सोमवार, एप्रिल १९, २०२१

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने नांदेडमध्ये मराठवाड्यातील सर्वात मोठा २० के.एल ऑक्सिजन टँकची उभारणी

 


नांदेड : मराठवाड्यामधील सर्वात मोठा २० के.एल ऑक्सिजन टँक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बसवण्यात येणार आहे. चव्हाण यांनी डीपीसीसी तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष आमदार मोहन हंबर्डे यांच्या अध्यक्षतेखाली तसे महापौर, अधिष्ठाता, सदस्य, नगरसेवक यांच्या उपस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी बैठकीतील उपस्थितांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोव्हिड रुग्णांचे कक्ष, स्वयंपाक घर, आक्सिजन टँकची भेट देवून पाहणी केली. या बैठकीत कोरोनाचा हा काळ अत्यंत कठीण काळ आहे. नांदेड शहरासह जिल्हामध्ये कोराेना रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ऑक्सिजन तसेच खाटा देखील कमी पडत आहेत. या पार्श्वभमूीवर ही महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली.

जिल्हाभरामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना पालकमंत्री यांनी डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयांसाठी खुप चांगल्या प्रमाणात सेवा–सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे आता या सर्व सोईसुविधांपासून कोराना रुग्णांवर तत्काळ उपचार करण्यासाठी मदत नक्कीच होणार आहे. त्यामुळे आता सर्व डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी यांनी आपापली जबाबदारी लक्षात घेवून रुग्णांवर उपचार करण्याचे आवाहन देखील या वेळी आमदार हंबर्डे यांनी बैठकीदरम्यान केले. ही बैठक तब्बल दोन तास चालली तर बैठकीमध्ये उपस्थितांनी विविध सुचना देखील केल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता