रविवार, फेब्रुवारी २१, २०२१

क्या बात हैं? : दोन वर्गमित्र एक उपजिल्हाधिकारी, दुसरा गटविकास अधिकारी;दोघेही लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात,एकाची ट्रॅप झाल्यावर दुसरा भेटायला गेला-दुस-या दिवशी स्वतः ट्रॅप झाला

 वर्गमित्र असलेल्या बिडीओची ट्रॅप झाल्यावर  उप जिल्हाधिकारी भेटायला जातो,दुस-या दिवशी स्वतःच अडकतो-कसला हा पैशाचा मोह?

दोन वर्गमित्र एक बिडीओ तर दुसरा उप जिल्हाधिकारी

बीड : वर्गमित्र असलेले दोन प्रशासकीय अधिकारी लाच स्वीकारताना दोन दिवसात एसीबीच्या जाळ्यात अडकले आहे. श्रीकांत गायकवाड आणि नारायण मिसाळ अशी या दोन लाचखोर अधिकाऱ्यांची नावं आहेत. श्रीकांत गायकवाड हे बीडच्या माजलगावचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. तर नारायण मिसाळ हे पाटोदा पंचायत समितीत गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते.

श्रीकांत गायकवाड यांना 65 हजारांची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. माजलगावच्या शासकीय विश्रामगृहामध्ये आपल्या चालकामार्फत त्यांनी ही लाच स्वीकारली. त्यानंतर एसीबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. एक दिवस आधी त्यांचे वर्गमत्र असलेले पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण मिसाळ यांना देखील लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

विशेष म्हणजे मिसाळ यांना भेटण्यासाठी गायकवाड हे एसीबीच्या कार्यालयात गेले होते. त्यानंतर तेथून थेट माजलगावला गेले आणि माजलगावमध्ये आपल्या चालकामार्फत लाच स्वीकारताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना देखील अटक केली आहे. गायकवाड आणि मिसाळ हे दोघेही वर्गमित्र असून आता दोघेही एसीबीच्या ताब्यात आहेत. सलग दोन दिवस झालेल्या या कारवाईमुळे भ्रष्ट अधिकाऱ्यांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहेत.

विशेष म्हणजे शासकीय विश्रामगृहाचा उपयोग लाच घेण्यासाठी करण्यात आला,हे चूकिचे आहे.ही गंभीर बाब आहे

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री क्रमांक-1064

👇 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची वेबसाईट/संकेतस्थळ

www.acbmaharashtra.gov.in

👇Explore live radio by rotating the globe

http://radio.garden/live

👇Radio Stations – Saptarang Creation

http://saptarangcreation.com/radio-stations/

✍️✍️✍️

संजय ब्रम्हानंद पा चिखले मरवाळीकर

7767912933

बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधावा.

👇ब्लॉग वरील सर्व बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

www.nandednewsupdate.blogspot.com

२ टिप्पण्या:

  1. हे हरामखोर भ्रष्ट लाख दिड lakhachya पुढे पगार असून हे जनतेला त्रास देतात तलाठी पासुन तर सचिव पर्यंत खूप संपत्ती यानच्या घरी बँक शेती प्लॉट फ्लैट बंगले सोने चांदी भ्रष्ट मार्गाने आहे राज्य शासनाने पगार कमी करावे आय्कर व सी बी आई E D मार्फत लगेच धाडी टाका संपती जमा करा कोणताच टैक्स जनतेकडून घेण्याची गरज नही पहिल काम दहा हजार अधिकारी धाडी तका सगळे सरळ होतील लगेच निर्णय घेतला तरच या अधिकार्यांच माज कमी होईएळ नाहितर हे जनतेला त्रास देउन पैसे खाणार. शूभ काम करा नाहितर करोना येत आहेच

    उत्तर द्याहटवा

बातमी विषयी आपण आपली टिप्पणी,अभिप्राय नोदवू शकता किंवा काही सूचना मांडू शकता