By संजय ब्रम्हानंद पाटील चिखले
नायगाव-मरवाळी,दि 17 मे 2021 : आज रोजी नायगाव तालुक्यातील मौजे मरवाळी येथे संजय पाटील चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत जमीन सुपीकता निर्देशांक फलकाचे अनावरण करण्यात आले,त्यानंतर सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक,खत व्यवस्थापन,सरी-वरंबा पद्धतीवर सोयाबीनची लागवड करण्याबाबत माहिती सांगण्यात आली व शेतकरी निवड करण्यात आली.
कृषी सहायक मनुरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की,सोयाबीन पेरणा-या शेतकऱ्यांनी तसेच ज्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी आपल्या घरचे बियाणे ठेवले आहे,कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करणार आहेत किंवा गावात उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाण्याची खरेदी करणार आहेत त्या सर्वांनी सोयाबीन पेरणी करण्या अगोदर बियाण्याची उगवण शक्ती तपासाणी करणे अत्यंत आवश्यक आहे,त्यानुसारच बियाणे पेरणीसाठी वापरावे, शेतकऱ्यांनी आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करून खरीप 2021 पूर्वी पेरणीचे नियोजन करावे,जमिनिच्या सुपिकतेनुसार खताची मात्रा कशी द्यायची याचे सखोल मार्गदर्शन कृषी सहायक मनुरकर यांच्या कडून मरवाळी येथे करण्यात आले.
सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक करून दाखवतानाचा व्हिडिओ
सोयाबीन हे सरळ वाण व स्वपरागीत पीक असल्याने बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही,मात्र पेरणीपूर्वी उगवण चाचणी घेणे आवश्यक आहे. यासाठी सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यातून प्रातिनिधिक नमुना काढून त्यातील काडीकचरा काढून टाकून नमुना एकत्र करावा,सुती पोते घेऊन ते चांगले भिजवून घ्यावे ते ओले पोते जमिनीवर अंतरावे व काढलेल्या प्रातिनिधिक नमून्यातून सरसकट 100 दाणे दिड ते दोन सेमी च्या अंतरावर 10 दाण्याच्या 10 रांगा ओल्या पोत्याच्या अर्ध्या भागावर ओळीत ठेवावे नंतर शिल्लक अर्धे पोते त्या ठेवलेल्या बियाण्यावर झाकून घ्यावे,बियाण्यासकट पोत्याच्या दोन दोन घड्या पडाव्यात त्या नतर त्या घडी केलेल्या पोत्याला उजव्या व डाव्या बाजूने थोडे गुंडाळून ते सुतळीने बांधून घेऊन घरात खिडिच्या ठिकाणी किंवा सावलीला जेथे पुरेसा सुर्यप्रकाश मिळेल असे सावलीला ठेवावे,एक दिवस आड त्या पोत्यावर व्यवस्थित पाणी शिंपडावे नंतर दोन दिवसांनी ते पोते उघडून उगवण क्षमता तपासावी,कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजून घ्यावे. सरासरी काढून 100 दाण्यांपैकी 70 किंवा जास्त दाण्याची उगवण झाली असल्यास ते बियाणे पेरणीस योग्य आहे असे समजावे व एकरी 30 किलो या प्रमाणात बियाणे वापरावे जर उगवणशक्ती 70 टक्केपेक्षा कमी आले तर प्रत्येक एक टक्का मागे अर्धा किलो बियाणे जास्तीचे वापरावी.जर उगवण क्षमता 60 % पेक्षा कमी आल्यास त्याचा पेरण्यासाठी वापर करु नये,अश्या प्रकारे घरच्या घरी सोयाबीन उगवण क्षमता तपासून सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचा अंदाज येतो.हि चाचणी पेरणीच्या एक-दोन आठवडे अगोदर करावी असे प्रात्यक्षिक करून दाखवत असताना कृषी सहायक मनुरकर यांनी सांगितले.
सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक,खत व्यवस्थापन,सरी-वरंबा पद्धतीवर सोयाबीनची लागवड करण्याबाबत माहिती देतानाचा ऑडिओ
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सरी-वरंबा पद्धतीवर सोयाबीनची लागवड करावी असेही यावेळी त्यांनी सांगितले.उपस्थितांपैकी काही जनांनी आपल्या शंका मांडल्या, त्यांच्या शंकांचे निरसन ही यावेळी करण्यात आले,यावेळी कृषी सहायक मनुरकर, कृषी मित्र डुमणे,वसंत गुरुजी चिखले,गुरुनाथ पिंपळे,गोविंद तळणे,पप्पू पवळे,राम अण्णा सिंगवाड, विश्वनाथअप्पा स्वामी,दादाराव पाटील पवळे,पंप ऑपरेटर बालाजी मुदखेडे,नारायण मुदखेडे, हणमंत तंबवाड,नामदे वाघमारे,नामदेव गुरुजी लोहकरे, बालाजी लोहकरे आदी शेतकरी, शेतकरी पुत्र उपस्थित होते.
त्या नंतर कोपरा या गावी सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक,जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले
![]() |
| मरवाळी येथे घेण्यात आलेल्या सोयाबीन उगवणशक्ती प्रात्यक्षिक प्रयोगात 73% उगवण |




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता