पोस्ट्स

2026 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गोवंशाची अवैध वाहतूक, तस्करी व कत्तलीबाबत माहिती देण्याचे नांदेड जिल्हा पोलिसांचे आवाहन; माहिती देणाऱ्याचे नाव पुर्णपणे गोपनीय ठेवले जाईल

इमेज
संपादक -संजय पाटील चिखले नांदेड,मंगळवार दि.२६/०५/२०२६ : जिल्ह्यात गोवंशाची अवैध वाहतूक, तस्करी किंवा कत्तल यासारखे बेकायदेशीर प्रकार घडत असल्यास नागरिकांनी त्याबाबतची माहिती प्रशासनाला तातडीने द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अधिकृत पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून ही विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत नागरिकांचा सहभाग वाढावा आणि सुरक्षेची खात्री मिळावी यासाठी पोलिसांनी महत्त्वाची ग्वाही दिली आहे. अवैध गोवंश तस्करी किंवा कत्तलीबाबत पोलिसांना माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव आणि ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन नागरिकांना अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळाल्यास त्यांनी नांदेड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष आणि संबंधित विशेष पथक अधिकारी यांच्या खालील अधिकृत क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा: आपत्कालीन क्रमांक : 112 नांदेड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष : 02462-234504 पीआय भोईटे (PI Bhoiete): +91 83...

सजग नागरिकाची दिशाभूल? राज्य माहिती आयुक्त प्रदीप व्यास यांच्या आदेशातील 'तो' भोंगळ कारभार उघड

इमेज
  मुंबई (विशेष प्रतिनिधी): करोडो रुपयांची कर चुकवेगिरी उघड करणाऱ्या एका सजग नागरिकाला कायदेशीर न्याय देण्याऐवजी, चक्क शासकीय आदेशातच दिशाभूल केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . राज्य माहिती आयुक्त (बृहन्मुंबई) श्री. प्रदीप व्यास यांच्या कार्यालयातील भोंगळ कारभार एका द्वितीय अपिलाच्या आदेशामुळे चव्हाट्यावर आला असून, सुनावणीच्या आदल्या दिवशीच जन माहिती अधिकाऱ्याने निवेदन सादर केल्याचा खोटा उल्लेख आदेशात केल्याचा गंभीर आरोप तक्रारदार यांनी केला आहे. नेमका काय आहे प्रकार? आणि मुख्य आक्षेप भायखळा येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक श्री. वसंत शामराव उटीकर यांनी माहिती अधिकारांतर्गत दाखल केलेल्या एका द्वितीय अपिलाची सुनावणी शुक्रवार, दिनांक ०८ मे २०२६ रोजी राज्य माहिती आयुक्त प्रदीप व्यास यांच्या कार्यालयात पार पडली होती. या सुनावणीचा निकाल दिनांक १८ मे २०२६ रोजी पारीत करून तो महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करण्यात आला. सदर आदेशाची प्रिंट उटीकर यांनी दिनांक   २१ मे २०२६ रोजी काढून पडताळून पाहिली असता, त्यांना मोठा धक्का बसला. आदेशातील अनुक्...

माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयाचा कारभार चव्हाट्यावर; माहिती अधिकारात धक्कादायक बाबी उघड!

इमेज
६.५० कोटींपेक्षा जास्त भाडे थकबाकी ६ अशासकीय कार्यालयांनी गेल्या अनेक वर्षापासून थकविलेलीची बाब माहिती अधिकारात उघड एप्रिलमधील सुनावणीचा निकाल मार्च महिन्याच्या तारखेने दिल्याने श्री. शरद पाटील, अपिलीय प्राधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार उघड मुख्य राज्य माहिती आयुक्तांकडे द्वितीय अपील दाखल; दोषींवर कारवाईची मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबईतील माझगाव येथील राज्यकर आयुक्त कार्यालयातील (जीएसटी भवन) उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा मनमानी आणि भोंगळ कारभार माहितीच्या अधिकारात (RTI) उघडकीस आला आहे. एका शासकीय इमारतीमधील ०६ अशासकीय कार्यालयांनी गेल्या अनेक वर्षात तब्बल ६ कोटी ५० लाख रुपयांहून अधिक भाडे थकबाकी थकविलेल्याचे समोर आले असतानाच, या प्रकरणातील पहिल्या अपिलाचा निकाल चक्क सुनावणीच्या आधीच्याच तारखेने देऊन माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली केल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी सजग नागरिक तथा सेवानिवृत्त राज्यकर निरीक्षक श्री. वसंत शामराव उटीकर यांनी मुख्य राज्य माहिती आयुक्तांकडे धाव घेतली आहे. कोट्यवधी रुपयांची भाडे थकबाकी मिळालेल्या माहितीनुसार, श्री. वसंत उटीकर यांनी माझगाव येथील...

नांदेड पोलिसांचे आवाहन: नियम पाळा, शहर वाहतूक सुरळीत ठेवा

इमेज
  अधिकृत प्रसिद्धी पत्रक, नांदेड पोलीस संपादक: संजय पाटील चिखले नांदेड,दि.०६/०५/२०२६:  शहरातील वाहतूक सुरळीत राहावी व नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. रस्त्यावर कोणत्याही परिस्थितीत नो पार्किंगमध्ये दुचाकी, रिक्षा किंवा चारचाकी वाहने उभी करू नयेत, तसेच वाहतुकीला किंवा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने हातगाड्या लावू नयेत. दुकानमालकांनीही शासकीय जागेत किंवा फुटपाथवर दुकानाचे बोर्ड ठेवू नयेत, याची विशेष खबरदारी घ्यावी. शहरातील सर्व मॉल चालकांनी आपल्या ग्राहकांसाठी मॉलच्या आवारातच पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी व त्यासाठी आवश्यक तेथे वॉचमन नेमावेत. ऑटो रिक्षा चालकांसाठीही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत की, विना परमिट, फिटनेस किंवा इन्शुरन्स असलेली वाहने चालवू नयेत. तसेच रिक्षा चालवताना स्वच्छ व विहित गणवेश परिधान करावा व गणवेश नीटनेटका ठेवावा. रस्त्यावर अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करू नये. प्रवासी वाहतूक करताना नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्...

शनिपेठ पोलीस ठाण्याच्या लाचखोर नाईकाच्या एसीबीने आवळल्या मुसक्या; १ लाखाची लाच घेताना रंगेहाथ अटक!

इमेज
  संजय पाटील चिखले जळगाव,१३/०४/२०२६: जळगाव पोलीस खात्याची प्रतिमा मलीन करणाऱ्या एका भ्रष्ट कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला असून, एका तक्रारी अर्जात सवलत देण्यासाठी चक्क २ लाखांची लाच मागणाऱ्या पोलीस नाईकाचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ' करेक्ट कार्यक्रम ' केला आहे. शनिपेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे याला १ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ​ नेमकी घटना आणि तक्रार: ​मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मूळ तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी आहेत. त्यांच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशन येथे एक तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. या अर्जाची चौकशी आरोपी लोकसेवक पोलीस नाईक विनोद पितांबर अहिरे (बक्कल नं. ४०) याच्याकडे सोपवण्यात आली होती. ​या अर्जात तक्रारदाराच्या मुलावर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी आणि सदर अर्ज निकाली काढून (निर्गती) देण्यासाठी अहिरे याने २,००,००० (दोन लाख) रुपयांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १३ एप्रिल २०२६ रोजी...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १७६९ रुग्णांना सुमारे १४.२५ कोटींची मदत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

इमेज
मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष बातमीचे अंतरंग (Highlights ): २० गंभीर आजारांसाठी मदत सामंजस्य करारातून मदतीचा मार्ग मोकळा आर्थिक वर्षातील मदत  संजय चिखले पाटील छत्रपती संभाजीनगर | १० एप्रिल २०२६            शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आर्थिक वर्षात १७६९ रुग्णांना सुमारे १४ कोटी २५ लाख रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून जिल्हा कक्षाची स्थापना, पेपरलेस अर्ज प्रक्रिया, अर्जांचा तातडीने निपटारा आदी सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. त्यासोबतच सामंजस्य करार, क्राउडफंडिंग आदी माध्यमांतून समाजातील मदत करणारी रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये, संस्था व दाते यांचे सहकार्य लाभत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे आणि मदतीचे विविध मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळ पारदर्शकता वाढून मदत वितरणाचा वेग लक्षणीयरीत्या ...