वाचा
१) शासन निर्णय क्र:-संग्राम २०१५/प्र.क्र.९३/संग्राम कक्ष दि. ११ ऑगस्ट २०१६
२) शासन परिपत्रक क्रमांक :-आसक- २०१७/प्र.क.९२/आपले सरकार कक्ष,दिनांक १३/१०/२०१७
३) शासन शुद्धीपत्रक :- आसक २०१७/प्र.क्र.९२/आपले सरकार कक्ष दिनांक २१/०४/२०१८
४) केंद्र चालकाची नियुक्ती दिनांकापासून ते आज पावेतो झालेल्या आढावा बैठका व प्रशिक्षण सत्र.....
(५) ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी,अलुवडगाव यांचे पत्र क्रमांक 2769,3187,534,3056.
६) कारणे दाखवा नोटीस पत्र क्रमांक- 2203,203,335
6) पंचायत समिती नायगाव यांचे सुनावानी पत्र दि.07/12/2020-2203.
जाक्रपसमुASSK/पंचायत/696/2021
कार्यालय पंचायत समिती,नायगाव,
दिनांक 17/05/2021
आदेश:
उक्त वाचा क्रमांक १ अन्वये रामेश्वर दिगंबर वजीरगावे आपले सरकार सेवा केंद्र चालक ग्रामपंचायत मरवाळी,मरवाळी तांडा,अलुवडगाव ता.नायगाव जि.नांदेड याला नियुक्त केलेल्या ग्रामपंचायतीचे शासन निर्णयानुसार १) PES (panchayat Enterprise Suit) 11 core application ( priyasoft, areaprofiler, NPP,Training Management,Plan Pluse, Action Soft, Assect Directery), 2) G2G Services (eGramseft) 1 ते 33 नमुने, ३) G2C १ ते १९ दाखले, ४) G2C आणि B2C (नागरी सुविधा,जातीचे,उत्पन्नाचे दाखले,MSEB बिल भरणा इतर ४२०+ सुविधा) देणे हे अपेक्षित कामकाज विहित वेळेत परिपूर्ण करणे हि त्याची जबाबदारी होती.
याबाबत रामेश्वर दिगंबर वजीरगावे याला कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आल्यामुळे ग्रामपंचायतीस दैनदिन कामकाजात अडचणी निर्माण होत आहेत.अकार्यक्षमतेमुळे आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत ग्रामस्थांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा यावरही त्याचा परिणाम झाला आहे. व यास स्वतः जबाबदार असल्याने दि. 07/12/2020 रोजी सुनावणीस बोलाविण्यात आले असता उपस्थित राहुन स्वतः लेखी दिली होती.परंतु कामात कोणतीही सुधारणा दिसून आली नाही.काम न करण्याचे वर्तन जाणीवपूर्वक केले आहे व कोणत्याही आज्ञावलीचे काम स्वतः पूर्ण केलेले नाही तसा अहवाल पाहवता समजले आहे. व या कार्यालया कडून वेळोवेळी नोटीसा देऊनहि या कार्यालयास खुलासा सादर केलेला नाही.
सबब कारणी मरवाळी,मरवाळी तांडा,अलुवडगाव ग्रामपंचायतीचे विविध online लेखे नोदविण्याचे कामकाज विहित कालावधीत व कालावधी नंतर देखील केले नसल्याने महाराष्ट्र शासन आपले सरकार सेवा केंद्र मधील शासन निर्णय शिस्त भंग बाबत शासन परिपत्रक आसक- २०१७ प्र.क. ९२/आपले सरकार कक्ष, दिनांक १३/ १०/२०१७ नुसार ग्रामपंचायत मरवाळी,मरवाळी तांडा,अलुवडगाव केंद्र चालक पदावरून दिनांकापासून 17/05/2021 पासून कमी करण्यात येत आहे.
स्वा/_
गट विकास अधिकारी वर्ग-१
पंचायत समिती नायगाव
प्रतिलिपी,
१) मा. उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पं) जिल्हा परिषद नांदेड यांना माहितीस्तव व पुढील कार्यावाहिस्तव सविनय सादर.
२) मा.जिल्हा व्यवस्थापक,आपले सरकार सेवा केंद्र जि.प. नांदेड यांना माहितीस्तव व पुढील कार्यावाहिस्तव सादर.
३) सरपंच/ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यालय मरवाळी,मरवाळी तांडा,अलुवडगाव यांना माहितीस्तव व कार्यावाहिस्तव..
४) सबंधीतास (ग्रामपंचायत कार्यालय मार्फत) कळविणे
सही
गट विकास अधिकारी वर्ग-१
पंचायत समिती नायगाव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता