सापळा केस
दिनांक ०४/०६/२०२१
आलोसे क्र.१ पुंजाराम नामदेवराव बुनगे, हस्तकला शिक्षक (प्रभारी मुख्याध्यापक) (वर्ग-३), आलोसे क्र.२ संध्या बालासाहेब वैद्य लिपीक रिना करेवार (धोका) मनोविकास विदयालय परभणी (वर्ग-३), यांनी १०,०००/- रू लाच मागणी करून स्विकारले बाबत यशस्वी लाच मागणी कारवाई यातील तक्रारदार यांनी येथे दि. ०३/०६/२०२१ रोजी समक्ष हजर राहुन तकार दिली की, नमुद आलोसे यांनी तक्ररदार यांचे शाळेचे अनुज्ञाप्ती मंजुरीचे कामकाज सुरू आहे. सदर अनुज्ञाप्तीचे दर तीन वर्षास मंजुरी घेतली जाते. सदर अनुज्ञाप्ती मंजुरीचे कामासाठी मुख्याध्यापक बुनगे व लिपीक वैद्य यांनी त्यांचे कडे १००००/- रूपयांची मागणी केली आहे. परंतु अनुज्ञाप्ती मंजूरीसाठी शळेतील शिक्षकास कुठल्याही प्रकारची शासकिय फिस किंवा पैसे लागत नाहीत याबाबत त्यांना माहीती आहे. तरी देखील मुख्याध्यापक बुनगे व लिपीक वैद्य यांनी सदर कामासाठी १०,०००/- रू द्यावे लागतात असे सांगून लाचेची मागणी केली आहे त्यांच्या विरूध्द कारवाई करावी वगैरे मजकुराची तक्रार दिली होती. त्यानुसार लाप्रवि परभणी कडुन पंचासमक्ष करण्यात आलेल्या दिनांक ०३/०६/२०२१ व दि. ०४/०३/२०२१ रोजीच्या पडताळणी कार्यवाही दरम्यान तकारदार यांना मुख्याध्यापक बुनगे व लिपीक वैद्य यांनी अनुज्ञाप्तीचे मंजुरीसाठी १०,०००/- रूपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम सांगीतल्याप्रमाणे घेवून येण्याचे सांगीतले.
त्याप्रमाणे दि. ०४/०६/२०२१ रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यावाही दरम्यान आलोसे क.१ पुंजाराम नामदेवराव बुनगे, हस्तकला शिक्षक (प्रभारी मुख्याध्यापक) (वर्ग-३), आलोसे क.२ संध्या बालासाहेब वैद्य लिपीक रिना करेवार (धोका) मनोविकास विदयालय परभणी (वर्ग-३), यांनी तक्रारदार यांचेकडुन अनुज्ञाप्तीचे मंजुरीसाठी १००००/ रू लाच पंचा समक्ष स्विकारली असता त्यांना पकडण्यात आले आहे. करीता यांचे विरूध्द पो.स्टे. नवा मोंढा येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्रीमती कल्पना बारवकर, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेड व मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती अर्चना पाटील, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्र नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधिक्षक श्री. भरत केशवराव हुंबे, पोना / कटारे, पोना / कुलकर्णी, पोशि/ चट्टे, पोशि/ धबडगे, पोह/ हनुमंते, पोना / शेख मुखीद पोशि/शेख मुक्तार, मपोशि / टेहरे, मपोशि/ दंडवते चापोह / हबीब, चापोना / कदम ओ.सी. बी. परभणी यांनी यशस्वी केलेली आहे.
परभणी जिल्हयातील नागरीकांनी लाचखोर भ्रष्टाचारी लोकसेवकां विरूध्द तकार देण्यासाठी अथवा भ्रष्टाचारा विरूध्द करण्यात येणा-या कारवाई बाबत अधिक माहीतीसाठी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग परभणी यांचेकडून केले आहे.
दुरध्वनी क्रमांक ०२४५२-२२०५९७ टोल फ्री क्रमांक १०६४ Email ID-dyspacbparbhani@gmail.com
श्रीमती कल्पना बारवकर, पोलीस अधिक्षक, ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड ८८८८८४१९६५ श्रीमती अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक ला. प्र. वि. नांदेड परिक्षेत्र नांदेड ९६६५४७९३३३ श्री भरत हुंबे, पोलीस उप अधिक्षक, ला. प्र. वि. परभणी



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता