बुधवार, मार्च २४, २०२१

दुःखद घटना..... जिल्हा परिषद शाळा दरेकसा येथील विद्यार्थीनी कु. साक्षी मुसाहे हीचे ब्रेन हॅमरेज ने निधन..


गोंदिया, (दि. 23 मार्च): मागील काही दिवसांपासून शासकीय रुग्णालय नागपूर येथे ब्रेन हँमरेज अटॅक मुळे दाखल असलेली जिल्हा परिषद शाळा दरेकसा पं. स. सालेकसा येथील विद्यार्थीनी कु. साक्षी मुसाहे हीचे आज रुग्णालयात निधन झाले.

कु. साक्षी मुसाहे ही जिल्हा परिषद शाळा, दरेकसा येथे इयत्ता 3रीत शिकत होती. अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यांच्या आवाहनाला जिल्ह्यातील अनेक शिक्षक, केंद्रप्रमुख व इतर अधिकाऱ्यांनी सढळ हाताने मदत केली. परंतु साक्षीने उपचाराला प्रतिसाद दिला नाही व आज तिची प्राणज्योत मावळली. साक्षीच्या जाण्याने संपूर्ण मुसाहे परिवार दुःखात बुडाला असून जिल्ह्या चा शिक्षण विभाग त्यांच्या दुःखात समाविष्ट असल्याची प्रतिक्रिया शिक्षणाधिकारी(प्राथ.) राजकुमार हिवारे यांनी दिली आहे.

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

सापळा कारवाई अहवाल स्पेशल ब्लॉग

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता