दिनांक -१७/०३/२०२१
श्रीमती मिना गिरिश सांडये वय ५३ वर्षे, राज्य कर अधिकारी भाईदर विभाग, राहणार ए /५,१५५,जे.पी.नगर, विरार (प) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे (कॅम्प पालपर) यांनी घेतले ताब्यात
- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : अँटी करप्शन ब्युरो ठाणे (कॅम्प पालघर),भाईंदर पोलीस ठाणे,मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय
- गुन्हा नोंद क्रमांक - स्टे.डा.नोंद क्रमांक २६/२०२१, वेळ १७:३७ वाजता दिनांक १७/०३/२०२१
- लोकसेवकाचे नाव व कार्यालय : श्रीमती मिना गिरिश सांडये वय ५३ वर्षे, राज्य कर अधिकारी भाईदर विभाग, राहणार ए/५, १५५. जे.पी.नगर, विरार (प) वर्ग-२
- मागितलेल्या लाचेची रक्कम - ५,०००/-रुपये,
- स्विकारलेली लाचेची रक्कम : ५,०००/-रुपये,
थोडक्यात हकिगत : यातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील आहेत. श्री. राजन चौरसिया हे आर.सी.स्टील कंपनी, पेल्हार, नालासोपारा पुर्व या कंपनीचे मालक असून तक्रारदार हे कंपनीचे सल्लागार आहेत.
आर.सी.स्टील कंपनी, पेल्हार, नालासोपारा, पूर्व या कंपनीचे सन २०१६-१७ या कालावधीच्या अँसेसमेंट ऑडर मिळणेकामी तक्रारदार यांनी वस्तु व सेवा कर विभाग, भाईंदर (प) येथील राज्य कर अधिकारी श्रीमती मिना जी. सांडये यांची दिनांक १०/०३/ २०२१ रोजी भेट घेतली असता, त्यांनी तक्रारदार यांचेकडे अँसेसमेंट ऑर्डर काढण्यासाठी ५०००/ रूपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार व कंपनीचे मालक श्री. राजन चौरसिया यांना श्रीमती सांडये यांनी मागणी केल्याप्रमाणे लाचेची रक्कम देण्याची ईच्छा नसल्याने तक्रारदार यांनी दिनांक १७/०३/२०२१ रोजी अॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे कॅम्प पालघरकडे श्रीमती मिना सांडये, राज्य कर अधिकारी यांचे विरूध्द लेखी तक्रार दिली आहे.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीचे अनुषंगाने दिनांक १७/०३/२०२१ रोजी तक्रारदार यांना आरोपी लोकसेविका यांचे कार्यालयात पंचासह पाठवून पडताळणी केली असता, आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांचे कामाचे अनुपंगाने ५,०००/- रू. लाचेची मागणी केली. तसेच दिनांक १७/०३/२०२१ रोजी सापळापुर्व व सापळा पंचनाम्यात लोकसविका हिने सदर लाचेची रक्कम १६:३५ वा. च्या सुमारास वस्तु व सेवा कर विभाग, १ ला माळा, एम.टी.एन.एल. बिल्डींग, भाईदर प.. जि.ठाणे येथे त्यांचे कक्षात स्विकारली असता त्यांना अॅन्टी करण्शन ब्युरो, ठाणे, (कॅम्प पालघर) कार्यालयाचे सापळा पथकाकडून रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाच्या लोकसेवकावद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (कॅम्प पालघर) यांचेशी संपर्क करवा.
संपर्क पत्ता : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे (कॅम्प पालघर) पालघर प. ४०१ ४०४.
संकेतस्थळ : www.acbmaharashtra.gov.in
ई मेल : acbmaharashtra@mahapolice.gov.in
dypacbpalghar@gmail.com
ऑनलाईन तक्रार अॅप्लीकेशन : www.acbmaharashtra.net
टोल फ्री नं. : 1064
दुरध्वनी क्रमांक : 02525-297297
व्हॉट्स अप क. : 9552250404, 9923699430
✍️✍️✍️
संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर
7767912933
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.
सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग
👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता