नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारला सत्तेत दुसऱ्यांदा येऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्ष २०१४मध्ये आजच्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. या निमित्ताने भाजपा नेत्यांकडून सरकारच्या कामांना उजाळा देण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट करून भावना व्यक्त केल्या आहेत. याचबरोबर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही ट्विट करून मोदींचे अभिनंदन केले आहे.
“मागील सात वर्षांत देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सेवा आणि सर्मपणावर विश्वास दाखवला आहे. यासाठी मी देशवासीयांना नमन करतो. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक संकटावर विजय मिळवून भारताच्या विकासाचा गाडा अखंडितपणे पुढे घेऊन जाऊ, याचा पूर्ण विश्वास आहे.
या सात वर्षांत मोदीजींनी देशहिताला सर्वोच्च मानून दृढनिश्चय आणि सर्वस्पर्शी व कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गरीब, शेतकरी आणि वंचित वर्गांना विकासाच्या मुख्य धारेशी जोडले. त्यांचे जीवनमान उंचावले. याचबरोबर आपल्या सशक्त नेतृत्वाच्या बळावर भारताला एक मजबूत राष्ट्र बनवले.” असे मत अमित शहा यांनी ट्विट करून व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता