लाच देणे आणि लाच घेणे कायद्याने दोन्ही गुन्हा आहे
आदरणीय सर,
▶️घटक - अकोला
▶️तक्रारदार - पुरूष, वय 46 वर्ष, रा.महात्मा फुले नगर,स्मशानभूमीजवळ, सिंधी कॅम्प, अकोला
▶️आरोपी - उत्तम बळीरामजी सरदार(इतर लोकसेवक), वय 71 वर्ष, व्यवसाय- रास्त भाव धान्य दुकानदार, रा सिंधी कॅम्प, पक्की खोली,स्मशानभूमी रोड, खदान, अकोला, जि. अकोला.
▶️लाच मागणी - रु 1000/- दोन किस्ती मध्ये
▶️लाच स्विकारली - पहिली किस्त म्हणून रु 500/- स्वीकारले
▶️पडताळणी- दि.
20/05/2021
▶️सापळा कार्यवाही - 21/05/2021
▶️घटनास्थळ - सरकारी रास्त भाव धान्य दुकान क्र 90, सिंधी कॅम्प, पक्की खोली,स्मशानभूमी रोड, खदान, अकोला, जि. अकोला.
▶️कारण - तक्रारदार यांना 7 रुपये प्रती किलो रेशनकार्ड च्या ऐवजी 2 रुपये प्रती किलो धान्याचे रेशनकार्ड बनवून देण्याकरिता अज्ञात लोकसेवकाच्या नावाने शासकीय पंचासमक्ष रुपये 1000/- लाचेची मागणी करून पहिली किस्त म्हणून रुपये 500/- स्विकारले. आरोपी (इतर लोकसेवक) यास ताब्यात घेण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.
मार्गदर्शन -
▶️मा. श्री. विशाल गायकवाड, पोलीस अधिक्षक, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती
मा. श्री. अरुण सावंत ,अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती ,
➡तपासी अधिकारी-पोलीस निरीक्षक, ईश्वर चव्हाण,ला. लु.प्रतिबंधक विभाग अकोला
▶️कारवाई पथक-पोलीस निरीक्षक, ईश्वर चव्हाण,ला. लु.प्रतिबंधक विभाग अकोला, पो. अम. राहुल इंगळे, श्रीकृष्ण पळसपगार,निलेश शेगोकार, लाच लुचपत प्रतिबंधक विभाग अकोला
▶️हैश वैल्यु घेण्यात आली आहे.
----------------------------------------
सर्व नागरीकांना व लोकसेवकांना आवाहन
करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी
यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी मागणी केल्यास तसेच कोणत्याही खाजगी ईसमाचे वतीने लोकसेवकास लालेचे प्रलोभन दिल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग अकोला
✍️✍️✍️



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता