह 13(2) भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988

▶ *वि.ख.क्र* - 06/ 2013

▶️ *आ.लो.से*- 

1. श्रीकांत प्रभाकर पतंगे वय 27 वर्ष, पद-ग्रामसेवक वर्ग-3, नेमणूक-ग्रामपंचायत कार्यालय, जठाळा ता. चाकुर 2. प्रल्हाद नागनाथ कानुरे, वय 26 वर्ष, पद-ग्रामसेवक, वर्ग-3, नेमणूक- ग्रामपंचायत कार्यालय डोंगरज ता. चाकुर                                    

▶️ *लाचेची रक्कम* - 7,000/-₹ 

▶️ *शिक्षा*-  आरोपी क्रमांक 01 यांना कलम 7 अन्वये 3 वर्षे शिक्षा व 10,000/-रु. दंड तसेच कलम 13 अन्वये 3 वर्षे शिक्षा व 10,000/-रु. दंड. दोन्ही शिक्षा एकदाच भोगायाच्या आहेत.                         

आरोपी क्रमांक 02 यांची  निर्दोष मुक्तता केली आहे.

▶️ *तपासी अधिकारी* - एन.जी. अंकुशकर, तत्कालीन पो.उप.अधीक्षक, ला.प्र.वि. लातूर

▶️ *शिक्षेचे कारण* - यातील तक्रारदार यांच्या जिल्हा परीषद प्राथमिक शाळा जठाळा येथील शाळेच्या खोलीचे दुरुस्तीचे केलेल्या कामाचे 1,22,180/-रुपयाचे मंजूर होवुन आलेल्या बीलाच्या चेकवर सही करण्याचे  कामासाठी आरोपी क्रमांक 01 यांनी 7,000/-रूपये लाचेची मागणी करून लाचेची रक्कम हाँटेल मयूर हॉटेलमध्ये आरोपी क्रमांक 02 यांचे करवी लाच स्वीकारली म्हणून शिक्षा.

▶  *मार्गदर्शन* - सदर शिक्षेची कार्यवाही नांदेड परिक्षेत्र नांदेडच्या पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, पो.उपअधिक्षक माणिक बेद्रे, यांचे मार्गदर्शनाखाली सरकारी वकील श्री.संतोष देशपांडे, कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे,दराडे,पो.हवालदार लक्ष्मीकांत देशमुख यांनी पार पाडली आहे.    

*सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.*

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर

*दुरध्वनी क्रं.* - 02382-242674

*टोल फ्रि क्रं. - 1064*

*माणिक बेद्रे, पोलीस उप अधीक्षक* 9923666644

*पो. नि.कुमार दराडे* - 9657709841 *  

*पो.नि.बाबासाहेब काकडे*- 9067266264

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट

www.acbmaharashtra.gov.in


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.


शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांसाठी खुशखबर-बॅंक खाते जास्त काळ वापरात नसले तरी ते बंद करता येणार नाहीत_अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र शासन


मुंबई,(दि. १६ फेब्रुवारी) : शिष्यवृत्तीसाठीची विद्यार्थ्यांची बँक खाती जादा काळ वापरात नसली तरी ती बंद करता येणार नाहीत. शिवाय अशा खात्यांमध्ये किमान रक्कम (मिनिमम बॅलन्स) ठेवण्याबाबत आग्रह करता येणार नसल्याच्या आरबीआयच्या सूचना. शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करणे आवश्यक - अल्पसंख्याक विकास विभागाची माहिती

शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक यांच्या माहितीसाठी आवाहन 

  • असे निदर्शनास आले आहे की, शिष्यवृत्तीचा लाभ घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची बँक खाती ही बँकांमार्फत निष्क्रीय (Dormant) करण्यात आली आहेत. खात्यामध्ये किमान रक्कम (मिनीमम बॅलन्स) नसल्याने तसेच खाते दीर्घकाळ वापरात नसल्याने ते बँकांमार्फत निष्क्रीय (Dormant) करण्यात येते. यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यात अडचणी निर्माण होत आहेत.

  • पण आरबीआयच्या निर्देशानुसार बँकांची ही कृती योग्य नाही.

  • शिष्यवृत्तीचा लाभ मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची बँक खाती ही मिनीमम बॅलन्स तसेच टोटल क्रेडीट लिमीट या अटींपासून मुक्त असली पाहिजेत, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आरबीआयने दिल्या आहेत.

  • विद्यार्थ्यांची खाती ही झीरो बॅलन्सच्या कॅटेगरीमध्ये असणे आवश्यक असून एखाद्या विद्यार्थ्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम (मिनीमम बॅलन्स) नसल्याची सबब देऊन बँकांनी त्या खात्यातील देवाण-घेवाण (ट्रान्झॅक्शन) थांबविणे चुकीचे आहे.

  • तसेच विद्यार्थ्यांची बँक खाती जादा काळ वापरात नसली तरी ती बंद करता येणार नाहीत. शिवाय अशा खात्यांमध्ये किमान रक्कम (मिनीमम बॅलन्स) ठेवण्याबाबत बँकांमार्फत केला जाणार आग्रहही आरबीआयने दिलेल्या सुचनांनुसार चुकीचा आहे.

  • तथापी, विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे बँक खाते संबंधीत योग्य product code मध्ये खोलणे आवश्यक आहे.
  • तसेच, विद्यार्थ्यांचे खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
  • यासंदर्भातील अर्जाचा नमुना माहितीस्तव सोबत जोडला आहे. शिष्यवृत्तीचा लाभ घेणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक यांनी उपरोक्त बाबीची नोंद घ्यावी.

अल्पसंख्याक विकास विभाग,महाराष्ट्र शासन





👇महाराष्ट्राच्या अल्प संख्यांक विकास विभागाची वेबसाईट

https://mdd.maharashtra.gov.in/Site/Home/Index.aspx

👇Aaple Sarkar DBT (MAHADBT) website

https://mahadbtmahait.gov.in/home/index

👇आपले सरकार वेबसाईट/संकेतस्थळ

aaplesarkar.mahaonline.gov.in

👇MAHA-IT website

https://mahait.org/

👇 महाराष्ट्र शासनाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.maharashtra.gov.in

👇Deputy Director of Education,Pune 

http://www.dydepune.com/circular.asp 

 👇कॅबिनेट व राज्य मंत्री,अल्पसंख्याक विकास विभाग

  1. श्री. नवाब मलिक

मा. मंत्री, अल्पसंख्याक विकास व वक्फ, कौशल्य विकास व उद्योजकता

  1. डॉ. विश्वजीत कदम

मा. राज्यमंत्री, अल्पसंख्याक विकास व वक्फ,सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, मराठी भाषा

  • सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक

अशा सर्वसमावेशक विकासासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे.


✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा.चिखले

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com