प्रशासनातील लाचखोर लोकसेवकांना लागलेली लाचखोरीची सवय समाजासाठी वाळवी आहे
पत्रकार संजय ब्रम्हानंद पाटील चिखले यांचे प्रतिपादन
लाच या विषयावर विशेष लेख
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,महाराष्ट्र राज्य हा महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा विभाग आहे. भ्रष्टाचार मुक्त पारदर्शक कारभार हे महाराष्ट्र शासनाचे धोरण आहे. तेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ध्येय आहे.
शासन नागरिकांना अनेक सेवा पुरवित आहे. जर कोणत्याही शासकीय कामाकरीता शासकीय लोकसेवकांनी लाचेची मागणी केली तर नागरिकांनी ला.प्र.वि. शी संपर्क साधावा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सदैव अशा नागरिकांच्या बाजुने ठामपणे उभे राहिल आणि लाचखोरांविरूद्ध कारवाई करेल. भ्रष्टाचार मुक्त समाज राज्याला प्रगती, समृद्धी आणि सुशासनाच्या युगामध्ये घेऊन जाईल. हे केवळ नागरिकांच्या सक्रिय सहभागाने व सहकार्यानेच शक्य होऊ शकेल.
समाजाला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी व विकासाला गती देण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला सहकार्य करा. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग प्रत्येक ठिकाणी आपल्या मदतीसाठी सज्ज आहे.
प्रशासनाला लाचखोरीची कशी वाळवी लागली आहे,त्याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे रोज एसीबीच्या होत असलेल्या कारवाया.लाचखोरीला वाव मिळायला सामान्यातील सामान्य माणूस जबाबदार आहे.भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र हे गोरगरीबांकरीता कायद्याचे एक सोपे हत्यार आहे,या कायद्याचा बडगा उगारुन गरिबातला गरीब लाचखोरांकडून होणारी आपली लुट थांबवू शकतो,बंद करु शकतो.फक्त गरज आहे ती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल करण्याची.लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकल्यानंतर लाचखोरांकडून तक्रारदाराच्या केसालाही धक्का लागत नाही,ही ताकद या कायद्यात आहे.
आपण एखाद्याच्या बायका पोरांना रान का लावायचे हे विचार आता सोडून दिले पाहिजेत.लाचखोर रक्ताचे पाणी करून आपल्या संसाराचा गाडा कसाबसा हाकणाऱ्या मजूरांना,दिवस रात्र एक करुन कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना सोडत नाहीत, त्यांच्या लेकरा बाळांचा विचार करत नाहीत तर दुस-यांनी त्यांचे कुटुंबीय भिकेला लागतील याचा काय म्हणून विचार करायचा.हे बुरसटलेले विचार आता सोडून दिले पाहिजेत.पुर्वी फक्त पावडरचे पैसे एवढच ऐकून होतो,आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एका फोनवर लाचखोरांविरुद्ध तक्रारदारांच्या मदतीला,हाकेला तयार असतात.लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तक्रारदाराच्या पाठिशी खंबीरपणे उभा आहे. गरज आहे फक्त मानसिकता बदलण्याची,आपल्यातील न्यूनगंड पणा,मनातील भिती काढून टाकण्याची आहे.आपल्यासाठी तयार केलेल्या शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण पात्र असल्यास लाच काय म्हणून द्यायची.
छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्या नातलगांना दुखवत असतो,शेतकरी धु-यासाठी आपल्याच भावाला भांडत असतो,भावकीचा काटा काढण्याच्या गोष्टी करुन मनं कलुषीत करुन कटूता निर्माण करत असतो.मग प्रशासनातील लाचखोरांचे कुठलेही नाते नसताना त्यांची भिती का बाळगतो? हक्कासाठी कुठल्याही प्रकारची भिती मनात बाळगण्याची गरज नाही.योजनेचा लाभ मिळाला काय न मिळाला काय लाचखोरांचे मनसुबे उधळून लावले पाहिजेत.आपल्या हक्कासाठी लाच का द्यायची? याचा विचार करण्याची गरज आहे.आज आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करित आहोत,पुर्वी भ्रष्टाचारी नेत्यांनी,महा लाचखोरांनी घरे भरुन घेतली,आतातरी हे कमी व्हायला हवे.हरामाचा पैसा जमा करणा-यांची लेकरं बापाच्या पैशावर ऐश करत आहेत, प्रशासनातून रिटायर्ड झालेल्या काहीजणांची लेकरं तर माय बापाला पोहायला तयार नाहीत.हे कटू सत्य आहे,कुणी नाकारू शकत नाही.या लालचीखोरांमुळे तुमच्या संसाराचे मात्र करुन घेऊ नका.
जय हिंद! जय महाराष्ट्र!
✍✍✍
पत्रकार
संजय ब्रम्हानंद पाटील चिखले
मरवाळीकर,ता: नायगाव,जि: नांदेड
प्रसिद्धी प्रमुख_अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ नायगाव.
7767912933
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता