वरणगाव : वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळू (sand) वाहतूक व व्यवसाय करण्यासाठी डंपर मालकांकडून महिन्याला १० हजार रूपयांची मागणी वरगणगाव पोलीस स्टेशनचे (Varganaon Police Station) पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलने केली होती. त्यानुसार आज दुपारी एक वाजता ठरल्या प्रमाणे १० हजार रूपयांची लाच स्वीकारतांना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या (Anti Corruption Bureau) पथकाने रंगेहाथ अटक केली. आहे. (sub-inspector and constable caught accepting bribe acb squad action)
वरणगावसह परीसरात वैध अवैध रात्रंदिवस वाळूसह अन्य गौण खनिजाची वाहतूक मोठया प्रमाणावर सुरू आहे. त्या दृष्टीने महसुल विभाग सुध्दा कार्यदक्ष आहे. वरणगाव पोलिसांनी सुध्दा बरेच वेळा कारवाया झाल्या आहेत. त्याच प्रमाणे तक्रारदार पुरुष वय ३० (रा. साकेगाव. ता. भुसावळ) यांचा वाळू वाहतूक करण्याचा व्यवसाय वरणगाव पोलिस ठाणे हवीत असल्याने संशयीत आरोपी पोलिस उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी (वय ५६रा. भिरूड कॉलनी, जळगाव रोड भुसावळ) याला तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर क्रं. एम. एच. ४० एन ४०८६ हे असून सदर डंपर वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक करतांना त्या वाहनावर करवाई न करण्याच्या मोबदल्यात प्रती महिना १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानुसार पो. कॉ. गणेश महादेव शेळके वय-३१, रा. पोलीस वसाहत, वरणगाव ता. भुसावळ, जि. जळगाव यांनी १० हजारांची लाच स्वीकारली. या दोघांना जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतिश भामरे यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात सापळा रचून दोघांना लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली आहे.
पोलीस उप अधीक्षक सतीश डी. भामरे, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोनी लोधी, सफी दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ, अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ रविंद्र घुगे, पोना. मनोज जोशी, पोना. सुनिल शिरसाठ, पोना. जनार्धन चौधरी, पोको प्रविण पाटील, पोकॉ. नासिर देशमुख, पोकॉ ईश्वर धनगर, पोकॉ. प्रदिप पोळ, पोका महेश सोमवंशी आदींनी हि कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता