बुधवार, मार्च २४, २०२१

कुंभार समाज विकास संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड.सोनम तोषटवाड

 
अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या नांदेड महिला जिल्हाध्यक्षपदी ॲड.सोनम तोषटवाड यांची निवड करण्यात आली.

नायगाव : अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय असून कुंभार समाजातील तळागाळातील लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढणारी ही संघटना आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे यांच्या आदेशाने व राज्य युवक संपर्क प्रमुख श्रीरामजी तेलंग यांच्या निर्देशानुसार राज्य सचिव मनोहरजी जाधव यांच्या सहीचे नियुक्तीपत्र देऊन ही निवड करण्यात आली आहे.

मागील चार महिन्यापुर्वी नांदेड जिल्ह्यात अखिल महाराष्ट्र कुभार समाज विकास संस्थेच्या वतीने साठ इलेक्ट्रिकल चाकांचे वाटप करण्यात आले होते. संघटनेच्या अशा विविध कार्याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संघटन मजबूत करण्यासाठी ही निवड करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बालाजी जोरूळे यांनी दिली.

या निवडीबद्दल संतोष इबितदार यांच्या सह अनेक समाज बांधवांनी अभिनंदन केले आहे.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता