बुधवार, डिसेंबर २२, २०२१

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर, माहूर, नायगाव नगरपंचायत निवडणुकीसाठीच्या मतदानाकरीता मतदारांचा पुढाकार

 अर्धापूर 77.59 टक्के, माहूर 76.09 टक्के, नायगाव 79.06 टक्के 



नांदेड,दि. 21 डिसेंबर 2021 :- नांदेड जिल्ह्यात दिनांक 21 डिसेंबर रोजी अर्धापूर, माहूर,  नायगाव या तीन नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी चांगला सहभाग घेत मतदानाची टक्केवारी वाढविली. तीनही नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी प्रत्येकी 17 प्रभाग होते. यातील अर्धापूर नगरपंचायतीसाठी 13 प्रभागाची, नायगाव नगरपंचायतीसाठी 14 प्रभागाची तर माहूर नगरपंचायतीसाठी 13 प्रभागाची संख्या होती. अर्धापूरमध्ये 57 उमेदवार, नायगावसाठी 27 उमेदवार तर माहूरमध्ये 63 उमेदवार उभे होते. 

अर्धापूर नगरपंचायतीसाठी एकुण 17 हजार 104 मतदारांपैकी 13 हजार 271 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नायगाव निवडणुकीसाठी एकुण 8 हजार 93 मतदारांपैकी 6 हजार 398 तर माहूर नगरपंचायतीसाठी एकुण 7 हजार 101 मतदारांपैकी 5 हजार 403 मतदारांनी आपला हक्क बजावला. अर्धापूरसाठी मतदानाची एकुण टक्केवारी 77.59, नायगावसाठी 79.06 तर माहूरसाठी 76.09 एवढी मतदानाची टक्केवारी झाली. सकाळी 7.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत मतदान झाल्याची ही टक्केवारी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता