शुक्रवार, मे १४, २०२१

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त नायगाव शहरात शुक्रवार दि.१४ मे रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

 


नायगाव,दि 13 मे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार दि.१४ मे रोजी सकाळी १० वाजता नायगाव शहरातील भारत जिनिंग समोर डी.बी .पाटील कोंपलेक्स येथे करण्यात आले आहे. या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन नांदेड जिल्हाचे लोकप्रिय खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शुभ हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास सूरवात होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकर हे राहणार आहेत. तसेच राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर अलोट प्रेम करणारे मावळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

  नायगाव तालुक्यातील रक्तदात्यानी सामाजिक बांधिलकी म्हणून या जनसेवेच्या प्रकियेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजक शिवराज पाटील होटाळकर मित्र मंडळ , शिवनंदन ग्रुप चे अध्यक्ष मंगेश पा.पवार व राजे संभाजी जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

       नायगाव तालुक्याच्या वतीने कोव्हिड संकट काळात रुग्णांना रक्ताची प्रचंड कमतरता भासत असल्याचे ओळखुन राजे संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त प्रथमच सामाजिक भान ठेवून नायगाव शहरातील डी.बी.पाटील कॉम्लेक्स येथे रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे तरी नायगाव शहर व तालुक्यातील जास्तीत जास्त युवक व नागरिकानी रक्तदान करण्याचे आवाहन शिवराज पा होटाळकर मित्र मंडळ, शिवनंदन ग्रुप व संभाजी राजे जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता