गुरुवार, जून ०३, २०२१

नायगाव मतदारसंघातील अवैध दारु विक्री बंद करण्याकरीता आमदार राजेश पवार यांनी थोपटले दंड

 मतदारसंघातील अवैध दारू विक्री तत्काळ बंद करा


नायगाव मतदार संघातील तिन्ही तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारु विक्री करत असल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करून होणारी अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आमदार राजेश पवार यांनी पोलीस अधिक्षकांना दिले आहे.

नायगाव विधानसभा मतदारसंघातील नायगाव, उमरी व धमार्बाद तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये लॉकडाऊनच्या काळातही अवैधरीत्या देशी दारूची खुलेआम विक्री केली जात आहे. अवैध दारु विक्रीमुळे गावातील अनेक कुटूंब उध्वस्त होत असुन अवैध दारु विक्रेत्यांवर पोलिस व राजकीय वरदहस्त असल्यामुळे तक्रार केली तरी संबंधित विभागाचे अधिकारी कारवाई करण्यास उडवाउडवी करत असल्यामुळे तसेच गावातील सुजाण नागरिक त्यांच्या विरोधात तक्रार देण्यास घाबरत आहेत त्यामुळे तिन्ही तालुक्यातील चालु असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याच्या सूचना संबंधित पोलीस ठाणे प्रमुखांना द्याव्यात. सुचना करुही पुन्हा अवैध दारु विक्री करताना ठाण्याच्या हद्दीत सापडले तर त्या ठाण्याच्या ठाणे प्रमुखांना त्वरीत निलंबित करावे अशी मागणीचे निवेदन आमदार राजेश पवार यांनी महाराष्ट्र राज्यचे गृहमंत्री मा. दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क नांदेड यांच्याकडे केले आहे.

काही दिवसांपूर्वी आमदार राजेश पवार यांनी अवैध रेती वाहतूक करणाऱ्या विरुद्ध पवित्रा घेतला होता, तसेच टिप्पर,हायवाने रेतीची वाहतूक करण्यावर बंदी आणत फक्त ट्रॅक्टरने रेती वाहतूक करण्याची परवानगी मिळविली आहे,पण आता मतदार संघातील अवैध दारू विक्री बंद करण्याच्या निर्णयाला प्रशासन किती प्रमाणात प्रतिसाद मिळतो याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता