नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे अशोकराव चव्हाण यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने 13, राष्ट्रवादी काँग्रेसने 3 तर शिवसेनेने 1 जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.
![]() |
| अशोक चव्हाणांकडून भाजपच्या पॅनेलचा धुव्वा, परंतु खा.चिखलीकरला धूळ चारण्यात अपयश |
नांदेड, दिनांक 4 एप्रिल 2021 : नांदेड जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी झालेल्या मतदानाची रविवारी मतमोजणी पार पडली असून अखेर जिल्हा बँकेवर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे अखेर 'राज' आले असून 21 पैकी 17 जागा महाविकास आघाडीने मिळवत एकहाती सत्ता संपादित केली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपाप्रणीत व खा. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चा पूर्ण धुव्वा उडाला असून केवळ चार जागांवर त्यांना समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे.परंतु चिखलीकर पिता-पुत्राचा पराभव करणे महत्त्वाचे होते,पण पिता-पुत्राचा पराभव करण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे.पराभव करता आला नाही हे नक्की.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. 2 एप्रिल रोजी झालेल्या मतदानाचे आज रविवारी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या कक्षात मतमोजणी करण्यात आली यात अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत.
अर्धापूर सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून महाआघाडीचे गोविंदराव शिंदे नागेलीकर हे अवघ्या एका मताने विजय झाले आहेत त्यांना 18 तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपाप्रणित पॅनलचे गांधीजी पवार यांना 17 मते मिळाली आहेत. अर्धापूर मतदार संघातून बाबुराव कदम हे 23 मते घेऊन विजयी झाले आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी डॉ. लक्ष्मणराव इंगोले यांना केवळ एक मत पडले आहे. कंधार सेवा सहकारी संस्था मतदार संघातून प्रवीण पाटील चिखलीकर यांनी 16 मते घेत विजय मिळवला असून त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव पांडागळे यांचा पराभव केला आहे. पांडागळे यांना 8 मते मिळाली आहेत. लोहा सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे खासदार तथा पॅनलचे प्रमुख प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्वाधिक 42 मते मिळवून विजयी संपादित केला आहे त्यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी ललिताबाई सूर्यवंशी यांचा पराभव केला आहे. सूर्यवंशी यांना केवळ 6 मते मिळाली आहेत. नायगाव सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे वसंतराव चव्हाण यांनी 28 मते मिळविली आहेत. तर गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांना 22 मते मिळाली आहेत. देगलूर मतदारसंघातून विजयसिंह देशमुख यांनी 34 मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यांनी गोदावरीताई सुखावे यांचा पराभव केला आहे. सुगावे यांना 29 मते मिळाली आहेत. धर्माबाद सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे श्याम कदम हे विजयी झाले आहेत. त्यांना 4 मते पडली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी गफारबेग मिर्झा यांना 1 मत मिळाले आहे. उमरी सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून माजी आ. बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास देशमुख यांनी विजय मिळविला असून त्यांना 25 मते मिळाली आहेत. त्यांनी महाविकास आघाडीचे संदीप कवळे यांचा 4 मताने पराभव केला आहे. राठोड यांना 16 मते मिळाली आहेत.
किनवट सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहिफळे यांनी 26 मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपाप्रणित पॅनलचे उमेदवार सुरेश रंगनेनवार यांचा पराभव केला आहे. रंगनेनवार यांना 16 मते मिळाली आहेत. माहूर मतदारसंघातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेवराव केशवे यांचे चिरंजीव राजेंद्र केशवे यांनी 13 मते घेऊन विजय मिळविला आहे. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार बंडू भुसारे यांना 7 मते मिळाली आहेत. सेवा सहकारी संस्था महिला नांदेड मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या संगीता पावडे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी डॉक्टर शीला कदम यांचा पराभव केला आहे. पावडे यांना 537 तर डॉ. शीला कदम यांना 375 मते मिळाली आहेत. हिमायतनगर महिला राखीव मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयाबाई शिंदे यांना 590 मते घेत अनुराधा पाटील यांचा पराभव केला.पाटील यांना 319 मते मिळाली आहेत. नागरी सहकारी बँक पतसंस्था मतदारसंघात भाजपाप्रणित पॅनलचे उमेदवार दिलीप कंदकुर्ते यांचा पराभव झाला असून या मतदार संघातून महाविकास आघाडीचे शिवराम लुटे हे 105 मते घेऊन विजयी झाले आहेत. इतर सहकारी संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष मोहनराव पाटील टाकळीकर यांनी 178 मते मिळवून विजय मिळविला आहे.येथे त्यांचे प्रतिस्पर्धी व्यंकटेश जिंदम यांनी मतदानाच्या दोन दिवस अगोदर टाकळी कर यांना आपला पाठिंबा दिला होता तरीही जिंदम यांना 18 मते मिळाली आहेत अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून महा विकास आघाडीच्या सविता मुसळे या 566 मध्ये घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपाप्रणित पॅनलचे उमेदवार लक्ष्मणराव ठक्करवाड यांचा पराभव केला आहे. ठक्करवाड यांना 319 मते मिळाली आहेत. इतर मागासवर्गीय मतदारसंघातून महा विकास आघाडीचे हरीहरराव भोसीकर हे सर्वाधिक 707 मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांनी उमाकांत गोपछडे यांचा पराभव केला आहे.गोपछडे यांना 203 मते मिळाली आहेत.
भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून महा विकास आघाडीचे व्यंकटराव जाळणे हे विजयी झाले असून त्यांना 639 मते मिळाली आहेत.त्यांनी भाजपाप्रणित पॅनलचे अगड्मदास शिनगारे यांचा पराभव केला आहे.शिंगारे यांना 269 मते मिळाली आहेत. एकंदरीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 13 जागा मिळविलेल्या आहेत, तर मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने 3 जागा व शिवसेना 1 जागा मिळविली आहे. 21 पैकी 17 जागा महा विकास आघाडीने मिळविलेल्या असून जिल्हा बँकेवर निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे.दरम्यान भाजपाचे माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर हे यापूर्वी बिनविरोध निवडून आले आहेत.आज झालेल्या मतमोजणीत चिखलीकर पिता-पुत्र आणि माजी आ.गोरठेकर यांचे चिरंजीव कैलास असे 3 जण विजयी झाले आहेत.भाजपाप्रणीत पॅनलला या निवडणुकीत केवळ 4 जागा मिळालेल्या आहेत.
नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा धुव्वा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता