मंगळवार, डिसेंबर २८, २०२१

आ.राजेश पवार यांच्या स्वखर्चाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची निर्मिती; गावकऱ्यांनी केले आ.पवार दाम्पत्याच्या सामाजिक दायित्वाचे कौतुक

आ.राजेश पवार यांच्या स्वखर्चाने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्याची निर्मिती; गावकऱ्यांनी केले आ.पवार दाम्पत्याच्या सामाजिक दायित्वाचे कौतुक.


गडगा,दि. २८ डिसेंबर २०२१ : नायगाव तालुक्यातील गडगा येथील गेल्या वीस वर्षांपासून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता बंद होता.त्यामुळे मरणानंतरही मरणयातना सहन करण्याचे दुर्भाग्य गडगा गावकऱ्यांच्या नशीबी आले होते.दरम्यान, गावच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट गावातील गल्लीबोळात जावून ग्रामस्थांशी संवाद साधत लोकाभिमुख लोकप्रतिनिधी आमदार राजेश पवार यांनी समस्या ऐकून घेतल्या.स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता बंद असल्याचे ग्रामस्थांनी सांगितल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चाने हा रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन आमदार महोदयांनी दिले.त्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात झाली.११ दिवस हे काम चालले त्यानंतर एक की.मी.अंतराचा अतिशय दर्जेदार रस्ता निर्माण करण्यात आला.


नायगाव विधानसभा मतदारसंघातील तिनही तालुक्यातील अनेक गावात आमदार राजेश पवार तसेच मांजरम गटाच्या जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.पुनमताई राजेश पवार यांनी स्वखर्चाने स्व.संभाजीराव पवार प्रतिष्ठान आलूवडगाव मार्फत बळीराजा पाणंद रस्ता मोहीम सुरू केली आहे.याद्वारे शेत पाणंद रस्त्याची निर्मिती केली जात आहे.मांजरम सर्कलमधील मांजरमसह गडगा,कोलंबी, टेंभुर्णी, रातोळी,केदारवडगाव येथे अनुक्रमे दोन, चार,सहा याप्रमाणे पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.नायगाव तालुक्यातील प्रमुख गाव असलेल्या गडगा गावात सन २००१ पासून सार्वजनिक अग्नीकुंड स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता बंद होता.रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली होती.अग्नीअंत्यसंस्काराला प्रेत नेताना कुणाच्या तरी शेतकऱ्यांच्या शेतातून जावे लागत होते.पावसाळ्यात तर प्रचंड हाल व्हायचे.मरनानंतरही सरणावर पोहचविण्याचा मार्गही मरनयातना देणारा होता.ही समस्या पत्रकार वसंत जाधव यांनी आमदार राजेश पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.आमदार महोदयांनी हा रस्ता तयार करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी पत्रकार वसंत जाधव यांच्यावर सोपवली.त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली.अन् गेल्या वीस वर्षांपासूनची गंभीर समस्या आ.पवार यांच्या तत्परतेने सुटली.आमदार राजेश पवार यांनी स्वखर्चाने निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल गडगा येथील नागरिक माजी चेअरमन माधवराव मारोतराव पा.जाधव, गावच्या सरपंच लक्ष्मीबाई देवीदास पवळे, उपसरपंच परमेश्वर पाटील, देवीदास पवळे, बालाजी अचिंतलवार, माधवराव शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भानूदास बंडेवाड,अमृतराव रानडे, बालाजी रानडे यांच्या सह ग्रामस्थांनी आमदार राजेश पवार यांचे आभार मानले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता