पोलिसांना मिळालेल्या गुप्त खबरी नुसार नरसी येथील महेबुब नगर मध्ये अवैध देशी दारू व शिंदी ची विक्री चालू असल्याची माहीती मिळताच रामतिर्थ पोलिस ठाण्याचे सपोनि महादेव पुरी यांनी छापा टाकला असता आरोपीने आपले ताब्यात विना परवाना बेकायदेशीर रित्या देशी दारुच्या बाटल्या,प्रो गुन्ह्याच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळून आला. आरोपी पांडुरंग लिंगूराम सूर्यवंशी रा.नरसी ता.नायगाव यांच्याकडून १४,९७६/- रूपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या जप्त करून त्याच्या विरोधात पोलीस काॅन्स्टेबल अनिल रिंदकवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दारू बंदी गुरनं 73/21 कलम 65(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या घटनेत महेबुब नगर मध्ये छापा टाकला असता आरोपीने आपले ताब्यात विना परवाना बेकायदेशीर रित्या देशी दारुच्या बाटल्या व पांढ-या रंगाची सिंदी, प्रो गुन्ह्याच्या मालाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळून आला. त्या ठिकाणी १३८४/--रूपये किमतीची देशी दारू व शिंदी जप्त करून आरोपी विठ्ठल लक्ष्मण गायकवाड रा. नरसी ता.नायगाव यांच्या विरोधात पोलीस काॅन्स्टेबल अनिल रिंदकवाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दारू बंदी गुरनं 74/21 कलम 65(ई) नुसार रामतिर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू,शिंदी विक्री करणा-यांचे धाबे दनानले आहेत.
सदर गुन्ह्याचा तपास सपोनि महादेव पुरी यांच्या मार्गदर्शनखाली बिट जमादार मिरदोडे हे करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस काॅन्स्टेबल अनिल रिंदकवाले, विलास भोळे,प्रल्हाद आडे, यांनी केली आहे.
सर्व सामान्य नागरीकांकडून पोलीसांच्या या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.पुढील दारु बंदी काळात पोलीसांकडून या बेकायदा दारु विक्री करणा-यांवर अशाच कारवाया व्हाव्यात असे बोलल्या जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता