बीड :आरोपी लोकसेवक श्री. सुंदर भागवतराव बांगर, वय ५० वर्ष, धंदा नौकरी, पद कॅशिअर, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. खालापूरी ता. शिरूर कासार वर्ग ३ व प्रशासक सेवा सहकारी संस्था जांब, ता. शिवर कासार जि.बीड रा. कालीकानगर, बीड,याचे विरुद्ध १५०००/- (पंधरा हजार रुपये) लाच मागणी केल्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बीड यांचेकडून कारवाई
दिनांक ०९/०३/२०२१ रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली की, तक्रारदार यांचे लेखा परिक्षण केलेल्या संस्थेचे लेखा परिक्षण शुल्काचे धनादेशावर सही करण्यासाठी श्री. बांगर, कॅशिअर, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. शाखा खालापुरी हे १५०००/- रुपयाची मागणी करत आहेत तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक बीड येथे तक्रार दिली.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक ०९/०३/२०२१ व दिनांक २८.०५.२०२१ रोजी पंचा समझ लाच मागणी पडताळणी केली असता लोकसेवक श्री. बांगर यांनी १५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली. त्यावरून आलोसे श्री. सुंदर भागवतराव बांगर वय ५० वर्ष, धंदा नौकरी, पद कॅशिअर, बीड जिल्हा मध्यवर्ती बँक लि. सालापूरी, ता.शिवरासार वर्ग ३ व प्रशासक सेवा सहकारी संस्था जांब, ता.शिरुर कासार जि.बीड, रा.कालीका नगर बीड यांचे विरुद्ध पोलीस ठाणे शिरकार बीड येथे कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
सदरची कारवाई मा.डॉ.राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि औरंगाबाद, मा.श्री.मारुती पंडीत, प्रभारी अपर पोलीस औरंगबाद श्री बाळकृष्ण हनपुडे पाटील, पोलीस उपअधीक्षक, बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री रविंद्र परदेशी, पोलीस अमलदार श्री. श्रीराम राम श्री भरत गारदे, चालक अंमलदार श्री. मोरे ला.प्र.वि. बीड यांनी कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेशी संपर्क साधवा



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता